Author: Sharad Bhalerao

शहर पोलिसात पतीसह सासरच्या ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील विवाहितेला हुंडा कमी दिला तसेच दुकान टाकण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपयांची मागणी करत बामणोदला सासरी मारहाण करून छळ केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रविवारी, ६ जुलै रोजी पतीसह सासरच्या मंडळींविरुध्द जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले. जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगर येथील माहेर असलेल्या गायत्री देवेंद्र सोनवणे (वय २४) यांचा देवेंद्र बाळू सोनवणे यांच्याशी रितीरिवाजानुसार विवाह झाला आहे. दरम्यान लग्नात हुंडा कमी दिला तसेच पतीला किराणा दुकान टाकण्यासाठी पाच लाख रूपये आणावे, अशी मागणी करत विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. त्यानंतर सासू, सासरे,…

Read More

शासकीय रुग्णालयात कुटुंबियांचा आक्रोश, रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील समतानगर भागातील रहिवासी २० वर्षीय तरुणाचा सोमवारी, ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता झोपेतच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शासकीय रुग्णालयात कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. या घटनेमुळे नातेवाईकांसह मित्रांनाही त्याच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते. दरम्यान, सागर अशोक नन्नवरे (वय २०, रा. समता नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याचे सांगण्यात आले. सागरच्या पश्चात आई सुनीता, वडील अशोक आणि बहीण असा परिवार आहे. सागर नन्नवरे हा पेंटिंगचे काम करतो…

Read More

पांझरा नदीकाठच्या नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा साईमत/धुळे/प्रतिनिधी : जिल्ह्यात संततधार मुसळधार पाऊस सुरु आहे. सततच्या पावसाने साक्री तालुक्यातील पांझरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. त्यामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत वाढ झाली आहे. अक्कलपाडा प्रकल्पात पाण्याची वाढती आवक लक्षात घेता प्रकल्पाचे ७ दरवाजे अर्धा मीटरने उघडले आहेत. सध्या अक्कलपाडा प्रकल्पातून ५ हजार २३० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग सोमवारी, ७ जुलै रोजी पहाटे ४ वाजेपासून टप्प्याटप्याने वाढविण्यात आला आहे. पाण्याची आवक पुढेही वाढल्यास, पूर्वसूचनेनुसार विसर्गाचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या पांइम्रा, मालनगाव…

Read More

रक्तदान शिबिरात २५० बाटल्यांचे संकलन साईमत/शिरपूर/प्रतिनिधी : तालुक्यातील निमझरी येथे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची भली मोठी रांग लागली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात यानिमित्त रक्तदान शिबिरही घेण्यात आले. तसेच भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. निमझरी येथे विठ्ठल मंदिरात मंदिर समितीचे प्रमुख तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती छगन गुजर, पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात भाविकांच्या दर्शनासाठी सोय केली होती. दर्शनार्थींची गावातील जुन्या घरापासून ते मंदिरापर्यंत भली मोठी रांग लागली होती. वाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी शिबिर घेतले. शिबिरात शेकडो रुग्णांची मोफत तपासणी केली. तसेच रक्तदान शिबिरात २५० बाटल्यांचे संकलन करण्यात आले. दर्शनार्थीसाठी…

Read More

शिंदखेडा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल साईमत/शिंदखेडा/प्रतिनिधी : शेतीच्या कामासाठी घेतलेल्या ट्रॅक्टरला जीपीएस यंत्रणा बसविली असल्याने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेले ट्रॅक्टर पोलिसांना शोधून काढण्यात यश मिळाले. जीपीएस यंत्रणेमुळे ट्रॅक्टर चोरट्यांनी कोणत्या मार्गाने कुठपर्यंत नेले हे माहीत झाले. त्यामुळे ट्रॅक्टर शोधून काढणे सहज सोपे झाले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शिंदखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, शहरातील जाधव नगरमध्ये कुणाल गणेश पाटील वास्तव्याला आहेत. त्यांनी शेती कामासाठी स्वराज्य कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी केले होते. रात्री ट्रॅक्टर घराच्या समोर असलेल्या जागेत उभे केले होते. ट्रॅक्टरला ९४२२३७०७०६ या मोबाईल क्रमांकाची जोडणी केलेले जीपीएस बसविण्यात आले होते. ट्रॅक्टर नवीनच असल्यामुळे अधिकृत नंबर मिळालेला…

Read More

मंत्री ना.जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले माल्यार्पण साईमत/दोंडाईचा/प्रतिनिधी : येथील जनदरबार कार्यालयात भारतीय जनसंघाचे संस्थापक, थोर शिक्षणतज्ज्ञ, प्रखर राष्ट्रवादी नेते, भारतरत्न डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी, ६ जुलै रोजी अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्याचे मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी भाजपाचे शिंदखेडाचे तालुकाध्यक्ष (दोंडाईचा ग्रा.) दीपक बागल, भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, जिल्हा सरचिटणीस डी.एस.गिरासे, माजी शहराध्यक्ष प्रवीण महाजन, माजी नगरसेवक निखिल जाधव, जितेंद्र गिरासे, नरेंद्र गिरासे, कृष्णा नगराळे, पप्पू धनगर, के.पी.गिरासे, उमेश वाडीले, जी.के.गिरासे, जनदरबार कार्यालय प्रमुख रामकृष्ण मोरे आदी उपस्थित होते. डॉ. मुखर्जी यांच्या विचारांवर चालण्याचा केला निर्धार यावेळी…

Read More

रथयात्रेत आ.शिरीषकुमार नाईक यांचा सहभाग ; भाविकांसोबत धरला ठेका साईमत/नवापूर/प्रतिनिधी : शहरात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)च्यावतीने भगवान जगन्नाथ यांची भव्य रथयात्रा मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आली. पावसाची पर्वा ‌न करता शेकडो भाविकांनी रथयात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यामुळे नवापूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. फुलांनी आणि रंगीबेरंगी वस्तूंनी सजविलेला भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि बंधू बलदेव यांचा रथ भाविकांनी जयघोषात ओढण्यास सुरुवात केली. ‘हरे कृष्ण, हरे रामा’च्या गजराने आणि मृदंग, टाळ यांच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी रथावर पुष्पवृष्टी केली. भगवान जगन्नाथांचे दर्शन घेतले. अनेक ठिकाणी भाविकांनी रांगोळ्या काढून आणि पेढे वाटून रथयात्रेचे स्वागत केले.…

Read More

विखरणला द्वारकाधीश विठ्ठल मंदिरात पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांनी घेतले दर्शन साईमत/दोंडाईचा/प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांनी प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विखरण येथील द्वारकाधीश विठ्ठल मंदिरात विठु माऊलीचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख, समृद्धी व शांततेसाठी प्रार्थना केली. यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पसरले होते. आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. याप्रसंगी त्यांनी स्थानिक भाविकांशी संवाद साधत विठ्ठल भक्तीच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच प्रती पंढरपूर विखरण या ठिकाणाचा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याबाबतही आश्वासक चर्चा…

Read More

ह.भ.प. गजानन महाराजांच्या प्रवचनाने वातावरण ‘विठ्ठलमय’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पोस्टल कॉलनी परिसरातील श्री हरी मंदिर प्रतिष्ठानच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त रविवारी, ६ जुलै रोजी श्री हरी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सोहळ्याला परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने हजेरी लावत आषाढी एकादशीचा आनंद लुटला. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणीच्या आरतीने झाली. आरतीनंतर ह.भ.प. गौ प्रेमी गजानन महाराज, वरसाडेकर यांच्या भव्य दिव्य प्रवचनाचे आयोजन केले होते. महाराजांच्या कीर्तनाने संपूर्ण परिसरातील वातावरण विठ्ठलमय झाले. उपस्थितांनी भक्तीरसात तल्लीन होऊन प्रवचनाचा लाभ घेतला. प्रवचन झाल्यानंतर भाविकांना फराळाचे वाटप केले. त्यात साबुदाणा खिचडी, केळी, चिक्की आणि लाडू यांचा समावेश होता. भाविकांनी फराळाचा आस्वाद घेतला. यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम…

Read More

प्रलंबित बदल्यांविरोधात कामगार महासंघ झाले आक्रमक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव विभागातील कामगारांच्या बदल्या प्रलंबित असल्याने कामगार महासंघाने विभागीय कार्यालयासमोर मंगळवारी, ८ जुलैपासून साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. मुख्य कार्यालयाच्या परिपत्रकानुसार १५ टक्के बदल्या करण्याचे आदेश असताना आणि बदल्यांसाठीची टक्केवारी शिल्लक असतानाही कामगारांच्या बदल्या केल्या नसल्यामुळे कामगारांना अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. उपोषणाला कामगार संघटनेने पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. हे आंदोलन संघटनेच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळाला नाही, तर आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल. आंदोलनामुळे औद्योगिक शांतता भंग झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही संघटनेने…

Read More