पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी दिली माहिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : विश्व हिंदू परिषद केंद्रीय प्रन्यासी मंडळ आणि केंद्रीय प्रबंध समितीची आंतरराष्ट्रीय स्तराची बैठक यंदा जळगावात आयोजित केली आहे. गेल्या ६१ वर्षांच्या इतिहासात ही बैठक महाराष्ट्रात केवळ तीन वेळा (पुणे, मुंबई आणि नागपूर) झाली आहे. विशेष म्हणजे ही बहुतांशी मेट्रो शहरांमध्येच होते. त्यामुळे पहिल्यांदाच जळगावसारख्या शहराला बैठकीचा मान मिळाला आहे. त्यामुळे हा जिल्ह्यासाठी एक मोठा सन्मान मानला जात असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे यांनी बुधवारी, १६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जळगावमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधींचे आगमन ही शहरासाठी एक ऐतिहासिक बाब मानली जात आहे.…
Author: Sharad Bhalerao
वैद्यकीय पथकाकडून यशस्वी शस्त्रक्रिया, अधिष्ठातांकडून पथकाचे कौतुक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात विवाहितेची शस्त्रक्रियेद्वारे यशस्वी सिझेरियन (प्रसुती) होऊन तिने तिळ्या मुलांना जन्म दिला आहे. रुग्णालयात मातेसह मुलांची प्रसूती सुखरूप पार पडली. वैद्यकीय पथकाच्या यशस्वी कामगिरीबद्दल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी कौतुक केले आहे. सपना राठोड (वय २५) यांना प्रसुतीसाठी स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागात दाखल झाली होती. त्यावेळी महिलेच्या पोटात तीन बाळ असल्याचे निदान झाल्यावर वैद्यकीय पथकाने यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया केली. महिलेने तीन गोंडस मुलांना जन्म दिला. ही शस्त्रक्रिया स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे पथक प्रमुख डॉ. राहुल कातकाडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक प्राध्यापक डॉ.सुरज कोठावदे, वरिष्ठ निवासी डॉक्टर…
रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी ; जिल्हापेठ पोलिसात अकस्मातची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सासरी कामानिमित्त दुचाकीने जळगावात आलेल्या जावयाचा १५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अपघात घडला. त्यात गंभीर जखमी झालेल्या जावयाचा उपचारावेळी मृत्यू झाल्याची घटना घडली. सागर रामचंद्र सूर्यवंशी (वय ३२ रा. रावळगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) असे मयत झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी केली होती. सविस्तर असे की, नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथे सागर सूर्यवंशी हे आपल्या आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ यांच्यासह वास्तव्याला होते. ते १४ जुलै रोजी जळगावातील दशरथ नगरातील सासरी कामानिमित्त दुचाकीने आले…
जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित विशेष बैठकीत मांडले विविध प्रस्ताव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील पर्यटन आणि कृषी आधारित उद्योगांच्या वाढीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने एक विशेष बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद होते. बैठकीत पर्यटन क्षेत्रातील संधी, अडचणी आणि उपाययोजना तसेच कृषी-उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीवेळी हतनूर धरण, गिरणा नदीकाठ, गिरीशिखर आणि इतर निसर्ग पर्यटनस्थळांच्या विकासासाठी मूलभूत सुविधा उभारणे, स्वच्छता, पर्यटकांसाठी माहिती केंद्रे, बोटिंग, नैसर्गिक ट्रेल्स यासारख्या आकर्षक उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. कृषी उद्योगाच्या अनुषंगाने, शेतमाल प्रक्रिया केंद्रे, शीतसाखळी यंत्रणा, साठवणूक सुविधा आणि स्थानिक उत्पादकांना बाजारपेठांशी जोडणाऱ्या…
खरीप पेरण्यांना आला वेग, कृषी विभागाची माहिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यात सुमारे ७ लाख ४६ हजार ४६ हेक्टर पेरणीलायक क्षेत्र आहे. त्यापैकी बागायती ऊस वगळता ७ लाख ४० हजार ५३६ हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ८८ हजार ८०० हेक्टरवर खरीप वाणांची पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. जूनच्या सुरूवातीला मृग नक्षत्रात झालेल्या पावसाने सुरूवातीस काही दिवस खंड दिला होता. परंतु आर्द्रा नक्षत्रात अखेरीस झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत सरासरी ९३ टक्के खरीप पेरण्या झाल्या आहेत. यंदा ५ लाख ४६ हजार ९३३ हेक्टरवर कपाशी वाणाच्या लागवडीचा अंदाज होता. त्यात बरीच घट झाली आहे. सद्यस्थितीत केवळ ४ लाख २९…
प्रशासनाकडून २२ जुलैला होणार मतदान यंत्रांची तपासणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाने सद्यस्थितीला तयारी सुरू केली आहे. सरपंचपद आरक्षणासह गट-गण रचनाही केली जात आहे. दुसरीकडे इच्छुकांकडूनही मोर्चेबांधणीसह राजकीय नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. प्रशासनाकडून २२ जुलैला मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील तीन हजार २३१ कंट्रोल तर तीन हजार ३३२ बॅलेट युनिट जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०११ च्या लोकसंख्या व मतदार वाढ लक्षात घेता प्रारूप प्रभाग, गण-गट रचना तयार केली आहे. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. ऑगस्टदरम्यान…
बंद कंपन्यांमधील चोरीचा पोलिसांनी लावला यशस्वी छडा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील एमआयडीसीच्या हद्दीतील व्ही. सेक्टरमध्ये बंद असलेल्या कंपनीतून तांब्याच्या तारेचे रीळ, इलेक्ट्रिक वायरचे बंडल असा ४८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी याबाबत तपास करून बंद कंपन्यांमधील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांनी यश मिळाले आहे. याप्रकरणी केवळ ४ तासात एका संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. गौरी पॉलीमर्स या बंद कंपनीतून चटई बनविण्याच्या मशीनचे २५ हजार रुपये किमतीचे नवे-जुने स्पेअर पार्ट असा ४८ हजार ६०० किमतीचे चोरी झाल्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकास गुन्हा उघड…
विवाहेच्छुक वधू-वरांनी अर्ज करण्याचे आयोजकांतर्फे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशिय युवक मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय भव्य मेळावा रविवारी, ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित केला आहे. यासाठी समाजातील सर्व इच्छुक वधू-वरांनी मेळाव्याचे अर्ज भरून लवकर लवकर पाठवावे, असे आवाहन युवक मंडळाने केले आहे. शहरातील एका हॉटेलात वधू-वर परिचय मेळाव्याच्या अर्जाचे प्रकाशन शांताराम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, उपाध्यक्ष सिताराम देवरे, सचिव अनिल पाटील, सहसचिव दशरथ चौधरी, सर्वश्री संतोष चौधरी, डॉ. मणिलाल चौधरी, अनिल चौधरी, विजय चौधरी, जे.व्ही. टेलर्स, नंदू चौधरी, विनोद चौधरी, प्रभाकर महाले, भगवान चौधरी, भगवान सोनवणे,…
परिचारिका संघटनेतर्फे जळगावच्या अधिष्ठातांना दिले निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने (संलग्नित मुख्यालय लातूर) दोन दिवसीय १५ व १६ जुलै रोजी आझाद मैदान, मुंबई येथे धरणे, निदर्शने १७ जुलैला एक दिवसाचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन करुन त्याची दखल न घेतल्यास शुक्रवारी, १८ जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे. अशा आशयाची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना (शासन मान्य) शाखा जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अध्यक्ष रुपाली पाटील, कार्याध्यक्ष नीता दुसाने, सचिव राजेश्वरी कोळी, खजिनदार अक्षय सपकाळे आदी पदाधिकाऱ्यांनी दिली. संघटनेतर्फे आंदोलनाविषयीचे…
परिसरातील रहिवाशांतर्फे मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील प्रभाग क्र. १६ मध्ये कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्या विरोधात लक्ष्मीनगर, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी आदी परिसरातील रहिवाश्यांनी नाराजी व्यक्त करत महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त निर्मला गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदन देतेवेळी तेजस श्रीश्रीमाळ, प्रसन्ना बागूल, निलेश चव्हाण, जितू परदेशी, विक्की महाले, उमेश कोळी, कैलास चौधरी, संकेत बागुल, गौरव नाथ, उषाबाई चौधरी, लताबाई जोशी, आशा सोनवणे, सुनिता परदेशी, सुनील शिंदे आदी उपस्थित होते. निवेदनाची प्रत आ.सुरेश भोळे यांनाही देण्यात आली. याविषयी रहिवाश्यांच्या भावना लक्षात घेता त्यांनी आयुक्तांशी दूरध्वनीवर चर्चा करून कचरा केंद्र दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.…