२१ जुलैला टपाल सेवा बंद राहणार, नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भारतीय टपाल विभागाने डिजिटल युगातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आगामी पिढीतील अत्याधुनिक ‘एपीटी’ अप्लिकेशन सुरु करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय डिजिटल उत्कृष्टतेच्या दिशेने आणि नागरिकाभिमुख सेवांच्या विकासाकडे वाटचाल करणारा स्वागतार्ह ठरणार आहे. परिवर्तनाचा एक भाग म्हणून ‘एपीटी’ प्रणालीचा वापर जळगाव मुख्य डाकघर अंतर्गत सर्व टपाल कार्यालयांमध्ये मंगळवारी, २२ जुलै २०२५ पासून सुरु होईल. अशा नव्या तंत्रज्ञानामुळे टपाल व्यवहार अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने पार पडणार आहेत. दरम्यान, प्रणाली स्थलांतर, पडताळणी आणि कॉन्फिगरेशन प्रक्रियेच्या अनुषंगाने २१ जुलै रोजी जळगाव मुख्य डाकघर अंतर्गत येणाऱ्या सर्व टपाल…
Author: Sharad Bhalerao
जळगावात ‘केळी–उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात जळगावात ‘केळी–उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम’ पार पडला. हा कार्यक्रम सहकार व पणन विभाग तसेच आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ग्रीन बिझनेस नेटवर्क प्रकल्पांतर्गत आयोजित केला होता. कार्यक्रमाचे आयोजन जळगाव कृषी व आत्मा विभाग आणि पुणे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. प्रशिक्षण कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी, महिला बचत गट, कृषी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कृषीविषयक आवड असणारे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमामुळे निर्यातक्षम केळी लागवडीसाठी शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आहे. प्रशिक्षणाला विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ आणि अधिकारी उपस्थित होते. त्यात विभागीय कृषी सहसंचालक…
जळगाव ‘जीएमसी’त १९ जण संपावर, उर्वरित ३०० जणांचे आजपासून कोणत्याही क्षणी बेमुदत कामबंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी, १७ रोजी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सर्व परिचर्या संवर्गातील स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन घोषणा देत आंदोलन केले. १९ जुन्या परिचारिकांनी एक दिवसीय कामबंद केले तर शुक्रवारपासून इतर ३०० जणांनी गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज केले. ३०० जणांनी कोणत्याही क्षणी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दुपारी आंदोलनस्थळी भेट देऊन सर्व परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून…
साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगावातील ड्रग्ज प्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे. विधिमंडळात ड्रग्ज प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. आरोपीच्या संपर्कात असणारे तथा एलसीबीचे वादग्रस्त ठरलेले पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना अखेर निलंबित केले आहे. अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यामुळे ही कारवाई झाली आहे. जळगावच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपीच्या संपर्कात असणारे दत्तात्रय पोटे यांचे निलंबन केले आहे. ड्रग्ज प्रकरणात दुबईत फरार असलेला म्होरक्या अबरार कुरेशी (शेख) या संशयिताबरोबर २५२ वेळा संपर्क केले असल्याचे रेकॉर्डिंग समोर आले आहे. त्यामुळे पोटे यांच्यावर ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या चौकशी अहवालानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पोटे यांच्या…
जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र प्रदान साईमत/जामनेर/प्रतिनिधी : शहरातील प्रेम नगरातील रहिवासी तथा ‘आरोग्यदूत’ म्हणून ओळखले जाणारे जगदीश बाबुराव सोनार यांची भाजपाच्या जामनेर शहर मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांची निवड भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीस नवे बळ देण्यासाठी केली असल्याचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. तसेच भाजपाचे जामनेर शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे यांच्या स्वाक्षरीने पत्र जगदीश सोनार यांना प्राप्त झाले आहे. त्यांची निवड पक्षाकडून नुकत्याच जाहीर केलेल्या नूतन कार्यकारिणीत केली आहे. नियुक्ती पत्र देतेवेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम, जितेंद्र पाटील, पं.स.चे माजी सभापती चंद्रशेखर काळे यांच्यासह…
स्थापनेपूर्वी २० ला आयोजकांतर्फे निघणार शोभायात्रा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरजवळील सुख अमृत नगर येथे अर्ध नारेश्वर महादेव शिवलिंगाची, नंदी देवताची सोमवारी, २१ रोजी सकाळी ८ वाजता स्थापना करण्यात येणार आहे. स्थापनेपूर्वी रविवारी, २० जुलै रोजी दुपारी १२ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. अर्ध नारेश्वर महादेव शिवलिंगासह नंदी देवताची २० रोजी दुपारी १२ वाजता जोगेश्वरी माता मंदिरापासून ते गणपती नगर त्यानंतर सुख अमृत नगरापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सुख अमृत नगर येथील खुल्या जागेतील मंदिरात सोमवारी, २१ रोजी सकाळी ८ वाजता चेतन कपोले महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा करून जोडप्यांच्या हस्ते होम हवन, अर्ध…
जळगाव जि.प.चे प्रभारी शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांची माहिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गणवेश योजनेतून काही विद्यार्थी वंचित राहिल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाली होती. यासंदर्भात शिक्षण विभागाने खुलासा केला आहे. सध्या वितरण प्रक्रियेत कोणतीही गोंधळ अथवा अपूर्णता नाही. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत गणवेश योजनेसाठी २०२३-२४ च्या यू-डायस माहितीच्या आधारे मंजूर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार गणवेशाची रक्कम वितरित केली आहे. पात्र विद्यार्थ्यांपैकी ९८ टक्के विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गणवेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांनी दिली. शैक्षणिक वर्ष सुरू होताना लाभार्थी संख्या थोडी कमी भासत असली तरी संख्येत हळूहळू स्थिरता येत आहे. तालुकास्तरावर समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया…
दमदार पावसाची प्रतीक्षा, उकाड्यात पडली भर साईमत/जळगाव/प्रतिनिधी : दीड महिना उलटूनही जिल्ह्यात अद्यापही पावसाची तूट कायम आहे. अशातच आगामी काळातही पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज पुन्हा हवामान विभागाने वर्तविला आहे. परिणामी, शेतकऱ्यांसह नागरिकांचीही चिंता वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आगामी चार ते पाच दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी असणार आहे. ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असली तरी वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा वाढण्यात भर पडली आहे. यासोबतच आगामी तीन ते चार दिवस अजून उकाडा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभाग खात्याने वर्तविला आहे. गेल्या जून महिन्यात जिल्ह्याने सरासरी गाठत १२४ मि.मी. पावसाची नोंद…
धुळ्यातील एसीबीच्या पथकाने केली अटक साईमत/धुळे/प्रतिनिधी : शहरातील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकाला धुळ्यातील एसीबीच्या पथकाने पाच हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडून अटक केली आहे. शुभम भिका देव (वय २८, रा.प्लॉट नंबर ११ अ, आदर्श नगर वडेल रोड, देवपूर, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, एसीबीच्या कारवाईमुळे लाचखोर प्रचंड हादरले आहेत. तक्रारदार यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मर्यादित मुंबई यांच्याकडून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत रोजगाराकामी जेसीबीसाठी कर्ज मिळण्याकरीता पात्रता प्रमाणपत्र घेऊन इंडसइंड बँकेकडून २४ लाख ९६ हजार रुपये वैयक्तिक कर्ज…
साक्रीतील वकीलांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांना दिले निवेदन साईमत/साक्री/प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय मंजूर व्हावे, अशा आशयाच्या मागणीसाठी साक्री येथील वकीलांनी अॅड. पूनम काकुस्ते-शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांना निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, आ.राम भदाणे यांच्यासह अॅड. दिनेश कोळी, अॅड. राहुलकुमार जाधव, अॅड. बादल साळुंके, अॅड. कैलास घरटे आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तालुक्यांपैकी एक असलेल्या साक्री तालुक्यात दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर कार्यरत आहे. मात्र, पाच लाखांपेक्षा अधिक रकमेच्या दिवाणी प्रकरणांसाठी पक्षकारांना धुळे जिल्हा न्यायालय गाठावे लागते. साक्री तालुक्याच्या पश्चिम भागातील चरणमाळ गावापर्यंतचे…