साडे नऊ लाखांचा मुद्देमाल केला जप्त, उर्वरित संशयितांचा शोध सुरू साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील एमआयडीसी ई सेक्टरमधील ‘आनंद बॅटरी’ कंपनीत झालेल्या घरफोडीचा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासात गुन्ह्याचा छडा लावत दोन अट्टल चोरट्यांना गजाआड केले आहे. पोलिसांनी चोरलेल्या ९ लाख ७० हजार रुपये किमतीच्या शिशाच्या प्लेट्ससह गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोघांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित संशयित आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. शहरातील एमआयडीसी ई सेक्टरमधील आनंद बॅटरी कंपनीतून ३१ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० ते १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी…
Author: Sharad Bhalerao
जळगावातील तरुण कुढापा चौकात स्तुत्य राबविला उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील शिवसेना उबाठा महानगर शाखेतर्फे २ हजार गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशा धोरणानुसार शिवसेना नेहमीच समाजासाठी विविध उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून जळगावमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सुरुवातीला माजी नगरसेवक तथा पक्षाचे अभ्यासू नेते अनंत जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर जयश्री महाजन, नितीन लढा, कृषी उत्पन्न बाजार…
वार्षिक सभेत असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील एकता रिटेल किराणा असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. सभेत असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी श्रीचंद आडवाणी, कार्याध्यक्षपदी शांतीलाल नावरकर, सचिवपदी पंकज बाविस्कर यांची निवड करण्यात आली. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगरचे मालपाणी ग्रुपचे चेअरमन राजेश मालपाणी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रा. मधुलिका सोनवणे उपस्थित होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल कांकरिया, दिलीप जैन, ताराचंद कृपलानी, सचिव शांतीलाल नावरकर उपस्थित होते. सभेत राजेश मालपाणी यांनी एकत्रित कुटुंब पद्धतीत व्यापार कसा करावा, याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थितांना व्यवसायातील यशस्वीतेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या. त्यानंतर प्रा. मधुलिका सोनवणे यांनी रिटेल…
धरणांची तहान भागविण्यासाठी आवर्तन सोडले जाणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र, यंदा मागच्या महिन्यात जळगाव जिल्ह्यात पावसाची तूट दिसून आली. दुसरीकडे जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये जलसाठा मुबलक आहे. गिरणा धरणावरच्या जामदा डाव्या कालव्यातील कॅनाल दुरुस्तीचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. अशातच ऑगस्ट महिना उजाडला असताना गिरणा धरणातील जलसाठा ६६ टक्क्यांवर आला आहे. अशातच बोरी आणि भोकरबारी धरणातील जलसाठा शून्यावर आहे. त्यामुळे गिरणा धरण १०० टक्के भरल्यानंतर आणि कॅनाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरच धरणांची तहान भागविण्यासाठी आवर्तन सोडले जाणार आहे. जिल्ह्यात दमदार पावसाअभावी ४ ऑगस्टपर्यंत बोरीसह तीन धरणातील जलसाठा शून्यावरच आहे तर नाशिक जिल्ह्यात दमदार पावसाने सातत्य ठेवले आहे.…
बोहरी कॉलनीतील अशोक बागुल यांच्याकडे अनेक वर्षांची परंपरा कायम साईमत/धुळे/प्रतिनिधी : येथील जुने धुळ्यातील वरखेडी रस्त्यालगतच्या बोहरी कॉलनीत गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम राखत जि.प.चे आरोग्य खात्याचे सेवानिवृत्त कर्मचारी अशोक रामकृष्ण बागुल (सोनार) यांच्या निवासस्थानी कानबाईची यंदाही स्थापना केली होती. सोमवारी, ४ ऑगस्ट रोजी कानबाईच्या महोत्सवाची विधिवत उत्साहात सांगता करण्यात आली. यावेळी बाहेरगावाहून आलेले नातेवाईक, मित्र परिवार, धुनीवाले दादाजी परिवारातील सदस्य एकत्र आले होते. समारोपाच्या दिवशी अशोक बागुल, हेमकांत बागुल, वर्षा बागुल, विनोद बागुल, जयेश बागुल, राज बागुल, हर्षा बागुल यांच्या हस्ते विधिवत पूजन करुन आरती करण्यात आली. यावेळी पत्रकार शरद भालेराव, रेखा भालेराव, हिमांशु भालेराव, धनंजय सोनार, आशा सोनार,…
दोन्ही गावांमुळे ‘आई भवानी देवराई’ होतेय विकसित साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील मोयगाव ग्रामपंचायत, वसुंधरा फाउंडेशन आणि पिंपळगाव येथील वृक्षप्रेमी मंडळी यांच्या प्रयत्नातून दोन्ही गावांच्या दरम्यान ‘आई भवानी देवराई’ नावाने देवराई विकसित केल्या जात आहे. वृक्षमित्रांच्यावतीने महाराजांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रविवारी, ३ ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निंब, चिंच, सीताफळ, करंज अशा झाडांची लागवड करण्यात आली. सुरुवातीला प्रा.महेंद्रसिंह कच्छवाह यांनी महाराजांना फुलहार देऊन सत्कार केला. वृक्षमित्र डॉ.विश्वजीत सर, प्रा.डी.एस.पाटील, प्रा.महेंद्रसिंह कच्छवाह, जीवनसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पृथ्वीराज पाटील, राणाजी टेलर, नंदू आप्पा, गजानन कच्छवाह, जितेंद्र महाले, प्रेमजीत सिसोदे, गजानन सिसोदे, संजय पाटील, नामदेव चव्हाण, निलेश सिसोदे, उल्हास सिसोदे,…
रेड स्वस्तिक सोसायटी, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्तुत्य उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील रेड स्वस्तिक सोसायटी, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना नुकतेच गणवेशाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्याने विद्यार्थांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. अध्यक्षस्थानी शाळेचे समन्वयक कैलास सोनार होते. याप्रसंगी डॉ.धनंजय बेंद्रे, डॉ.गणेश पाटील, नारीशक्तीच्या अध्यक्ष मनीषा पाटील, नीता वानखेडकर, कांचन पाटील, किमया पाटील, रेणुका हिंगु, आशा मोर्य, हर्षा गुजराती, नूतन तासखेडकर, वंदना वंडावरे, सहाय्यक फौजदार अलका वानखेडे, पोलीस हवालदार राजीव जाधव, रेल्वे सल्लागार समिती सदस्य विराज कावडीया, शाळेच्या मुख्याध्यापिका योगिनी बेंडाळे, पर्यवेक्षक सुरेश आदीवाल, मुख्याध्यापक निखिल जोगी आदी उपस्थित होते. यांनी घेतले परिश्रम यशस्वीतेसाठी कल्पना देवरे, करुणा महाले, सुनीता…
‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या शाखेतर्फे काव्यधारा काव्य संमेलनाला मिळाला प्रतिसाद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कविता ही सुख-दुःखाच्या आंदोलनाची कहाणी असते. मनाचे सर्व संस्कार कवितेतून फुलतात. कविता ही समाजातील मूल्यांची पडझड थांबवते. निर्मळ समाज बांधणीचे कार्य कवितेतून होते. बालकवी आणि बहिणाबाईप्रमाणे सर्व सिद्ध लेखिकांनी निसर्गासह मातीशी एकरूप होऊन साहित्य निर्मिती करावी, असा मोलाचा संदेश कवयित्री माया धुप्पड यांनी कवयित्रींना दिला. जळगाव येथील ‘आम्ही सिद्ध लेखिका’ समूह शाखेतर्फे आयोजित ‘काव्यधारा’ काव्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी काव्य संमेलनाध्यक्ष म्हणून त्या अध्यक्षीय भाषणातून बोलत होत्या. ‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या शाखेतर्फे काव्यधारा काव्य संमेलनाचे रविवारी, ३ ऑगस्ट रोजी जळगावातील अभियंता भवन येथे आयोजन केले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री माया…
महादेवाला १०८ बेलपत्र अर्पण करून पंचामृताने पूजा ; बुधवारी कावड यात्रा निघणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पहाटेपासून भाविकांनी सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी महादेवाच्या शिवलिंगाला जल, दुग्ध त्यानंतर पंचामृताने अभिषेक, नऊ जोडप्यांच्या हस्ते पूजा केल्यानंतर १०८ बेलपत्र महादेवाला अर्पण करून महाआरती करण्यात आली. दिवसभरातून २०० भाविकांनी जागृत स्वयंभू महादेवाचे दर्शन घेतले. पिंप्राळा परिसरातील भव्य जागृत स्वयंभू महादेव मंदिर आहे. भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने मंदिरात मोठ्या संख्येने गर्दी होते. त्यामुळे “हर हर महादेव आणि बम बम भोले” च्या घोषणांनी परिसर दणाणला होता. त्यानंतर पेढे, केळी, राजगिऱ्याच्या लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.…
तमायचे युवा फाउंडेशनतर्फे आयोजित बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयराज भाट यांचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कंजरभाट समाजात आजही विविध समस्या आहेत. त्यामुळे युवकांनी समाजाच्या विकास आणि परिवर्तनासाठी तमायचेकर एकत्र यावे, असे आवाहन तमायचे युवा फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष जयराज भाट यांनी केले. ते जळगाव येथे दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते. कंजरभाट समाजाच्या सभागृहात रविवारी झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सचिन (अप्पा) बाटुंगे यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राकेश तमायचेकर, शशिकांत बागडे, अमळनेरचे अजय बागडे, गोपी बागडे, संजय मोती, कुंदन तमायचे, सचिन तमायचे, जिल्हाध्यक्ष गणेश बागडे आदी उपस्थित होते. श्री.भाट पुढे म्हणाले की, सामाजिक विकास हा एक निरंतर चालणारा आणि सर्वांगीण प्रक्रिया आहे.…