सोनी नगरात सात जोडप्यांच्या हस्ते महादेवाची ‘महाआरती’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : श्रावण महिन्यात सोमवारी शिवमूठ वाहण्याचे मोठे महत्व आहे. आपल्या आयुष्यात कायम सुख-शांती, समृद्धी नांदावी. घरात भरभराट व्हावी, अन्नधान्याची कमी भासू नये, यासाठी जागृत स्वयंभू महादेवाला सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी पहाटेपासून तिसऱ्या सोमवारी शिवभक्तांनी धान्याची शिवमूठ वाहिली. सोनी नगरातील मनोकामनापूर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागृत स्वयंभू महादेव मंदिरात सोमवारी सकाळी सात जोडप्यांच्या हस्ते जलाभिषेक, दुग्धाभिषेक, १०८ बेलपत्र, महादेवाचे नामस्मरण करून शिवभक्तांनी उपासना केली. तिसऱ्या श्रावण सोमवारची शिवमूठ हिरवे मूग होते. श्रावण महिना असल्याने मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी होती. प्रत्येक भाविकांनी उजव्या हाताच्या मुठीत बसेल तेवढे मूग घेण्यात आले. त्यानंतर धान्य थोडे पाण्याने ओले…
Author: Sharad Bhalerao
‘हरियाली तीज सिंजारा’ उत्सव उत्साहात साजरा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे हरियाली तीज सिंजारा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त रंगीबेरंगी रांगोळ्या, झुले, आकर्षक सजावट व सेल्फी पॉईंटने वातावरण सजले होते. सदाबहार नृत्य, अंताक्षरीच्या खेळात नवीन प्रकार राउंड घेतले. जसे की गुण मिळवायचे असेल तर बोल बोली बोल, गाणी ओळखा, गिबली फोटोग्राफी, रिल्स बनवा, टीव्ही सिरीयलशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले.अशी आगळी-वेगळी अंताक्षरीच्या स्पर्धेने कार्यक्रम रंगला. संगीताच्या अशा खेळामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. स्पर्धेत ६ गटांनी सहभाग घेतला. त्यात बांसुरी गट प्रथम तर पियानो गट द्वितीय क्रमांकावर राहिला. नव्या-जुन्या पिढीचे सुंदर तालमेल हे सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट…
नागपूर-पुणे ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगावसह विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना पुण्याच्या प्रवासासाठी जलद, आरामदायी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारा ऐतिहासिक क्षण रविवारी, १० ऑगस्ट रोजी आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. गाडीच्या मार्गात भुसावळ आणि जळगाव अशा दोन्ही स्थानकांचा समावेश असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना त्याचा थेट लाभ होणार आहे. भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकांवर या गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले. भुसावळ येथे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, सार्वजनिक बांधकाम…
‘तुमको ना भुल पायेंगे’ म्हणत जळगावकरांनी वाहिली आदरांजली साईमत/जळगाव/प्रतिनिधी : माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांच्या जाण्याने एक अभ्यासू, परखड, स्पष्टवक्ता असलेला मनपातला आवाज हरपला आहे. त्यांच्या जाण्याने जळगाव शहर विकासाविषयी प्रचंड आस्था असलेला संवेदनशील मनाचा आवाज आपल्यातून निघून गेल्याची भावना ‘तुमको ना भुल पायेंगे’ या श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केल्या. मुळचा नाट्य कलावंत त्यानंतर राजकारणात आलेला अनंत जोशी हा मनाचा प्रचंड हळवा आणि तत्त्वांवर चालणारा मित्र होता, अशा भावना श्रद्धांजली सभेच्या सुरवातीला परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी व्यक्त करतांना त्यांच्या आठवणी सांगितल्या. जळगाव शहराच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करताना बंटी जोशी यांच्या आठवणींना आ. राजूमामा भोळे यांनी उजाळा दिला. युवा…
रानभाजी खा… निरोगी रहा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मायादेवी नगर येथील रोटरी भवन येथे प्रकल्प संचालक (आत्मा) जळगाव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र जळगाव-पाल आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवात जिल्ह्याभरातून आलेल्या शेतकरी गटांसह महिला बचत गटांनी पारंपरिक पद्धतीने पिकविलेल्या रानभाज्यांचे आणि प्रक्रिया उद्योगाचे तब्बल ८० स्टॉल लावून पावसाळी हंगामातील विविधतेचा मेवा रसिकांसमोर मांडला. महोत्सावाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी यावेळी विविध रानभाज्यांपासून बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्यातर्फे ७५ गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार पद्धतीची दप्तरे…
स्थानिक निवडणुका… वेध राजकीय स्थितीचा…! साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : शिवसेनेत फुट पडल्यानंतर पक्षाची दोन शक्कले झाल्याने या पक्षाची संघटनात्मक शक्ती बऱ्यापैकी विभागली गेली. सत्तेसाठी म्हणा की, अन्य कुठल्या कारणाने म्हणा शिवसेनेच्या ज्या आमदारांनी तत्कालीन मंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्याच नावाने वेगळा गट स्थापन केला आणि आज तो गट सत्तेची फळे चाखत आहेत तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना उबाठा आता जळगाव जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यात जिल्हा स्तरावर प्रभाव पाडू शकेल, असा एकही नेता नाही. तथापि, सर्वसाधारण कार्यकर्त्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. असे असले तरी जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे प्रणित शिवसेना आपला प्रभाव…
स्थानिक निवडणुका…वेध राजकीय स्थितीचा…! साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी जे पक्ष दुभंगले आहेत किंवा दोन गट पडले आहेत, अशा पक्षांना आपला प्रभाव जनमानसात निर्माण करण्याचे आव्हान मोठे आहे. त्यात शरद पवार प्रणित राष्ट्रवादी पक्षासाठी स्थानिक निवडणुकीत आपले पक्षीय बल सिध्द करण्याची ही एक परीक्षाचं ठरावी, असे सध्याचे तरी चित्र आहे. तथापि, या पक्षाची जिल्ह्यातील सर्वाधिक जमेची बाजू अशी आहे की, या पक्षात दीर्घकाळ राजकीय पटलावर आपला ठसा उमटविलेल्या ज्येष्ठ आणि अभ्यासू नेत्यांची कमी नाही. पण अभ्यासू ज्येष्ठ नेत्यांना शक्ती प्रदर्शनाच्या मर्यादाही आहेत. राजकीय प्रवृत्तीत आणि कालानुरुप झालेल्या बदलाला ज्येष्ठ मंडळी कशा पध्दतीने सामोरे जाते, यावरच या पक्षाचे…
सोहळ्याला मंत्र्यासह लोकप्रतिनिधींची लाभणार उपस्थिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपूर, तोंडापूर येथे विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचे भव्य उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्या हस्ते रविवारी, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, मंत्री ना.गुलाबराव पाटील, ना. संजय सावकारे यांच्यासह खा.स्मिताताई वाघ, सर्वश्री लोकप्रतिनिधी आ.एकनाराव खडसे, आ.किशोर दराडे, आ.सत्यजित तांबे, आ.सुरेश भोळे, आ.किशोर पाटील, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ.अनिल पाटील, आ.चंद्रकांत पाटील, आ.मंगेश चव्हाण, आ.अमोल पाटील, आ.अमोल जावळे तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प.च्या सीईओ मिनल करनवाल, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, सा.बां.मंडळाचे अधीक्षक अभियंतां प्रशांत…
सुवर्णकार संस्थेतर्फे ॲड.केतन सोनार यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरुणमधील संत शिरोमणी नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७८२ व्या जयंतीनिमित्त रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ केंद्राच्या गल्लीतील संस्थेचे माजी सचिव ॲड.केतन भिकन सोनार यांच्या निवासस्थानी जयंती महोत्सव नुकताच साजरा नुकताच करण्यात आला. यावेळी इस्कॉन परिवाराचे प्रभुजी सुनील जाखेटे (सी.ए.), माजी नगरसेविका रंजना वानखेडे, सुवर्णकार सेनेचे अध्यक्ष संजय विसपुते, विजय वानखेडे, रमेश वाघ, प्रशांत सोनार, जीवन सोनार, जगदीश देवरे, संजय पगार, बबलू मामा, विजय सोनार, सटाणा येथील श्री.दुसाने, डॉ.विजय बागुल यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुनील जाखेटे यांचे…
रा.काँ. (शरद पवार गट) तर्फे आ. खडसे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : महाराष्ट्राचे नेते तथा विद्यमान विधान परिषद सदस्य आ.एकनाथराव खडसे यांनी रूपाली चाकणकर यांच्याबद्दल ‘आक्षेप आहे’ वक्तव्य केल्याचा खोटा कांगावा करून भाजप आणि ‘हनीट्रॅप’च्या विषयाने बदनाम होत असल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी खोट्या केसेस करणे, नाथाभाऊंना बदनाम करण्यासाठी महायुतीच्या नावाने ८ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येऊन आ. खडसे यांच्या प्रतिमेला शाईसह काळे फासण्याचा केविलवाणा प्रकार करण्यात आला. त्यांच्या अशा कृत्याचा निषेध म्हणून ९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे आ.खडसे यांच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनाचा घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष…