Author: Sharad Bhalerao

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   एरंडोल तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे गुरुवारी, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने एका दुचाकी वाहनास धडक दिली. त्यात पिंपरी बुद्रुक येथील महंत प्रियरंजनदास गुरु आचार्य महान साहेब (वय ३५) हे जागेवर ठार तर प्रवीण नारायण पाटील (वय २३) हे जखमी झाले आहे. त्यांना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.रास्ता रोको करणाऱ्या नागरिकांना तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी समजूत काढून वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी यापूर्वीही अनेकवेळा गंभीर अपघात घडलेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी यापूर्वी नॅशनल हायवे ऑफ इंडियाचे प्रकल्प अधिकारी यांना वारंवार स्पीड ब्रेकर, समांतर…

Read More

भविष्यातील करिअरसाठी दौरा प्रेरणादायी ठरणार : आयोजकांनी व्यक्त केला विश्वास साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  गोदावरी पॉलिटेक्निकच्या एआय-एमएल विभागाच्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच जेएनपीए पोर्ट, मुंबई येथे अभ्यास दौरा केला. अशा भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे पाहता आले की, आधुनिक लॉजिस्टिक्स आणि पोर्ट व्यवस्थापनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो यावर अभ्यास केला. दौऱ्यात विद्यार्थ्यांनी पोर्ट ऑपरेशन्स आणि ऑटोमेशन भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर पोर्टपैकी एक असलेल्या जेएनपीएमध्ये कंटेनर हाताळणी, मालवाहतूक प्रक्रिया आणि साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रगत क्रेन आणि स्वयंचलित प्रणालींचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. जेएनपीएने सौरऊर्जेचा वापर आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. त्यामुळे त्यांना हरित लॉजिस्टिक्स विषयी शिकायला मिळाले.…

Read More

ओला दुष्काळ जाहीर करा : ५० हजार हेक्टरी भरपाईची मागणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि इतर ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडने गुरूवारी, २१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय ‘लक्षवेध’ आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष (जळगाव पूर्व) प्रदीप गायके, जिल्हाध्यक्ष (पश्चिम) विजय पाटील आणि महानगर अध्यक्ष (जळगाव) राकेश पाटील यांनी केले. त्यांच्यासोबत लीना पवार, शीतल पाटील यांच्यासह मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी कर्जमाफी, ऊस, कांदा, कापूस आणि दूध दराचे प्रश्न, तसेच मराठा व इतर आरक्षण, निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यासारख्या मागण्या…

Read More

हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू समाज, सनातन धर्म आणि सनातन संस्था यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याच विधानाचा निषेध करण्यासाठी गुरूवारी, २१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘सनातन’ संस्थेने जोरदार आंदोलन केले. यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या विधानाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. निषेध आंदोलनात सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा निषेध करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनानंतर संस्थेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात हिंदू धर्म आणि संस्थांबद्दल अशा प्रकारची विधाने करणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली…

Read More

बॉल बॅडमिंटन स्पर्धेत होता तीन गटांचा समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५- २६ च्या शालेय मनपा दोन दिवशीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात सर्वप्रथम शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेने सुरुवात झाली. ही स्पर्धा १८ आणि १९ ऑगस्ट दरम्यान स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केली होती. ही स्पर्धा १४, १७, १९ वर्षाच्या आतील अशा तीन विविध गटांमध्ये घेण्यात आल्या. स्पर्धेत शहरातील २७ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर.बी.ठाकरे यांनी मैदानाचे पूजन व श्रीफळ फोडून केले. अध्यक्षस्थानी…

Read More

कारवाईत सौदा पावती ३, खरेदी खत ९ जप्त साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरात विना अनुज्ञप्ती अवैध सावकारी करत असल्याच्या तक्रारीनुसार सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जदारांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गैरअर्जदार मनोज वाणी, कल्पना वाणी (रा.श्रीकृष्ण कॉलनी, गणेश कॉलनी जवळ, ता. जि. जळगाव) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अन्वये धाड कारवाईद्वारे शोध कार्य करण्यात आले. कारवाईत सौदा पावती-३, खरेदीखत-९ असे दस्तावेज जप्त केले आहे. ही कारवाई सहकार विभागांतर्गत पोलीस बंदोबस्तासह पंचांच्या समक्ष करण्यात आली. कलम १६ व १७ अंतर्गत चौकशी करुन पुढील चौकशी उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव तालुका यांच्या स्तरावर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. कारवाईसाठी…

Read More

ही इमारत सहकाराचा ‘वारसा’ : शेतकऱ्यांच्या भावना साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :  सर्वात जुनी आणि सहकार क्षेत्रासाठी मानबिंदू ठरलेल्या जेडीसीसीच्या जळगावमधील नवीपेठेतील ‘दगडी बँक’ म्हणून प्रसिध्द असलेल्या वास्तु विक्री अथवा पुनर्विकासाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी नामवंत विकासकांकडून प्रस्तावही मागविण्यात आले होते. दरम्यान, जिल्हा बँकेच्या संचालकांच्या अशा नवीन हालचाली संदर्भात जाणकार व वयोवृध्द शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीत नवीपेठेतील दगडी बँकेची ही केवळ एक वास्तु नसून सहकाराचा ‘वारसा’ (हेरिटेज) आहे. त्या वास्तुचा पुनर्विकास करतांना तिच्या मूळ रचनेस धक्का न लावता आहे त्या स्थितीतच तिचा पुनर्विकास व्हावा, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना २७ मे १९१६…

Read More

वाघनगर परिसरातील संगीतमय भागवत कथेत मुकेश महाराज पारगावकर यांचा उपदेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जीवनात आई-वडिलांची सेवा करावी. जीवनात काकडा आरतीसह हरिपाठाचे विशेष महत्त्व आहे. तसेच चांगल्या माणसांची संगत धरुन वाईट व्यसनांपासून दूर रहावे, असा उपदेश ‘झी टीव्ही’ फेम मुकेश महाराज पारगावकर यांनी देऊन भक्तिमार्गाचे सोपे सूत्र स्पष्ट केले. वाघनगर परिसरातील महाकालेश्वर महादेव मंदिर येथे श्री भवानी महिला मंडळाच्यावतीने सात दिवसीय संगीतमय श्रीमद्‌ भागवत महापुराण कथेला प्रारंभ झाला आहे. त्याला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. १६ ऑगस्टपासून दररोज रात्री आठ ते अकरा या वेळेत होणाऱ्या धार्मिक पर्वामुळे मंदिराचा परिसर भक्तिरसाने उजळून निघाला आहे. कथेचे निरूपण ते करत आहेत. कथेचा समारोप शनिवारी,…

Read More

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांचे नागरिकांना आवाहन साईमत/जामनेर/प्रतिनिधी :  सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. तसेच पारेषण काळ असल्याने आरोग्य विभागामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यातही कंटेनर सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी केले. तसेच डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. मोहिमेतंर्गंत आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत घरोघरी जाऊन डासअळी सर्वेक्षण करण्यात येत आहे. दूषित कंटेनर खाली करून डबकी, तलाव, तळे याठिकाणी गप्पी मासे सोडण्यात येत आहे. तसेच बऱ्याच दिवसांपासून साठलेल्या पाण्यामध्ये क्रूड ऑईल टाकण्यासह गावातील गटारी वाहत्या करण्याच्या व कीटकनाशक पावडर फवारण्याबाबत…

Read More

कंत्राटदार महासंघाचे उपाध्यक्ष इंजि. राहुल सोनवणे यांचा इशारा साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्वच कंत्राटदारांनी ८० ते १०० टक्के कामे पूर्ण केलेली असतांना कंत्राटदारांसाठी शासनाकडून निधी प्राप्त होत नाही. २ ते ३ वर्षापासून विकास कामांसाठी निधीच उपलब्ध नसल्याने कर्ज काढून विकास कामांना हातभार लावणारे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे त्वरित कंत्राटदाराची प्रलंबित बिले अदा करावीत, अन्यथा रास्ता रोको, आमरण उपोषण किंवा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य सु.बे. कंत्राटदार महासंघाचे उपाध्यक्ष इंजि. राहुल शां. सोनवणे यांनी दिला आहे. अशा आशयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना देण्यात आले आहे. सिमेंट, स्टील, डांबर व इतर बांधकाम साहित्याचे…

Read More