Author: Sharad Bhalerao

इंग्लंडच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मान साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शून्य विद्युत अपघात जनजागृती अभियानातील विक्रमी लोकसहभागाची जागतिक स्तरावर नोंद घेत इंग्लंडमधील ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने महावितरणचा सन्मान करण्यात आला. अभियानाचे मार्गदर्शक आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र तसेच अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनाही आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’चे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह महावितरणच्यावतीने संचालक राजेंद्र पवार आणि विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट यांनी स्वीकारले. यावेळी प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ. दिवाकर सुकुल (लंडन), प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. मधू कृष्णन (अमेरिका), ज्येष्ठ संपादक तथा माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांची प्रमुख…

Read More

अमृत योजनेच्या पाईपलाईनच्या गळतीमुळे ‘अस्वच्छ’ पाणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा परिसरातील सावखेडा रस्त्यावरील स्थित ओमकार पार्क, बाबुराव नगर सद्यस्थितीला ‘समस्यांच्या’ विळख्यात सापडला आहे. या भागात प्रवेश करतानाच डाव्या बाजूला पाण्याचा तलाव साचला आहे. त्यात हिरवेगार शेवाळ साचल्याचे चित्र आहे. त्याच बाजूने अमृत योजनेचा पाईपलाईनचा व्हॉल्व आहे. अमृतपाईप जोडणीच्या नटबोल्टमुळे पाईपलाईनमध्ये गळती आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरात पिण्याचे पाणी गढूळ येऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही समस्या त्वरित सोडविण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. शहरातील ओमकार पार्क, बाबुराव नगरात प्रवेश करतांना गटार आहे. गटारीचा ढापा बुजल्यामुळे गटारीच्या पाण्यामुळे तलाव तयार झाला आहे.…

Read More

एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद, ओळख पटविण्याचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील मेहरुणच्या तलावात मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी एका अज्ञात व्यक्तीचा पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून मयताच्या नातेवाईकांचा शोध सुरु असून ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. शहरातील मेहरूण तलावातील पाण्यात बुडून एका अनोळखी अंदाजे ४५ वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याचा मृतदेह मयत स्थितीत रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल केला होता. मयत व्यक्तीचे वर्णन वय अंदाजे ४५ वर्षे, अंगात पांढरे बनियान, तपकीर रंगाचे अंर्तवस्त्र, रंग सावळा, उंची ५…

Read More

कृषी संशोधन अन्‌ विकासाच्या क्षेत्रात नवीन संधीचे दालन उपलब्ध होणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   जळगावातील जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड ही शाश्वत शेती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आता नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेसची (एनएएएस) प्रतिष्ठित कॉर्पोरेट सदस्य बनली आहे. अशा सदस्यत्वाने कंपनीला कृषी संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात नवीन संधीचे दालन उपलब्ध होणार आहेत. १९९० मध्ये एनएएएस ही स्थापन झालेली संस्था आहे. ती भारतातील कृषी संशोधन, शिक्षण आणि धोरणांसाठी एक स्वतंत्र वैज्ञानिक थिंक टँक म्हणून ओळखली जाते. नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र संकुलात कार्यरत ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) सोबत महत्त्वाचे काम करत आहे. यासंदर्भात जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल…

Read More

बाजार समितीच्या सभागृहात होईल निवडीची सभा साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :  येथील जळगाव बाजार समितीच्या रिक्त झालेल्या सभापती पदाच्या निवडीची सभा शुक्रवारी, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. ही सभा जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात होईल. सभेचे पिठासन अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहाय्यक निबंधक धर्मराज पाटील असतील. दरम्यान, सभापती पदासाठी संचालक लक्ष्मणराव पाटील (लकी टेलर) आणि सुनील महाजन अशा दोन नावांची चर्चा आहे. जळगाव बाजार समितीचे सभापती शामकांत सोनवणे यांच्याविरुध्द १४ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. अशा अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्यापूर्वीच श्री.सोनवणे यांनी आठवड्यापूर्वी सभापती पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाची सभा रद्द केली होती. सभापती…

Read More

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार गुन्हेगारास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या गुन्हेगाराचे आशिक बेग असलम बेग ऊर्फ बाबा काल्या (रा. खडका रोड, भुसावळ) असे नाव आहे. गुन्हा घडल्यापासून तो फरार होता. या जबरी चोरीप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गेल्या ७ मे २०२५ रोजी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने त्याला फैजपूर येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले. गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह ग्रेड पीएसआय रवी नरवाडे, हे.कॉ. गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, पो.कॉ.विकास सातदिवे,…

Read More

खडसे परिवाराने एकत्र येऊन केली ‘बाप्पा’ची आरती  साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी ‘श्रींच्या’ स्थापनेच्या दिवशी बुधवारी, २७ ऑगस्ट रोजी ‘गणपती बाप्पा’चे आगमन झाले. यावेळी पारंपरिक उत्साह आणि भक्तिभावाने बाप्पाची प्रतिष्ठापना केली. यावेळी खडसे परिवाराने एकत्र येऊन ‘बाप्पा’ची आरती केली. याप्रसंगी रक्षा खडसे यांचे सासरे तथा माजी मंत्री आ. एकनाथ खडसे, सासू मंदाकिनी खडसे यांच्यासह मुले तसेच परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. घरातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहात ‘बाप्पा’चे स्वागत केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही खडसे परिवारात गणेशोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात केले आहे. आरतीवेळी “गणपती बाप्पा मोरया” गजरात परिसर दणाणला होता. सोहळ्यात भक्तिभाव…

Read More

तक्रारदार नागरिकांना मनपा प्रशासनातर्फे उपस्थितीचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शासनाच्या परिपत्रकानुसार महानगरपालिका आयुक्त स्तरावर लोकशाही दिन घेण्याबाबत आदेशीत केले आहे. त्याअनुषांने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. शासन निर्देशानुसार लोकशाही दिनाचे आयोजन परिस्थितीनुरूप करण्यासाठी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकान्वये आदेश पारीत केले आहेत. शासन परिपत्रकात स्पष्टीकरण निर्देशीत केलेले आहे. त्याअनुषंगाने १ सप्टेंबर रोजी पहिला सोमवार असून सकाळी १० वाजता लोकशाही दिन ऑफलाईन आयोजित केला आहे. जळगाव शहर महानगरपालिकेसंबंधी शासन निर्णयानुसार लोकशाही दिनापूर्वी ज्या नागरिकांनी १५ दिवसाआधी वैयक्तीक तक्रार अर्ज, निवेदने सादर केलेल्या अर्जदार, नागरिकांना मूळ अर्जासह मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात शासनाने दिलेल्या कोरोनासंदर्भातील निर्देषाप्रमाणे कोविड…

Read More

महिलांसह पुरुषांनाही घेतले ताब्यात, गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंजरवाडा येथे एमआयडीसी पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत गावठी हातभट्टी दारूचे सुमारे ३ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट केले आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. घटनास्थळावरून काही आरोपी पोलिसांना पाहून पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारवाईत दोन ते तीन महिलांसह पुरुषांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना कंजरवाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्याच्याआधारे सहायक पोलीस निरीक्षक गणेश…

Read More

जिल्ह्याभरात ५ हजारांहून अधिक फोर्स तैनात साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   गणेशोत्सवाचा उत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, हा उत्सव नागरिकांनी शांततेत आणि आनंदात साजरा करावा, यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने व्यापक तयारी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांसाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रत्येक पातळीवर दक्षता घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा पोलीस दलाचे ३ हजार ४०० अधिकारी, कर्मचारी, १ हजार ८०० होमगार्ड आणि एसआरपीएफच्या तुकड्या अशा ५ हजारांहून अधिक फोर्सची संख्या जिल्ह्याभरात तैनात केली आहे. विशेषतः १६० गावांमध्ये “एक गाव, एक गणपती”…

Read More