जिल्हा वकील संघातर्फे आयोजित सोहळ्यात ॲड. अमोल सावंत यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : वकिलांसाठी संरक्षण कायदा आणि कल्याणकारी योजनांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे चेअरमन ॲड. अमोल सावंत यांनी केले. जिल्हा वकील संघातर्फे जिल्हा न्यायालयाच्या बाररूमच्या सभागृहात आयोजित त्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी वकिलांशी संवाद साधताना शासनाने वकील हिताचे निर्णय घ्यावे, यासाठी बार कौन्सिल नेहमी प्रयत्नशील आहे. सेवानिवृत्ती वेतन, व्हेरिफिकेशन, मानधन, नवीन इमारतीचा प्रश्न, पार्किंगची समस्या आदी विविध विषयांवर सविस्तरपणे माहिती दिली. बार कौन्सिलची कार्यपद्धती, कामकाज, आर्थिक स्थिती, ऑडिट, सदस्य यादी याविषयी विवेचन केले. विधी महाविद्यालयांची वाढणारी संख्या बघता हे नवीन वकील तयार…
Author: Sharad Bhalerao
महत्त्वाच्या समस्यांवर भर देऊन मार्गी लावण्याचे संबंधितांना आदेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : दरवर्षाप्रमाणे विसर्जन मिरवणुकीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, प्रशासनाच्या मिरवणूक संबंधित सर्व विभागीय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी, २९ रोजी दुपारी १२ वाजता विसर्जन मिरवणूक मार्गाची तपासणी करण्यात आली. त्यात रस्त्यावरील सर्व खड्डे, खाली लोंबकत असलेल्या केबल वायरी, रस्त्यावरील पाण्याचे साठलेले डबके, घाणेकर चौकापासून पुढे दोन्ही बाजूंनी विद्युत रोषणाईसाठी अतिरिक्त लाइट्स बसविणे तसेच महर्षी दधीची चौकातील खड्डे व महत्त्वाच्या समस्यांवर भर टाकून त्या मार्गी लावावे, असे लक्षात आणून दिले. मार्ग तपासणीवेळी जिल्हा महसूल विभागातून प्रांताधिकारी विनय गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या सोबत नव्याने पदभार स्वीकारणारे नितीन गणापुरे, सार्वजनिक बांधकाम…
९१ जणांच्या टीममध्ये २६ महिलांना संधी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या पश्चिम विभागाची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी यांनी जाहीर केली आहे. ९१ जणांच्या टीममध्ये २६ महिलांना संधी देण्यात आली. त्यात मराठा समाजाला झुकते माप देताना इतर समाजांच्या प्रतिनिधींनाही स्थान देण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. डॉ. राधेशाम चौधरी यांची मे महिन्यात भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर आठ तालुके अर्थात सहा विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना जबाबदारी निश्चित केली गेली आहे. डॉ. चौधरींच्या ९१ जणांच्या टीममध्ये २६ जणांची मुख्य कार्यकारिणी आहे. त्यात एक जिल्हाध्यक्ष, एक कोषाध्यक्ष, चार सरचिटणीस,…
स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकऱ्यांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील स्थित किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले. यावेळी परिसरातील स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी वैष्णवी नालकोल, सोनल राठोड यांनी गणपती अथर्वशीर्ष पठण केले. ते सर्व विद्यार्थ्यांनी शांततेत श्रवण केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे गणपती अथर्वशीर्षाचे महत्त्वाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही सदैव गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. त्याचे महत्त्व जाणून त्याच्या लाभाची प्राप्ती होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच गणपती अथर्वशीर्षालाही महत्त्व द्यावे, असे मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील, ज्ञानचंद बऱ्हाटे, केतन बऱ्हाटे, संदीप खंडारे उपस्थित…
मनसेने मनपाला लेखी निवेदन देऊन दिला आंदोलनाचा इशारा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) परिसरात महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या कचरा संकलन केंद्रामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे केंद्र तातडीने बंद करण्याची जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मागणीस अनुसरून मनसेने मनपाच्या आयुक्तांना लेखी निवेदन देऊन उग्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. आयटीआय परिसरातील कचरा संकलन केंद्रामुळे प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. तसेच माशी, डास, उंदीर यांचा त्रास वाढल्याने विद्यार्थ्यांपासून ते नागरिकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. परिसरात शासकीय तंत्रनिकेतनसारखी शैक्षणिक संस्था असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे मनसेने निदर्शनास आणून…
समाजातील विवाहाच्या आदर्श आचारसंहितेवर विचार विनिमय साईमत/न्हावी, ता.यावल/प्रतिनिधी : येथील जे.टी.महाजन फ्रुटसेल सहकारी सोसायटीत महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाची तालुकास्तरीय सभा नुकतीच घेण्यात आली. सभेत लेवा पाटीदार समाजातील विवाहाची आदर्श आचारसंहितेवर सखोल विचार विनिमय करण्यात आला. सुरुवातीला स्व. दादासाहेब जे.टी.महाजन (माजी गृह राज्यमंत्री) यांच्या अर्धाकृती पुतळ्याला, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आला. सभेच्या व्यासपीठावर अरुण बोरोले, शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, पुणेतील पिंपळे सौदागर लेवा भ्रातृमंडळाचे अध्यक्ष विकास वारके, उपाध्यक्ष दिलीप चौधरी, कृष्णा खडसे, नाशिकचे डॉ.प्रमोद महाजन, इंडिला ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विजय महाजन, प्रा. व. पू. होले, महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील, साधना लोखंडे,…
सर्व घटकांच्या कल्याणासाठी कामकाज करणार : नवनिर्वाचित सभापती साईमत/जामनेर/प्रतिनिधी : राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशानुसार बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा माजी सभापती अशोक काशिनाथ भोयटे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर गारखेडा येथील अशोक प्रल्हाद पाटील यांची बिनविरोध निवड केल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या सभापती निवड सभेत माजी सभापती अशोक भोयटे, उपसभापती तुकडूदास नाईक यांच्यासह बाजार समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सभापती पदावरील बिनविरोध निवडीनंतर सर्व सदस्यांनी अशोक पाटील यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कृषी उत्पन्न बाजार…
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुनील सुपडू महाजन यांची तर उपसभापतीपदी जयराज जिजाबराव चव्हाण यांची निवड झाल्याचे सभेचे पिठासिन अधिकारी सहाय्यक निबंधक धर्मराज पाटील यांनी जाहीर केले. बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडीसाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवारी, २९ ऑगस्ट रोजी आयोजित केली होती. सभापती पदासाठी संचालक सुनील महाजन, संचालक लक्ष्मण पाटील (लकी टेलर) आणि संचालक मनोज दयाराम चौधरी असे तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, मनोज चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सुनील महाजन आणि लक्ष्मण पाटील यांच्यासाठी संचालकांचे मतदान झाले. त्यात सुनील महाजन यांच्या बाजूने १५ संचालकांनी तर लक्ष्मण पाटील…
समाजबांधवांनी अनुभवला सौहार्द अन् आत्मशुद्धीचा संदेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील आर.सी. बाफना स्वाध्याय भवनात वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे सामूहिक क्षमापना दिन श्रद्धा भाव आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला खा. स्मिता वाघ, आ.राजू मामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. संयम स्वर्ण साधिका श्रमणीसूर्या, राजस्थान प्रवर्तीनी डॉ. सुप्रभा म.सा. आदी ठाणा सहा यांच्या पावन सान्निध्यात आत्मोत्कर्ष चातुर्मास सुरू आहे. त्या अंतर्गत पर्वाधिराज पर्युषण पर्वाच्या समाप्ती पश्चात सामूहिक क्षमापना कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी समाजबांधवांनी एकमेकांची क्षमा मागून परस्पर सौहार्द आणि आत्मशुद्धीचा संदेश अनुभवला. याप्रसंगी प.पू. डॉ. उदितप्रभा, प.पू. डॉ. हेमप्रभा म.सा. यांनी विशेष धर्म संदेशात मौलीक संदेश दिला. यावेळी…
रोग नियंत्रणाच्या नवीन पद्धती विकसितसाठी मिळणार चालना साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद-राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (आयसीएआर-एनआरसीबी) तिरुचिरापल्ली यांच्यात केळी पिकावरील फ्युजारियम विल्ट आणि सीएमव्ही (क्युकुम्बर मोजेक व्हायरस) अशा प्रमुख रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी नुकताच महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. त्यामुळे केळीच्या बागेत येणाऱ्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संशोधन कार्य वाढीस लागेल. करारावर राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्वराजन आणि जैन इरिगेशनच्या टिश्यूकल्चर विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील यांनी स्वाक्षरी केल्या. करारानंतर बोलताना डॉ. सेल्वराजन म्हणाले, जैन इरिगेशन गेल्या ३५ वर्षांपासून केळी पिकावर सातत्याने काम करत आहे. कंपनीने टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाद्वारे विषाणूमुक्त (व्हायरस…