साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ ह्या उपक्रमाच्या पार्श्वभुमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त शहरातील प्रमुख मार्गांवरुन शालेय विद्यार्थ्यांची वृक्ष दिंडी आयोजित केली होती. रॅलीत बुरहानी इंग्लीश मेडीयम स्कूल आणि सु.भा.पाटील शाळा यांचा समावेश होता. रॅलीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वृक्षसंगोपन, झाडे लावा, भारत माता की जय अशा घोषणा देत रॅली हुतात्मा स्मारक येथे आणून विद्यार्थ्यांकडून पंच प्रण शपथ घेण्यात येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. शासनाच्या महत्वाकांक्षी अशा ‘वसुधा वंदन’ उपक्रमातंर्गत शहरातील अष्टविनायक नगर येथील खुल्या जागेत ७५ देशी जातीच्या वृक्षांची अमृत वाटिका तयार करण्यात आली. यावेळी शहरातील विविध मान्यवर अधिकारी,…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील एम.एस.मुंदडा माध्यमिक विद्यालयात नागरिकशास्त्र तसेच लोकशाही मूल्यांच्या आधारावर शालेय उपक्रमांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पडली.’मतदार राजा जागा हो…निवडणुकीचा धागा हो’ यासाठीच दहावीच्या इतिहास राज्यशास्त्र विषयात ‘निवडणूक प्रक्रिया’ हा पाठ देण्यात आला आहे. दहावीचे विद्यार्थी भावी मतदार आहेत. त्यामुळे या पाठावर आधारित कृतीयुक्त निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी, या उद्देशाने लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष निवडणूक घेऊन वर्गमंत्री, शालेय पोषण आहार मंत्री, स्वच्छता मंत्री, सहल मंत्री यांची निवड करण्यात आली. कृतीयुक्त निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया पाठ समजणे अतिशय सोपे गेले. या निवडणुकीच्या रिंगणात ७ उमेदवार होते. त्यात भूमिका अहिरे-मुख्यमंत्री, देव पवार-शालेय पोषण आहार मंत्री, तेजस्विनी…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी माणूस म्हणून जन्माला आल्यावर आपण ज्या समाजात राहतो त्याचे काहीतरी देणे लागतो हे भान लक्षात घेत येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल ॲड ज्यू कॉलेजचे विज्ञान शिक्षक संजय पाटील यांनी आपला चिरंजीव चिरायूचा दुसरा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. आर्मी स्कूलमधील पितृछत्र आणि मातृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी स्वखर्चाने नोटबुकसह पेनचे वाटप करुन त्यांना मदतीचा हात दिला आहे. अशा अनोख्या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विजय नाना पाटील आर्मी स्कूलचे प्राचार्य पी एम.कोळी, ज्येष्ठ शिक्षक व्ही.जी.बोरसे, वाय.वाय.पाटील, शरद पाटील, व्ही.डी.पाटील यांच्या हस्ते २६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आर्मी स्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल ॲड ज्यू. कॉलेजचे माजी संस्थाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे वडील व कार्याध्यक्ष बाळासाहेब अनिकेत पाटील यांचे आजोबा स्व.नवलभाऊ आनंदा पाटील यांची ११६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम.कोळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शिक्षक युवराज पाटील, शालेय सांस्कृतिक विभागाचे प्रमुख शरद पाटील होते. सर्वप्रथम मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धचंद्रकृती पुतळ्याला व स्व.क्रांतिवीर नवलभाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. त्यानंतर प्रमुख वक्ते युवराज पाटील यांनी नवलभाऊंचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. साने…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूल आणि जुनियर कॉलेजमध्ये ९ वी ते १२ वीच्या दुसऱ्या टप्प्यातील पालक शिक्षक सहविचार सभा आणि एनडीएविषयी चर्चासत्र नुकतेच घेण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम.कोळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी संजय चौधरी, आसाराम पवार, जयवंत बोरसे, सुनिता चौधरी, प्रदीप पाटील तसेच प्रभारी कमांडर सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायक सुभेदार भटू पाटील, ज्येष्ठ शिक्षक व्ही. जी. बोरसे उपस्थित होते. यावेळी सुभेदार मेजर नागराज पाटील यांनी प्रास्ताविक करुन एनडीए संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर सैनिकी प्रशिक्षणासंदर्भात सुभेदार मेजर श्रीराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. गणित शिक्षक अनिल वानखेडे यांनी विषयासंदर्भात…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी पाचोरा येथील पत्रकारावर भ्याड हल्ला करणाऱ्या गावगुंडावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणीचे निवेदन शहर आणि तालुका पत्रकार बांधवांतर्फे तहसीलदार भाऊसाहेब थोरात आणि पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांना निवेदन देण्यात आले. तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी एकत्रित येत भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त केला. भ्याड हल्ला करणारे तसेच त्यामागे असणाऱ्या मास्टर माइंडवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच पत्रकार संदीप महाजन आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी शाम…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल येथे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त पुस्तक प्रदर्शन भरवून जयंती साजरी करण्यात आली. पुस्तक प्रदर्शनात शालेय पुस्तके, अवांतर पुस्तके, व्युत्पत्ती कोश, संत चरित्र आदी पुस्तकांचा समावेश होता. प्रदर्शनाचा पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांंनी लाभ घेतला. याप्रसंगी प्रथम डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका वैजापूरकर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले सर्व पाहुण्यांचे स्वागत ग्रंथालय समितीच्या श्रीमती एस.आर.बेहडे यांनी केले. ग्रंथालय समिती प्रमुख शाळेचे ग्रंथपाल ऋषिकेश जोशी यांनी डॉ.रंगनाथन यांच्या जीवनाचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. ग्रंथालय समितीचे अशोक पारधे यांनी वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. व्यासपीठावर मुख्याध्यापिका वैजापूरकर, पर्यवेक्षक एस.…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी केलेली शिवीगाळ आणि ९ रोजी शहरातील मुख्य चौकात झालेला भ्याड हल्ल्याच्या चाळीसगाव प्रेस क्लबच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील तसेच चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना देण्यात आले. पत्रकार महाजन यांनी पोलीस स्थानकात तक्रार देऊनही पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. मात्र, त्यांना अद्यापही संरक्षण मिळाले नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे. हल्ल्याचा निषेध करुन निवेदन प्रेस क्लबचे मुख्य प्रवर्तक किसनराव जोर्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस क्लबचे अध्यक्ष रामलाल चौधरी, कार्याध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी, सचिव गफार शेख, ज्येष्ठ पत्रकार भिकन वाणी, मोतीलाल…
साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर येथे हजरत सादिक शाह सरकारच्या उर्सनिमित्त मुशायरीच्या कार्यक्रम पार नुकताच पडला. मुशायरा कार्यक्रमात शेर शायरी, गझल शायरानी सादर केले. त्याला प्रेक्षकांकडून दाद मिळाली. मुशायऱ्याची मैफिल उत्साहाच्या वातावरणात पार पडली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगाव येथील आ.मंगेश चव्हाण, पाचोरा येथील आ.किशोर पाटील उपस्थित होते. संयोजकांनी त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमात हामीद (भुसावळ), अल्ताफ जिया (मालेगाव), जुबेर अली ताबिश (नगरदेवळा), सुंदर मालेगावी (मालेगाव), चिराग हुनर (सुरत), तालीब सुरती (सुरत), इरशाद अंजुम (मालेगाव), साबीर आफाक (कासोदा), अहमद रजा (कासोदा), आता ए सर (कासोदा), रफिक आलम (कासोदा) यांच्यासह आदींनी शायरानी सहभाग नोंदविला होता.
साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील चिमुकलीवर अमानुष कृत्य करून निर्घृण खून केल्याच्या निषेधार्थ कासोदा येथील ग्रामस्थ आणि सर्व पक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. मूक मोर्चाला व्यापाऱ्यांसह दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मूक मोर्चाला कासोदा ग्रामपंचायतीपासून सुरुवात करण्यात आली. मूक मोर्चात साधना माध्यमिक विद्यालय, कन्या माध्यमिक विद्यालय, भारती विद्यामंदिर, सार्वजनिक माध्यम उर्दू हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होते. मूक मोर्चाचा समारोप सिताराम भाई बिर्ला चौकात करण्यात आला. यावेळी कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना निवेदन देऊन ग्रामस्थांनी आरोपीस फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यांचा होता सहभाग मूक मोर्चात…