Author: Sharad Bhalerao

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन जीपीएस कॅम्पसचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. पहिल्या दिवशी १४ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या व १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या स्पर्धा पार पडल्या. दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून १७ वर्षं वयोगटाच्या स्पर्धेचे उद्घाटन जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण करून करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सचे…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी लागवड केलेले पीक कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी आदी पिकांची परिस्थिती पावसाचा खंड पडल्याने अतिशय वाईट झाली आहे. पाचोरा आणि भडगाव तालुक्यात सरासरी पर्जन्यमान फार कमी असल्याने पिकांची वाढ खुंटलेली आहे. परिणामी बळीराजा संकटात सापडलेला आहे. तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यात मागील २५ दिवसापासून पावसाचा खंड पडल्याने पूर्णपणे पीक वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. यामुळे शासनाने पाचोरा व भडगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. अश्ाा आशयाच्या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तालुकाध्यक्ष तथा पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले. पिक विम्याची माहिती घेतली असता भडगाव तालुक्यातील…

Read More

साईमत, अक्कलकुवा : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या वकिलांचा सत्कार समारंभ अक्कलकुवा आणि धडगाव वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने तालुक्यातील डाब देवगोई याहा मोगी माता मंदिर परिसरात कार्यक्रम आयोजित केला होता. प्रारंभी याहा मोगी मातेच्या मंदिरात जाऊन माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.एन.एस.शेख होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.राजेंद्र इंदिस, ॲड.जगदीश कुवर, ॲड.आर.आर.मराठे, ॲड.सचिन राणे, ॲड.रवींद्र वसावे, ॲड.संग्राम पाडवी, ॲड.बापु पावरा उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहाय्यक अभियोक्ता म्हणून निवड झालेल्या ॲड.ईश्वर वळवी, ॲड.रोहिदास पाडवी, ॲड.पी.आर.ठाकरे, ॲड.गोमता पावरा, ॲड.दिलीप वळवी, ॲड.चेतन वळवी, ॲड. कुवरसिंग वळवी, ॲड.वनिता वळवी, ॲड.लक्ष्मी पावरा आदींचा सत्कार…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी खुबचंद सागरमल विद्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन राष्ट्रीय हॉकीचे खेळाडू प्रा.इकबाल मिर्झा यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर खेळाडुंचा सत्कार आणि मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक सुरेश आदिवाल, प्रा.इकबाल मिर्झा, क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, एल.एन.महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर योगीनी बेंडाळे, क्रीडा विभाग प्रमुख विजय पवार उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सुनील साळवे, मयूर पाटील, संतोष चौधरी, राजेश इंगळे यांनी परिश्रम घेतले.

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि जळगाव जिल्हा सेपक टकारॉ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धाची सुरुवात करण्यात आली. यावेळी हॉकीचे राष्ट्रीय खेळाडू इक्बाल मिर्झा यांनी ‘मेजर ध्यानचंदच्या हॉकी मध्ये योगदान’ याविषयी सर्व उपस्थित खेळाडूंना माहिती दिली. क्रीडा दिनानिमित्त १७ वर्षाआतील व १९ वर्षाआतील अश्ाा दोन गटात स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत आठ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत अँग्लो उर्दू हायस्कूलच्या दोन्ही संघ विजयी राहिले. विजयी व उपविजयी तसेच उत्कृष्ट…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील मंगळग्रह सेवा संस्थेस ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन, पुणेतर्फे धार्मिक कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्याहस्ते ‘भारतीय सेवारत्न’ २०२३ पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. पुणे येथील एका हॉटेलात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, सेवेकरी प्रसाद खालकर, नितीन सोनवणे यांनी पुरस्कार स्वीकारला. यापूर्वीही मंगळग्रह सेवा संस्थेस विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने संस्थेमार्फत धार्मिक, सामाजिक, पर्यावरण, आरोग्य, शैक्षणिक आदी क्षेत्रात आगळ्यावेगळ्या पद्धतीने कार्य सुरु आहे. संस्थेच्या माध्यमातूनच जगातील एकमेव मंगळग्रह देवतेचे मंदिर विकसित झाले आहे. मंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील डांगर बुद्रुक येथे एका १० वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी, २९ रोजी सकाळी १०.३० वाजता घडली. आकाश राजेंद्र भील असे मयत मुलाचे नाव आहे. दरम्यान, आकाशचे काका यांनी शासकीय आरोग्य यंत्रणा सुसज्ज राहिली असती तर पुतण्याला वाचवू शकलो असतो. कारण डांगर बु. हे गाव धुळे रस्त्यावर आहे. अमळनेर किंवा धुळे येथे जाण्यासाठी अंतर आणि वेळ सारखाच लागतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सविस्तर असे की, आकाशचे आई-वडील शेतात मजुरी कामासाठी गेले होते. आकाश राजेंद्र भील हा ४ थीत शिक्षण घेत आहे. तो डांगर बु.येथील जिल्हा परिषद शाळेत जात होता. त्यावेळी त्यास सर्पदंश झाला.…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील चहार्डी ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवकाची नेमणूक तसेच दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा निधी मिळावा, यासाठी आपचे कार्यकर्ते व दिव्यांग बंधू यांचे तब्बल २० दिवसांपासून गावातील महादेव मंदिरात साखळी उपोषण सुरु होते. या कालावधीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दोन वेळा निवेदन देण्यात आले. त्याची दखल घेत येत्या दोन दिवसात नवीन ग्रामसेवक रूजू करण्याचे लेखी आश्वासन त्यांनी दिल्याने साखळी उपोषण मागे घेण्यात आले. चोपडा तालुक्यातील नंबर २ ची लोकसंख्या असलेली चहार्डी ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज पूर्णवेळ होत नाही, ग्रामसेवक सतत गैरहजर असतात, ग्रामसेवकाचा मनमानी कारभार सुरु असून नागरिकांना कोणत्याही नागरी सुविधा मिळत नाही. ज्यामध्ये उतारे व दाखले वेळेवर न मिळणे, गावात…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावसह बहुतांश तालुक्यात मागील ३० दिवसापासून पावसाचा खंड पडलेला आहे. खरिप हंगामातील पिकांची वाढ खुटलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची हंगामातील प्रतिकूल हवामान परिस्थिती उद्भवली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ अधिसूचना निर्गमित केल्यास पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात मिळू शकणार आहे. अशा सूचना नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ना.गिरिष महाजन यांनी दिल्या होत्या. चाळीसगाव मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आ.मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पत्र दिले आहे. लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम मिळण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील महिला भगिनींच्या रक्षणासाठी तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांसोबत शिवसेना महिला आघाडीतर्फे रक्षाबंधन साजरा करण्यात आली. यावेळी चाळीसगाव शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी, ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांना शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राख्या बांधल्या. यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा पवार, उपजिल्हाप्रमुख अनिता शिंदे, तालुकाप्रमुख मनिषा महाजन, शहरप्रमुख सुवर्णा राजपूत, वैशाली चौधरी, सीमा पवार, आशा पाटील, ज्योती राजपूत, भाग्यश्री पाटील, मीनाक्षी पाटील, संगीता बोरसे, सुनीता शिंगाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Read More