राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सेपक टकारॉ स्पर्धा

0
9

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि जळगाव जिल्हा सेपक टकारॉ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धाची सुरुवात करण्यात आली. यावेळी हॉकीचे राष्ट्रीय खेळाडू इक्बाल मिर्झा यांनी ‘मेजर ध्यानचंदच्या हॉकी मध्ये योगदान’ याविषयी सर्व उपस्थित खेळाडूंना माहिती दिली.

क्रीडा दिनानिमित्त १७ वर्षाआतील व १९ वर्षाआतील अश्ाा दोन गटात स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत आठ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत अँग्लो उर्दू हायस्कूलच्या दोन्ही संघ विजयी राहिले. विजयी व उपविजयी तसेच उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिक देण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, इकबाल मिर्झा, प्रवीण पाटील, प्रा. वसीम मिर्झा, मयूर पाटील, शहेबाज शेख यांच्या उपस्थितीत झाला. यशस्वीतेसाठी सेपक टकारॉ राष्ट्रीय खेळाडू मिर्झा आसिफ इकबाल, मुजफ्फर शेख, फैजान शेख, आमिर खान यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here