Author: Sharad Bhalerao

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी शासनाच्या लोककल्याणकारी योजना व व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा, यासाठी राज्य शासनातर्फे राज्यभर ‘शासन आपल्या दारी’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जिल्हानिहाय सुरू आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून मंगळवारी, १२ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम पाचोरा येथे घेण्यात आला. सुरुवातीला ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार हे पाचोरा येथे दाखल झाल्यानंतर युवानेता सुमीत पाटील व सहकाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत त्यांचे भव्य स्वागत केले. पाचोरा व भडगाव तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू असलेल्या नगरदेवळा येथील औद्योगिक वसाहत, पाचोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल, ऑक्सिजन पार्क यासह…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी, १२ सप्टेंबर रोजी पाचोरा येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री रेवाबाई पाटील यांचे निधन झाल्याने त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या पाळधी येथील घरी आले होते. यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांच्या मातोश्रींच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. यावेळी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचे सर्व सदस्य तसेच ना.अनिल पाटील, आ.चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची आस्थेवाईक चर्चा करुन मातोश्रींच्या निधनाचे दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्री गावात आल्याने घराबाहेर नागरिकांनी गर्दी…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथे ‘शासन आपल्या दारी’ आयोजित कार्यक्रमात पाचोरा नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा’ अभियांनांतर्गत पर्यावरणपूरक अश्ाा ३ लाख ५० हजार रकमेच्या २ Hudraulic इलेक्ट्रिक घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना वाहनाची चावी देऊन करण्यात आले. हे वाहन ३ तास चार्जिंग केल्यानंतर १०० कि.मी. चालते. या वाहनाची क्षमता १.५ टन असून वाहनास ४० कि.मी. प्रति तास असा आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खा. उन्मेश पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. जयकुमार रावल, माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह जिल्ह्यातील…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर ‘रनबडीज’ कंपनीतर्फे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. त्यात भुसावळ स्पोर्ट्‌स अँड रनर्स असोसिएशनच्या तब्बल ६५ धावपटूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत उमेश घुले प्रथम ठरले. त्यांनी ब्रह्मगिरी परिक्रमा २२ कि.मी. अंतर केवळ २ तासात धावून पूर्ण केले. त्याचबरोबर सुनिता सिंग यांनी महिला गटात १० कि.मी.च्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. दोघं धावपटूंचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व धावपटूंनी एकच जल्लोष केला. याशिवाय भुसावळ स्पोर्ट्‌स अँड रनर्स असोसिएशनच्या तब्बल ६५ धावपटूंच्या सहभागामुळे ही संपूर्ण स्पर्धा भुसावळमय झाली होती. त्यामुळे असोसिएशनचा आयोजकांनी सत्कार केला. प्रवीण पाटील यांनी हा सत्कार स्वीकारला. ही स्पर्धा २२ कि.मी., १५…

Read More

लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर समाजरत्न गौरव पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या औरंगाबाद येथील सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या ‘माणुसकी समुहा’चे समाजसेवक सुमित पंडित आणि समाजसेविका पूजा पंडित यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना नुकतेच जामनेर येथे सन्मानित करण्यात आले. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र वृक्ष देऊन गौरविण्यात आले. संत सेना महाराज बहुद्देशिय सेवाभावी संस्था आणि संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव समितीतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र निलपगारे होते. यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, शहराध्यक्ष वसंतराव साळुंखे तसेच ‘माणुसकी समुहा’चेे देविदास पंडित, मिराबाई पंडित, लक्ष्मी…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी शहरातील भारत डेअरी बसस्टॉपजवळ आणि नागसेन नगर येथील दीपक बागुल, राजेश खैरनार या गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत तयार गावठी दारू विक्रेत्याकडून ६० लीटर गावठी पोटलीसह तयार ३ हजार ३९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पाचोरा दारूबंदी विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली दारूबंदी विभागाचे पोलीस कर्मचारी गिरीश पाटील, नंदू पवार यांनी केली. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ नुसार कारवाई केली आहे. जिल्ह्यात सर्वत्र गावठी दारू विरोधात धडक मोहीम सुरू आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने पाचोरा तालुक्यातही गावठी हातभट्टी विक्री व निर्मिती करणाऱ्या विरोधात कारवाईचे धाडसत्र राबविण्यात आले.

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील शेंगोळा गावात किरकोळ कारणावरून तरूणाला लाकडी दांडक्याने तर त्याच्या आई-वडिलांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथे प्रवीण योगीराज दोड (वय २६) हा तरूण आपल्या आई-वडिलांसह वास्तव्याला आहे. तो शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शेतातील इलेक्ट्रीक वायर पोलवरून टाकत असतांना गावात राहणारे अक्षय भागवत दोड, दीपक भागवत दोड आणि भागवत त्र्यंबक दोड यांनी तरूणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर तरूणाच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जखमी झालेल्या तरूणाला शासकीय रूग्णालयात…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी सोलापूर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देत असताना भंडारा उधळून घोषणा दिल्यामुळे धनगर समाजाच्या कार्यकर्त्यास मारहाण करण्यात आली. घोषणा देण्यापासून रोखले. त्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेचा चाळीसगाव येथील धनगर समाज बांधवांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाला गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जमाती प्रवर्गात सामील करून घेऊन अनुसूचित जमातीच्या आरक्षण व सोई सवलती लागू व्हाव्यात, यासाठी अनेकवेळा आंदोलन झाली. शासनाला निवेदन दिलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी सोलापूर येथे धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. निवेदन…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील निसर्ग टेकडी हा जलसंधारण व पर्यावरणीय प्रकल्प सामाजिक कार्यकर्ते जल व पर्यावरण मित्र सोमनाथ माळी यांचे संकल्पनेतून व सेवा सहयोग फाउंडेशनचे गुणवंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक वनीकरण विभाग व लोकसहभागातून जवळपास पंचवीस हेक्टर क्षेत्रावर पंचवीस हजार झाडांचे गेल्या दोन वर्षापासून वृक्षारोपण होऊन संगोपन करण्यात येत आहे. हा परिसर चराईसाठी बंद केला आहे. झाडांबरोबरच गवत वाढीस येत असल्यामुळे जैवविविधता वाढीस येत आहे. वन्यप्राणी हरिण, ससे, कोल्हे, लांडगे, तसेच पक्षी मोर, तितर, घार, टिटवी, चिमणी आदी पक्षी वाढीस येत आहेत. हा परिसर अतिशय दुर्गम असल्याने याठिकाणी येणे जाणेही जिकरीचे आहे. परिसरातील शेतकऱ्यांना निसर्गमय ठिकाणी शांत…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा रेल्वे स्टेशनवर भुसावळच्या नूतन डी.आर.एम. श्रीमती इती पांडे आल्या होत्या. तेव्हा त्यांना पाचोरा प्रवासी रेल्वे कृती समितीच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये पाचोरा रेल्वे स्टेशनवर सायंकाळी सहा वाजेनंतर मुंबईला जाण्यासाठी कोणतीही गाडी नाही. त्यातच कोरोना काळात रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी पाचोरा इथून गाडी नाही. त्यासाठी पाचोरा स्टेशनवर पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेस या गाडीला थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही गाडी पूर्ववत वेळ सुरू करण्यात यावी, आधी विविध मागण्यांसाठी आग्रही भूमिका पांडे यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी सकारात्मकता दाखवत लवकरच मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी…

Read More