धनगर समाजातर्फे ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा तीव्र निषेध

0
6

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

सोलापूर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देत असताना भंडारा उधळून घोषणा दिल्यामुळे धनगर समाजाच्या कार्यकर्त्यास मारहाण करण्यात आली. घोषणा देण्यापासून रोखले. त्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेचा चाळीसगाव येथील धनगर समाज बांधवांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील धनगर समाजाला गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जमाती प्रवर्गात सामील करून घेऊन अनुसूचित जमातीच्या आरक्षण व सोई सवलती लागू व्हाव्यात, यासाठी अनेकवेळा आंदोलन झाली. शासनाला निवेदन दिलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी सोलापूर येथे धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. निवेदन देत असताना धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी भंडारा उधळून घोषणा दिल्यामुळे त्याचा राग घेऊन पालकमंत्री यांच्या समवेत असलेल्या लोकांनी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. त्यांना घोषणा देण्यापासून रोखले. त्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेचा चाळीसगाव येथील धनगर समाज बांधवांनी निवेदनाद्वारे तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

निवेदन देतेवेळी गणेश जयराम जाणे, मारुती काळे, देवचंद साबळे, ॲड.कैलास आगोने, राजेंद्र साबळे, पांडुरंग बोराडे, ॲड. प्रमोद आगोने, ॲड. खंडू कोर, शांताराम आगोने, दिलीप बोराडे, सागर आगोने, राकेश आगोने, प्रकाश थोरात, आबा जाणे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here