फत्तेपुरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित मोहिमेत प्रतिपादन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : महिलांचे आरोग्य हेच कुटुंबाच्या बळाचे मूळ आहे. महिलांना योग्य तपासणी, पोषण, जागरूकता मिळाली तरच परिवार सशक्त, निरोगी राहील. ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ मोहिमेतून गावागावात आरोग्य तपासण्या, मार्गदर्शनासह जनजागृती करून महिलांचे आरोग्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ‘निरोगी नारीशक्ती’ हीच खऱ्या अर्थाने कुटुंबाची ‘कवचकुंडले’ असल्याचे प्रतिपादन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत जामनेर तालुक्यात “स्वस्थ नारी सशक्त परिवार” मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेला जामनेर तालुक्यातील…
Author: Sharad Bhalerao
शिरसोलीत शोककळा ; न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा परिवाराचा पवित्रा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : “सासरचा जाच आणि गर्भपातासाठीचा दबाव” अशा सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून शिरसोली येथील माहेर असलेल्या प्रज्ञा चेतन शेळके (वय २२, रा. करजई, ता. चाळीसगाव, ह.मु. शिरसोली) ह्या पाच महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या करुन ‘जीवन’ संपविल्याची घटना गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. अशा घटनेमुळे हळहळ व्यक्त होऊन शिरसोलीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, पुन्हा एकदा महिलांवरील कौटुंबिक अत्याचार, गर्भपातासाठी होणारा दबाव आणि सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा सूर जनसामान्यांमधून उमटत आहे. प्राप्त माहितीनुसार, गेल्या १ एप्रिल २०२४ रोजी प्रज्ञाचा चाळीसगाव तालुक्यातील चेतन शेळके यांच्याशी विवाह झाला…
अभिनव कार्यशाळा यशस्वी ठरली ; विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षण अधिक आकर्षक आणि सोपे करण्याच्या उद्देशाने प्रगती विद्यामंदिर शाळेत ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या साहाय्याने शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेचे आयोजन केले होते. ‘एआय’च्या मदतीने विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व्हिडिओ बनवले. अभिनव अशा कार्यशाळेचे शिक्षकांसह पालकांनी कौतुक केले आहे. तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावल्याचा सूर उमटला. कार्यशाळेला शाळेचे शिक्षक मनोज भालेराव यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी मराठी विषयातील संपूर्ण व्याकरणाचा भाग ‘एआय’च्या मदतीने तयार केला. त्याचे शैक्षणिक व्हिडिओ बनविले. विद्यार्थ्यांचा हा अभिनव प्रयोग शिक्षक, पालक आणि उपस्थित मान्यवरांनी कौतुकास्पद ठरवला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या सृजनशीलतेलाही चालना…
डॉक्टर्ससह कर्मचाऱ्यांची अपार शुश्रूषा, दानशूर कार्यकर्त्यांकडून परतीची व्यवस्था साईमत/जळगाव/प्रतिनिधी : रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) तसेच समाजसेवकांच्या मदतीने चार महिन्यांची ‘शुश्रूषा’ (सेवा) करून सुखरूप घरी पाठवण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे दिलेल्या सेवेमुळे रुग्णाने कृतज्ञता व्यक्त केली. उत्तरप्रदेश राज्यातील कानपूर येथील राजेश भगवान हे गावी जात असताना रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाले होते. त्यांची सुरुवातीला ओळख पटत नसताना जळगाव येथे जीएमसीत दाखल केले होते. प्रथम अतिदक्षता विभागात आणि त्यानंतर जनरल वॉर्डमध्ये गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यादरम्यान नातेवाईकांना संपर्क साधूनही त्यांनी येण्यास नकार दिल्याने जीएमसीच्या डॉक्टर्ससह कर्मचाऱ्यांनी…
निषेधासह बेमुदत सेवाबंदीचा इशारा, शासनाला निवेदन सादर साईमत/जळगाव/प्रतिनिधी : रुग्णांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या शासनाच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) राज्यव्यापी आंदोलन राबविण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून जिल्ह्यातील नियमित तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या. यासंदर्भात आयएमएच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तेथे जाऊन निवासी जिल्हाधिकारी जयश्री माळी यांना आंदोलनाची कारणमीमांसा स्पष्ट करणारे निवेदन सादर केले. शहरातील आयएमएच्या सभागृहात डॉक्टरांची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत शासनाच्या अधिसूचनेविरोधातील भूमिका स्पष्ट करत अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, सचिव डॉ. भरत बोरोले, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. विलास भोळे, डॉ. सुनील गाजरे यांनी आंदोलनाचे समर्थन केले.…
पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाखालील घटना ; पोलिसात गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील भर रहदारीच्या पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाखाली गेल्या १४ सप्टेंबर रोजीच्या रात्री कार काढण्यावरून घडलेल्या घटनेत टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. अशा किरकोळ वादातून उफाळलेल्या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून तो बोलण्याच्या स्थितीत नसल्याने पोलिसांना जबाब नोंदवता आला नव्हता. अखेर पोलिसांनी गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी त्याचा प्राथमिक जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी माहिती घेतल्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, शाहूनगरातील रहिवासी जुबेर हमिद खाटीक…
विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव ; शिस्त, एकतेसह परेडचा संगम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे ‘बेस्ट परेड (मार्च पास)’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अभिनव संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. ‘एकता आणि अनुशासन’ अशा एनसीसीच्या ब्रीदवाक्याला अधोरेखित करत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, समन्वय आणि संघभावना वृद्धिंगत करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या शालेयसह महाविद्यालयीन पथकांना ‘जळगाव डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ट्रॉफी’ प्रदान करण्यात येणार आहे. राज्यात एनसीसी विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची स्पर्धा होणार ही पहिलीच वेळ आहे. दरवर्षी अशा उपक्रमाचे आयोजन करून विजयी पथकाला फिरती ट्रॉफी देण्यात येईल. ऑक्टोबर २०२५ मध्ये स्पर्धेचा पहिला सोहळा…
मालदाभाडी शाळेतील कार्यक्रमात वनपाल ज्योती धनगर यांचे प्रतिपादन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : वाढत्या प्रदूषणामुळे आणि नैसर्गिक संतुलनाच्या बिघाडामुळे ‘ग्लोबल वार्मिंग’चा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा संकटावर मात करण्यासाठी ‘वृक्षारोपण’ हाच प्रभावी उपाय असल्याचे प्रतिपादन जामनेर येथील वनपाल अधिकारी ज्योती धनगर यांनी केले. त्या जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये आयोजित विशेष पर्यावरण जनजागृती कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. आर. शिकोकार होते. प्रमुख पाहुणे म्हणून वनरक्षक मारोती गाडेकर उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत योजनेअंतर्गत शाळेत वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला. जामनेर सामाजिक वनीकरण विभाग आणि ग्रीन आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने “एक विद्यार्थी–एक झाड” अशा संकल्पनेतून शंभर वृक्षांचे वाटप करण्यात आले.…
विद्यार्थिनींना उत्तेजनार्थ तर शिक्षिकांचा खुला गट तृतीय साईमत/जळगाव/प्रतिनिधी : केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनीच्यावतीने आयोजित २४ वा जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव रविवारी शहरातील गंधे सभागृहात जल्लोषात पार पडला. महोत्सवात विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालयाने लक्षणीय यश मिळवले. विद्यार्थिनींनी केलेल्या सादरीकरणाला मोठ्या गटातून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले तर विद्यालयातील शिक्षिकांच्या कलाकृतीला खुल्या गटातून तृतीय पारितोषिक मिळाले. स्पर्धेत सहभागी झालेल्या शिक्षिकांमध्ये रुपाली पाटील, स्मिता चव्हाण, कविता कुरकुरे, तेजस्वी बाविस्कर, स्नेहा झाडे, राजश्री वराडे, मानसी पाटील, अंकिता कुरकुरे, स्वाती पाटील, नयना चिंचोले यांचा समावेश आहे. त्यांना विद्यालयाचे शिक्षक भूषण गुरव, वरुण नेवे, उमेश सूर्यवंशी, दर्शन गुजराथी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी…
विविध सामाजिक उपक्रमांसह कार्यक्रमाला प्रतिसाद साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : भारतीय विमानोत्तन प्राधिकरणातर्फे जळगाव विमानतळ प्रशासनाने बुधवारी, १७ सप्टेंबर रोजी ‘यात्री सेवा दिवस’ जल्लोषात साजरा करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रमांसह कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला. ‘यात्री सेवा दिवस’ जळगाव विमानतळाचे संचालक हर्षकुमार त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. विमानतळ परिसरात यानिमित्त विद्यार्थ्यांचे लोकनृत्य, चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. त्यात विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होत विमानतळ पाहण्याचा आनंदही लुटला. तसेच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विमानतळ सफरला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रारंभी विमानतळावर आगमन झालेल्या प्रवाशांचे स्वागत टिळा लावून करण्यात आले. त्याचवेळी विमानतळावरील सोयी-सुविधांविषयी प्रवाशांकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. प्रवाशांनीही अशा उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी वृक्षारोपण…