Author: Sharad Bhalerao

४०० दिवसांच्या कठीण तप साधनेतून श्रध्देसह एकजुटीचा संदेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  सकल जैन समाजातर्फे शहरातील दादावाडी जैन मंदिरात रविवारी, २१ सप्टेंबर रोजी ‘श्री सामूहिक वर्षीतप महोत्सव’ उत्साहात पार पडला. महोत्सवात ७५ ते ८० जैन बांधव कठोर वर्षीतप साधनेत मग्न आहे. जैन समाजाच्या धार्मिक परंपरांना अधोरेखित करणारा उपक्रम असल्याने परिसरात अध्यात्मिकतेचे वातावरण निर्माण झाले. यंदाच्या वर्षीतपाचे मुख्य लाभार्थी म्हणून महेंद्र कोठारी आणि मदनलालजी मुथा हे दोन कुटुंब पुढे आले होते. त्यांच्या सहकार्यामुळे महोत्सव यशस्वीरित्या पार पडत आहे. जैन धर्मातील वर्षीतप हे अत्यंत कठीण मानले जाणारे व्रत आहे. साधक एका दिवसाआड भोजन करत सलग १३ महिने आणि १३ दिवस, म्हणजेच ४०० दिवस तप…

Read More

महावितरणचे आवाहन, अधिकृत विजेनेच उजळवा ‘नवरात्रोत्सव’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  घटस्थापनेने सोमवारी, २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी नवरात्रोत्सव मंडळांनी केवळ अधिकृत वीजजोडणी घेऊनच उत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे केले आहे. महावितरणने सार्वजनिक मंडळांसाठी तात्पुरत्या वीजजोडणीची सोय केली आहे. ती घरगुती दरात उपलब्ध आहे. रोषणाई, देखावे, मंडप, महाप्रसाद आदींसाठी लागणारी विजेची कामे फक्त अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घ्यावीत. अनधिकृत किंवा बेकायदेशीर जोडण्या केल्यास शॉर्टसर्किट, आगीचे अपघात किंवा जीवितहानीचा धोका संभवतो, असा इशारा महावितरणने दिला आहे. महावितरणच्या सूचनांनुसार, मंडपातील वायरिंग नेहमी सुव्यवस्थित व प्रमाणित असावे. मीटर व स्विचजवळचा परिसर मोकळा ठेवावा.आवश्यकतेनुसार वीजपुरवठा बंद करण्यासाठी एकाच स्विचची…

Read More

जयपुरातील निर्वाण विश्वविद्यालयात ‘मन, मनोविकार आणि मनोचिकित्सा’वर संशोधन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  एमआयडीसीतील मेक मास्टर इंजिनिअरिंग प्रा. लि.,चे संचालक किरण भंगाळे यांच्या पत्नी तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील योगशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापिका डॉ. गीतांजली भंगाळे यांनी योग विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी “विभिन्न योग ग्रंथों में वर्णित मन, मनोविकार और मनोचिकित्सा का एक सैद्धांतिक अध्ययन” विषयावर संशोधन केले. हे संशोधनकार्य डॉ. नितीन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. मानवी मनाचे चंचल स्वरूप, त्यातून निर्माण होणारे तणाव, नैराश्य, चिंता यांसारखे मानसिक व शारीरिक विकार तसेच त्यावरील योगग्रंथांतील उपाययोजना यांचा या प्रबंधात सखोल अभ्यास केला आहे. श्रीमद् भगवद्गीतेतील अभ्यास–वैराग्य संकल्पना आणि…

Read More

ग्रीन सिटी फाउंडेशन, विविध संस्थांचा सहभाग ; मान्यवरांची उपस्थिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक पेड़ माँ के नाम’ या राष्ट्रीय पर्यावरण उपक्रमांतर्गत जळगाव शहरात पर्यावरणपूरक वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. ग्रीन सिटी फाउंडेशन, जळगाव शहर महानगरपालिका, भगवानदास पटेल चॅरिटेबल ट्रस्ट आणि संताजी अर्थमूव्हर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ७५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाला जळगाव शहराचे आ.सुरेश भोळे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खजिनदार श्विजय वानखेडे, भारती सोनवणे, ॲड.शुचिता हाडा, दीपमाला काळे, विशाल त्रिपाठी, महापालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी, पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील, रवी चौधरी, अनिल चौधरी, आशिष हाडा, मनीषा पाटील, डॉ.…

Read More

कुसुंबाचा ‘उद्योजक’ सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकला साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  “केवळ एका दिवसात लाखोंचा नफा!” अशा आमिषाला बळी पडून जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील एका उद्योजकाला तब्बल २ कोटी ५५ लाख रुपयांचा ऑनलाईन चुना लावल्याने शहरात खळबळ उडाली आहे. व्हॉट्सॲपवरून सुरू झालेला विश्वासाचा खेळ अखेर करोडोंच्या फसवणुकीत परावर्तीत झाला. दरम्यान, जिल्ह्यातील सायबर फसवणुकीचा आतापर्यंतचा हा प्रकार सर्वात मोठा मानला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील मुर्तुजा खानभाई लोखंडवाला (वय ४२, रा. तारा बिझनेस पार्क) यांनी यासंदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ‘आरयूएसएल-सीसीएम’ या कथित शेअर कंपनीच्या नावाखाली ‘क्रिस्टन’ नावाच्या व्यक्तीशी त्यांचा संपर्क झाला. सुरुवातीला १ लाखाच्या गुंतवणुकीवर ४९ हजार ५०० रुपयांचा…

Read More

दोन महिला अटकेत, रामानंद नगर पोलिसांची कारवाई साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील महाबळ आणि आदर्श नगर परिसरात बांधकाम ठेकेदार किरण जगन्नाथ पवार यांच्या साईटवर ठेवलेले बांधकामासाठी लागणारे साहित्य चोरी करणाऱ्या दोन महिलांना रामानंद नगरच्या पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या १० जून २०२५ ते ४ जुलै २०२५ या कालावधीत सेंट्रींगच्या प्लेटा, लोखंडी जॅक आणि शिंकज्या असा ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केल्यावरुन गुन्हा दाखल केला होता. प्राप्त माहितीनुसार, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तांबापुर परिसरातील दोन महिला चोरीत सहभागी असल्याचे समजले. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून त्या महिलांचा शोध घेऊन त्यांना…

Read More

नेरीला ‘स्वस्थ नारी-सशक्त परिवार’ अभियानाचा उत्साहात प्रारंभ साईमत/जामनेर/प्रतिनिधी :  महिला आरोग्य हेच कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीचे मूळ आहे. निरोगी माता म्हणजे निरोगी पिढी. केंद्र व राज्य सरकार महिलांच्या आरोग्य व सशक्तीकरणासाठी कटिबद्ध आहे. ‘स्वस्थ नारी–सशक्त परिवार’ अभियान त्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे. त्यामुळे महिला आरोग्य बळकट असेल तरच परिवार सशक्त असेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीष महाजन यांनी केले. महिलांच्या आरोग्य सशक्तीकरणासाठी सुरू झालेल्या “स्वस्थ नारी–सशक्त परिवार” विशेष मोहिमेचा प्रारंभ जामनेर तालुक्यातील नेरी बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते मनोगतात बोलत होते. ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून राष्ट्रपिता…

Read More

उत्सवात ऊर्जा, शिस्त, सामाजिक भान अन्‌ आधुनिकतेची दिसणार झलक ‘नवरात्री’ हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. नऊ दिवसांचा हा उत्सव ‘नऊ रात्री’ या शब्दावरून नवरात्री म्हणून ओळखला जातो. या काळात आदिशक्तीची उपासना केली जाते. देवीच्या नऊ रूपांची पूजा करून तिच्या शक्ती, करुणा आणि मातृत्वाचा सन्मान केला जातो. नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा देवीच्या एका रूपाला अर्पण केलेला असतो. शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंतच्या नऊ स्वरूपांमध्ये देवीचे सामर्थ्य, ज्ञान, करुणा, पराक्रम आणि अध्यात्मिक शक्तीचे दर्शन घडते. भक्त उपवास, जागरण, गरबा-दांडीया आणि आरत्या करून अशा उपासनेत सहभागी होतात. यंदा शारदीय नवरात्र उत्सवाला येत्या सोमवारी, २२ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. अशा उत्सवासाठी आजची तरुणाई सज्ज…

Read More

अर्धा किलो चांदीची बक्षिसे वाटप, विद्यार्थ्यांचा उत्साह दुणावला, श्रीगणेशाच्या चित्रांतून खुलली बालप्रतिभा साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   गणेशोत्सवानिमित्त दै. ‘साईमत’ वृत्तपत्राने जळगावातील नामांकित शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा व कलात्मक उपक्रम राबविला. उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अपूर्ण गणेशाचे पेन्सिल स्केच देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकता आणि कलेच्या जोरावर ती चित्रे पूर्ण करायची होती. अशा अनोख्या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील विविध शाळांमधून शेकडो आकर्षक व सुंदर कलाकृती प्राप्त झाल्या. त्यापैकी उत्तम कलाकृतींची निवड करून प्रत्येक वर्गातील दोन विजेते ठरविण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना पाच ग्रॅम वजनाची शुद्ध चांदीची नाणी देण्यात आली. या नाण्यांवर गणपतीची मोहक प्रतिमा कोरलेली आहे. ती विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभराची अमूल्य आठवण ठरली.…

Read More

विद्यार्थी गुणवत्तेसाठी शाळांमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल साईमत/नंदुरबार/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता, सर्वांगीण विकासासाठी सतत कार्य तत्पर असणारे आपलं सर्वस्व विद्यार्थ्यांसाठी झोकून देणारे, शाळेच्या विकासासाठी झटणारे नवापूर तालुक्यातील आमलाण जिल्हा परिषद शाळेचे बाळकिसन विठ्ठल ठोंबरे यांना नुकताच ‘क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.. गेल्या १६ वर्षात त्यांनी विद्यार्थी गुणवत्तेसाठी अनेक उपक्रम शाळांमध्ये राबवले. अनेक स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळाले. कला, क्रीडा, संगीत याद्वारे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण दिले. विशेष म्हणजे मागील दोन वर्षात ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने ३६५ दिवस शाळा केली, करत आहेत. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाला. यांनी केला अभिनंदनाचा…

Read More