Author: Sharad Bhalerao

साईमत, पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर येथील भाऊसाहेब गुलाबराव पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शुक्रवारी, १ डिसेंबर रोजी जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, मुख्य मार्गदर्शक तथा वक्ते डॉ. उत्पल कुंवर, डॉ. स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. उत्पल कुंवर, डॉ. स्वप्निल पाटील यांनी एड्स आजाराबद्दल सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांना योग्य ती माहिती देत एड्स आजाराची लक्षणे, लागण, त्याविषयी अफवा, उपचार पद्धती अशा सर्व गोष्टींविषयी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन…

Read More

साईमत, पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक कन्या शाळेत शुक्रवारी, १ डिसेंबर रोजी गणवेश संचासह बूट, मोजेचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.चे माजी सदस्य प्रतापराव पाटील, पं.स.चे माजी सभापती मुकुंद नन्नवरे, सरपंच लक्ष्मी कोळी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील, शरद कोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ पाटील, सदस्य मंगला बाविस्कर, धरणगावच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, पाळधीचे केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांपैकी मुकुंद नन्नवरे, डॉ.भावना भोसले, प्रमोद सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले. जि.प.चे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी मुलींच्या शिक्षणाबाबत शासनाचे ध्येयधोरणे आणि प्रत्यक्ष ध्येयधोरणे…

Read More

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी शहरातील मुख्य मार्गासह भुसावळ मार्गावर मोकाट गुरांचा ठिय्या असतो. त्यामुळे वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट श्‍वानही अचानक वाहनांसमोर येत असल्याने दुचाकी धारकांना किरकोळ अपघाताच्या घटनांना सामोरे लागत आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे. शहरातील विविध भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.शहराच्या मुख्य मार्गावरील परिस्थिती तर फारच बिकट झाली आहे. यामध्ये महात्मा गांधी विद्यालय ते बसस्थानक चौक व रामपेठ चौफुलीपर्यंत रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन धारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच मुख्य मार्गावर मोकाट गुरांचा वावर तसेच रस्ता…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी येथील तहसील कार्यालयात शेतकरी सेनेने (उबाठा) दिलेल्या निवेदनावर तहसिलदारांनी समस्यांवर चर्चा केली. बैठकीत शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख अनिल महाजन, दीपक सूर्यवंशी आदी शेतकऱ्यांनी समस्या मांडून विचार मांडले. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भुसावळ तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचे निवेदन दिल्याने दीपनगर प्रकल्प, विद्युत अभियंता विभाग, कृषी अधिकारी, पोलीस विभाग, वनविभाग या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलाविण्यात आले होते. शेतकऱ्यांना पुरेसा विद्युत पुरवठा करावा, दीपनगर प्रकल्पाचे प्रदुषण कमी करावे, शेतकऱ्यांच्या केबल, ठिबक सिंचन संच, पाईप, म्हशी, चोरीला जातात, त्याची तक्रार दाखल होऊन चोऱ्या होऊ नये, यासाठी पोलीस विभागाने सहकार्य करावे,…

Read More

साईमत, पहूर, ता. जामनेर : वार्ताहर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव हरीभाऊ राऊत यांनी अमरावती येथे आयोजित द्वितीय राज्यस्तरीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत १५०० मिटर्स ॲथेलेटिक्स स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. त्यामुळे पहूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, महाराष्ट्र खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन व अमरावती जिल्हा खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्वितीय महाराष्ट्र राज्य खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक हरिभाऊ राऊत यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. १५ मिटर्स धावणे, ॲथलेटिक…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे-पाटील सोमवारी, ४ डिसेंबरला विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूरात येत आहेत. त्या अनुषंगाने सकल मराठा समाजाची नियोजन बैठक बुलढाणा रस्त्यावरील जनसंपर्क कार्यालयात नुकतीच पार पडली. बैठकीत जरांगे-पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त नियोजित कार्यक्रमावर चर्चा झाली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुद्द्यांवरुन मनोज जरांगे-पाटील संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी, ४ डिसेंबरला मलकापूरात दाखल होत आहेत. येथील सकल मराठा समाजाच्यावतीने जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन केली आहेत. त्याच धर्तीवर त्यांच्या दौऱ्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. ४ ला मनोज जरांगे-पाटील मुक्ताईनगरवरुन मलकापूरात दाखल होतील. जग्गू मामा धाब्यावर त्यांचे स्वागत…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी येथील श्रीराम, व्यास मंदिरात अश्‍विन कृष्ण पक्ष प्रतिपदा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा (त्रिपुरारी) भल्या पहाटे काकड आरतीचा नुकताच समारोप करण्यात आला. काकड आरतीत गणेश, श्रीराम, शिवशंकर देवांची भूपाळी होऊन पांडुरंग, श्रीरामाची आरती भाविक सुरेल आवाजात म्हणत होते. यावेळी भक्तगण उपस्थित राहुन भजनाचा आनंद घेत होते. यावेळी पुरूष भाविकांमध्ये काशीनाथ बारी, रमेश बोंडे, पंडीत अप्पा, राजू टेलर, श्रीरंग वाघ, अशोक बारी, रवींद्र तळेले, पांडुरंग लाड, सुनील माळी, अशोक चव्हाण, राजू पाचपांडे, रवींद्र शिर्के, हिरामण कुंभार, मनोज येवले, अजय गडे, पितांबर सोनवणे आदी उपस्थित होते. महिला भाविकांमध्ये विद्या महाजन, निशा प्रजापती, सुरेखा बारी, ज्योती पाचपांडे, सुनिता वानखेडे, उषाबाई…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह विविध मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. मोर्चाला अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक तहसील कार्यालय बुलडाणा येथून सुरुवात झाली होती. शिवालय, संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र द्यावे, मेंढपाळ- बांधवांना वनचराईसाठी कायमस्वरूपी पास देण्यात यावे, जालना येथील समाज बांधवावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी आंदोलन केले होते. आंदोलनाला आ. संजय गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. ढोल ताशांच्या निनादात मोर्चा निघाला होता. यावेळी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात लावण्यात आला होता. घोषणा…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्राळा शिवारात बकऱ्या चारणाऱ्या ३२ वर्षीय अपंगावर बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेताच बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाला मुक्ताईनगर आणि तेथून जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे . सविस्तर असे की, एका हाताने अपंग असलेले गणेश गणपत झाल्टे (वय ३२) हे नेहमीप्रमाणे कंपार्टमेंट नं ५७४ वनविभागाच्या हद्दी जवळील शेत गट नं.१६२ मध्ये बकऱ्या चारत होते. मात्र, दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक मागून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी गणेश झाल्टे यांनी आरडाओरड केल्याने लगतच्या शेतात असलेल्या अजाबराव झाल्टे आणि इतर नागरिकांनी धाव घेत बिबट्याला हाकलून…

Read More

साईमत, पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर पाळधी बु. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत राहुल सुभाष धनगर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विजय पाटील होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाळधीचे मंडळाधिकारी अमोल पाटील यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविस्तार अधिकारी दीपक पाठक यांनी सहकार्य केले. पहिल्या सभेस सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल राहुल धनगर यांचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जि. प.चे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी कौतुक केले आहे.

Read More