Author: Sharad Bhalerao

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथे येत्या २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ प्रदर्शन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वितरक, प्रकाशकांच्या मागणीनुसार नोंदणीसाठी २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या ३० जानेवारी रोजी सोडत काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे, वाचक, साहित्यिक आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांच्या आनंदाचा वार्षिक सोहळा. संमेलनादरम्यान, ग्रंथ, पुस्तके, साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. यासाठी संमेलनस्थळी ग्रंथ दालनासाठी प्रकाशक, ग्रंथ वितरक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ग्रंथ दालन मागणीचा अर्ज. अटी व शर्ती याबाबतची सविस्तर माहिती संमेलनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच म.वा.मंडळ, अमळनेर…

Read More

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी येथून जवळील पिंपरूड येथील दिव्यांग, सामाजिक, बहुउद्देशीय संस्था (राहुल कोल्हे सामाजिक मित्र मंडळ) तर्फे राष्ट्रीय युवा दिन, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तथा पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांचा सन्मान तथा दिव्यांग बांधवांना ब्लँकेट व साहित्य वाटप, दिव्यांग बांधवांच्या मुलांना स्कुल बॅग, रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी फैजपूर शहरातील पत्रकारांना सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक, पेन, डायरी देऊन सन्मानित करण्यात आले. येथील राहुल कोल्हे सामाजिक मित्र मंडळ हे दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना मदत तसेच पत्रकारांचा सन्मान करीत असतात. सातत्याने सामाजिक उपक्रम राबवित एक निस्वार्थ काम करणारी संस्था म्हणजेच दिव्यांग व सामाजिक…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने केंद्र शासनाच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये बालविवाह प्रतिबंध, हुंडा प्रतिबंध व मालमत्ता हस्तांतरणाचे डिजिटल बोर्ड लावण्यात येणार आहेत. ह्या उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विवाह नोंदणी कार्यालयातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बोर्डचे लोकार्पण करून झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुद्रांक जिल्हाधिकारी सुनील पाटील, विवाह नोंदणी अधिकारी संजय ठाकरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी देवेंद्र राऊत आदी उपस्थित होते. बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार बालविवाह घडवून आणणारे लावून देणारे किंवा विवाह करण्यात सामील असणाऱ्या सर्वांना तुरुंगवास व दंड अशा शिक्षा होऊ शकतात. बालविवाह म्हणजे…

Read More

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी यावल तालुक्यातील रिधुरी येथे कामानिमित्त जेसीबी मशीनवाला यांच्याशी मोबाईलवरून बोलत असतांना मस्करीत ‘साल्या साल्या’ असे बोलत असतांना येथे असलेल्या महिलेला वाटले की, तिच्या पतीला तो म्हणत आहे. या संशयावरून एका ४० वर्षीय तरुणाच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून त्याला ठार केल्याची घटना सोमवारी, १५ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. तसेच या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी संबंधित आरोपींना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. सविस्तर असे की, यावल तालुक्यातील रिधुरी येथे सोमवारी, १५ जानेवारी रोजी सायंकाळी पावणेसात वाजता धनराज वासुदेव पाटील (सोनवणे, वय ४०) हे गुरे बांधण्याच्या गोठ्यात कामानिमित्त जेसीबी मशीनवाला यांच्याशी मोबाईलवरून बोलत असतांना थट्टा,…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी जळगाव, भुसावळ, यावल, न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयाचा तथा रुग्णसेवेचा पदभार एकाच वैद्यकीय अधीक्षकावर असल्याने यावल ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढत चालला आहे, त्याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे सोमवारी, १५ जानेवारी २०२४ रोजी यावल ग्रामीण रुग्णालयात एका मयत व्यक्तीचे एकाच दिवशी तेही (३ ते ४ तासाच्या आत मयत व्यक्तीचे शव पुन्हा ग्रामीण रुग्णालयात आणून) दोन वेळा शव विच्छेदन करण्याची वेळ डॉक्टरवर का..? आली. याबाबत वैद्यकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी कुटुंब नियोजन शिबिर घेण्यात आले. त्याची व इतर विविध आरोग्य सेवेची, होत असलेल्या कार्यक्रमांची माहिती रुग्णांना ज्ञात होण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांनाही दिली जात नसल्याने रुग्णांसह…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेज येथे ७६ वा ‘आर्मी डे’ तथा स्थल सेना दिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शहिदांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब सुभेदार भटू पाटील यांचा त्यांच्या सैन्य दलातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम.कोळी होते. प्रास्ताविकात प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील यांनी स्वातंत्र्य काळानंतरच्या भारतीय सैन्य दलाची स्थापनेपासूनचा इतिहास सांगितला. तेव्हापासून ‘आर्मी डे’ साजरा करतात, याविषयी सांगितले. नायब सुभेदार भटू पाटील यांनी सैनिकांचे युद्धातील योगदान…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे भागीरथीबाई पूर्णपात्रे कला, सीताबाई मांगीलाल अग्रवाल विज्ञान आणि कस्तुरबाई खंडू चौधरी वाणिज्य महाविद्यालय आणि केशव रामभाऊ कोतकर कनिष्ठ महाविद्यालय चाळीसगाव आयोजित श्रीमती सीताबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीमती शकुंतलाबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. पूर्णपात्रे चॅरिटेबल ट्रस्ट चाळीसगाव यांच्या सहकार्याने झालेल्या ३८ व्या कै. गोपाळ नारायण उपाख्य भैय्यासाहेब पूर्णपात्रे स्मृती करंडक वक्तृत्व, श्रीमती सीताबाई मांगीलाल अग्रवाल स्मृती करंडक वादविवाद आणि नारायण अग्रवाल गौरवार्थ करंडक उत्स्फूर्त वक्तृत्व राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाचे पारितोषिक वितरण प्राचार्य डॉ. एन. एन.गायकवाड (रजनीताई पाटील महाविद्यालय, भडगाव), संदीप पाटील (पोलीस निरीक्षक, चाळीसगाव) यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. अध्यक्षस्थानी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पाडळसरे येथील युवा कार्यकर्ते सागर सुकदेव कोळी यांना राष्ट्रीय सेवा योजना तसेच युवक कल्याण क्षेत्रात केलेल्या कार्याचा सन्मानार्थ युवकमित्र परिवार संस्था पुणेमार्फत दिला जाणारा ‘स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय युवा संमेलनात सागर कोळी यांना राज्याचे वनविभागाचे महावनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, बुक क्लबचे संस्थापक अविनाश निमसे, मंथन फाउंडेशनच्या संस्थापिका आशाताई भट्ट, युवक मित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन, बादलसिंग गिरासे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सागर कोळी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून वंचित विकासाबरोबर लोककल्याणाचे कार्य करीत असतात. या कार्याची दखल पुरस्कारासाठी घेण्यात आल्याचे…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी कन्या हायस्कुलला ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ आणि नर्मदा मेडीकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित केलेल्या रक्तगट तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, नर्मदा मेडीकल फाउंडेशनचे डॉ.अनिल शिंदे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.मयुरी शिंदे -जोशी, कन्या शाळेचे शालेय समिती अध्यक्ष प्रा.डॉ.एस.जे.शेख, संचालक भास्कर बोरसे, किरण पाटील, मगन पाटील, एम.एस.चौधरी, मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे उपस्थित होते. शिबिराचे आयोजन संचालक किरण पाटील यांच्या सहकार्याने केले होते. यावेळी राजमाता जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील जी.एस.हायस्कुलचे मुख्याध्यापक बी.एस.पाटील यांना महाराष्ट्र टिचर्स असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळ्यात आदर्श मुख्याध्यापक म्हणून नुकतेच सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनतर्फे धुळे येथे सन्मान कर्तृत्वाचा अंतर्गत राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराचे आयोजन केले होते. यावेळी खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कुलचे मुख्याध्यापक बी.एस.पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मागील ३० वर्षांपासून शाळेच्या एनसीसी विभागाची कमान त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे. याबद्दल त्यांना शिवसेना उबाठा गटाचे खा.संजय राऊत, खा.विनायक राऊत, धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील, महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा शुभांगी पाटील यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आला. मुख्याध्यापक बी.एस.पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, जी.एस.हायस्कुलचे चेअरमन हरी वाणी…

Read More