Author: Sharad Bhalerao

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर येथील नगरपालिकेच्या हद्दीतील मोठ्या आखाड्याजवळील सुन्नी मुस्लिम कब्रस्तानाच्या मध्यभागी असणाऱ्या एका वडाच्या झाडाखाली लाल रंगाचा कुंकु, ८ ते १० हिरवे लिंबू, गुळ, मसूर डाळ, उडीद, गहू, ३ ते ४ लहान हाडांचे तुकडे, फुल, एक लाल रंगाचा कपडा आणि पिशवी असे साहित्य आढळून आले. त्याठिकाणी साहित्य काहीतरी जादूटोण्याच्या उद्देशाने कुणीतरी टाकल्यामुळे याबाबतची चर्चा समजली. त्यामुळे जादुटोण्याचा प्रकार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे. महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीचे रावेर तालुका उपाध्यक्ष युसूफ शाह आणि शहराध्यक्ष फरीद शेख यांच्यासह मलक समद, शेख कलिम जनाब, शेख आबीद, शेख मोईन, शेख इरफान, गुलाम ग्रिस, जावेद दरवान यांनी १ फेब्रुवारी…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित बीसारा लेडीज रनच्या सराव सत्रास नुकताच उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी पन्नासहून अधिक महिलांची उपस्थिती लाभली. यावेळी मुख्य पाहुणे म्हणून स्वतः उत्तम धावपटू असलेल्या भुसावळ वाहतूक शाखेच्या प्रमुख ए.पी.आय. रुपाली चव्हाण उपस्थित होत्या. सुरुवातीला ६ वाजता प्रा.प्रवीण फालक यांच्या मार्गदर्शनात वॉर्म अप व्यायाम प्रकार घेण्यात आला. त्यानंतर ६ वाजून १० मिनिटांनी उद्घाटनाचा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानासमोर आर.पी.डी.रस्त्यावर झाला. सुरुवातीस डॉ.नीलिमा नेहेते व डॉ.चारुलता पाटील यांनी रुपाली चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी रुपाली चव्हाण आणि रनमध्ये प्रथमच सहभागी झालेल्या चंपा जहांगिड यांच्या हस्ते नारळ वाढवून सराव सत्राचे विधिवत उद्घाटन…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी देशाचे नेते खा.शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकांच्या हितासाठी व महाराष्ट्र धर्म टिकविण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या प्रश्‍नासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार लढत आहे. परंतु विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्यासाठी राज्य सरकारने आ.रोहित पवार यांच्यावर ईडीची कारवाई करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. केंद्र व राज्य सरकार विरोधी पक्षाचे नेते आणि आजी-माजी आमदार व खासदार यांच्यावर खोट्या कारवाया करून नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सरकारने सुडबुद्धीने केलेल्या कारवाई विरोधात चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे नायब तहसीलदार सचिन बांबळे, अव्वल कारकून आर.आर.महाजन यांना गुरुवारी, १ फेब्रुवारी रोजी निवेदन…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुलाच्या उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी, २ फेबु्रवारी रोजी करण्यात आले. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते. यावेळी विश्‍वकर्मा योजनेंतर्गत क्रीडा संकुलांचे बांधकाम करणाऱ्या विजय तुळशीराम भील, बापूजी नवल पाटील, विनोद जयराम धनगर, लखन उखा भील, राजेंद्र भानुदास साळी अशा पाच मजुरांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अमळनेर तालुका क्रीडा संकुल ४ हेक्टर २० आरमध्ये साकार होत आहे. २०१० रोजी क्रीडा…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या वेशभूषा, शंखनाद, टाळमृदंग अन्‌ ढोलताश्‍यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे, संमेलनाध्यक्ष तथा राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमळनेरच्या मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह मराठी साहित्य महामंडळ व मराठी वाड्:मय मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीसंत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल संस्थान (वाडी संस्थान) येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध, श्री ज्ञानेश्‍वरी, भारताचे संविधान, श्रीमद्‌…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी भारतातील अनेक विरोधी पक्षांना केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून भाजपाच्यावतीने विनाकारण त्रास देऊन दबावाचे राजकारण केले जात आहे. देशातील अनेक गंभीर प्रश्‍न बाजूला सारून केवळ द्वेषाचे राजकारण केले जात आहे. रोजगार निर्मिती, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा अनेक दिवसांपासून संप सुरूच आहे. पण याकडे सोईस्कर दुर्लक्ष करून केवळ विरोधकांना लक्ष केले जात आहे. रोहित पवार हे राज्यातील एक सक्षम नेतृत्व असून शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत. ते इडीला न घाबरता पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या पाठीशी पूर्ण पक्ष ताकदीने उभा आहे. त्याकरीता राष्ट्रवादी पार्टी मलकापूर तालुका व शहरच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून इडी प्रशासनाचा…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात बुधवारी, ३१ जानेवारी रोजी एक दिवशीय ‘रंगतरंग’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अविनाश पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका शुभांगी पाटील, सुरेखा महाजन, जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सहसचिव संभाजीराजे पाटील, ग.स.चे संचालक मंगेश भोईटे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. सचिन काटे, चहार्डी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज शहर वाचनालयाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक किशोर बाविस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. स्मिता पाटील यांनीही भेट देऊन कार्यक्रमाची प्रशंसा…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विद्रोहीच्या मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी, २ फेब्रुवारी रोजी जळगावच्या परिवर्तन संस्था निर्मित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित श्रीकांत देशमुख लिखित नाट्य रूपांतर ‘नली’ नाट्य प्रयोग सायंकाळी ७ वाजता विद्रोहीच्या मंचावर आयोजित केला आहे. महाराष्ट्र, गोवा, बंगलोर व मध्यप्रदेशात ‘नली’चे ८६ प्रयोग झालेले आहेत. जळगावच्या परिवर्तन संस्थेने नाट्य प्रयोगाची निर्मिती केली आहे. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित श्रीकांत देशमुख यांच्या नलिनी देवराव व्यक्तिचित्राचे नाट्य रूपांतर म्हणजे ‘नली’ एकलनाट्य आहे. नाट्यप्रयोगात अबोध मनातील प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या समोर येत असतांना गावखेड्यातल्या महिलांचे जगणे, ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्‍न, जातीव्यवस्थेतील महिलांचे स्थान, गावगाड्यातील सामाजिक संरचना तसेच खेड्यातली कुटुंबव्यवस्था, शिक्षण आणि शेती…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील हरताळे येथील ब्रिटीशकालीन पाझर तलावातून शेकडो टिप्पर, जेसीबीच्या सह्याने विनापरवाना अवैध गौण खनिज वाहतूक मागील काही दिवसांपासून रात्रंदिवस सुरू होती. परंतु तालुका प्रशासनाकडून तक्रारींची कोणतीही दखल न घेतल्यामुळे तक्रारदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने अवैध गौण खनिज उत्खनन बंद झालेले आहे. मात्र, आतापर्यंत झालेल्या अवैध उत्खननावर कारवाईची प्रतीक्षा लागून राहिली आहे. शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांसाठी व अभिजात कुंभारांसाठी उत्खनन कामे कोणतेही चलन भरण्याची आवश्‍यकता नसते. तलावातून एका कन्स्ट्रक्शन कंपनीने गौण खनिज चोरी केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह, सामाजिक संघटनांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कन्स्ट्रक्शन कंपनीला ४ कोटी ५४ लाखाचा दंड झालेला होता. परंतु मागील काही दिवसात उत्खनन करणाऱ्यांकडून राजकीय बगलबच्चे…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी येथील तत्कालीन तलाठी तथा रावेर तालुक्यात ऐनपूर येथे कार्यरत शरद विठ्ठल सूर्यवंशी तसेच तत्कालीन मंडळ अधिकारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याबाबत यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी ३० जानेवारी २०२४ रोजी लेखी पत्र काढून तीन दिवसाच्या आत समक्ष खुलासा सादर करावा, असे कळविले आहे. दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, यावल येथील गट नंबर ६७६ ला तात्पुरती बिनशेती आदेशातील नियम, अटी शर्तीतील अनुक्रमांक २८ चे उल्लंघन केल्याबाबत व सक्षम अधिकाऱ्याची अंतिम सनद नसताना भूखंडाचे पाने ओपन केल्याबाबत यावल तहसील कार्यालयात तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रार अर्जाच्या अनुषंगाने अर्जाबाबत खुलासा कार्यालयात तीन दिवसाच्या आत समक्ष सादर करावा. खुलासा…

Read More