चोपड्यातील महात्मा गांधी विद्यालयात ‘रंगतरंग’ सांस्कृतिक कार्यक्रम

0
1

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात बुधवारी, ३१ जानेवारी रोजी एक दिवशीय ‘रंगतरंग’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अविनाश पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका शुभांगी पाटील, सुरेखा महाजन, जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सहसचिव संभाजीराजे पाटील, ग.स.चे संचालक मंगेश भोईटे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. सचिन काटे, चहार्डी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज शहर वाचनालयाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक किशोर बाविस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. स्मिता पाटील यांनीही भेट देऊन कार्यक्रमाची प्रशंसा केली.

यावेळी गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एस. सोनवणे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भूपेश सोनवणे उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त माध्यमिक शिक्षक तथा जळगाव माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक संजय सोनवणे यांनी करुन दिला.

संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाची धुरा कलाशिक्षक तथा चोपडा येथील माध्यमिक शिक्षकांच्या पतपेढीचे अध्यक्ष दिनेश बाविस्कर यांनी सांभाळली. उत्कृष्ट कार्यक्रमाचे सादरीकरण केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे, सूत्रसंचालन प्राथमिक विभागाचे शिक्षक योगेश खैरनार तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी चैताली पाटील, आभार मुख्याध्यापक भूपेश सोनवणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here