साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी केवळ निवडणुका आल्या किंवा लग्न समारंभ, अंत्यविधी असला तरच गावात धावती भेट ही पुढाऱ्यांची ठरलेली असते. मात्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी, केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी चक्क आमदार गावाला भेट देतात. रात्रभर मुक्कामी थांबून त्यांच्याशी संवाद साधतात. असे आजवर कधी घडले नव्हते. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या ‘गाव चलो अभियानाच्या’ माध्यमातून चाळीसगाव मतदारसंघाचे आ.मंगेश चव्हाण यांनी लोंजे गावात मुक्काम ठोकला. तसेच मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली. यासोबतच लोंजे, आंबेहोळ, साईनगर गावातील कोट्यावधींच्या विकासकामांचे उद्घाटनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षातील कामांचा लेखाजोखा जनतेपर्यंत मांडण्यासाठी तसेच केलेली विकासकामे यांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे ‘गाव चलो अभियान’ राबविले…
Author: Sharad Bhalerao
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथून जवळच असलेल्या एरंडोल तालुक्यातील सावदा येथे पाळधी पोलिसांनी नाल्यालगत गावठी दारू तयार केली जात होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी धाड टाकली. धाडीत १७ हजार रुपये किमतीच्या साहित्यासह गावठी दारू ताब्यात घेतली. यावेळी तेथे तयार होत असलेली गावठी दारू तेथील नाल्यातच तात्काळ नष्ट करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी जितेश नाईक यांच्या फिर्यादीनुसार दादू उर्फ राजू गटलू मालचे (रा. सावदा, ता.एरंडोल) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो. नि. सचिन शिरसाठ यांचा मार्गदर्शनाखाली विजय चौधरी, विठ्ठल पाटील करीत आहेत.
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील श्रीखंडे परिवाराने गोमातेचा खण नारळाने ओटी भरून केलेला सन्मान व प्राणीमात्रांवर व्यक्त केलेल्या प्रेमाने गायीच्या संवर्धनाचा आगळावेगळा संदेश दिला आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश श्रीखंडे, सुभाष श्रीखंडे या दोन्ही बंधूंनी गाईला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम देऊन गरोदर गाईची खण नारळाने आप्तस्वकीय आणि ग्रामस्थांच्या साक्षीने ओटी भरली. अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास गोप्रेमी, महिला, पुरुष, बालगोपालांनी उपस्थिती दिली. या माध्यमातून शेतकऱ्यांसह इतरांना पशुपालनासह दुग्ध व्यवसाय संवर्धनाची गोडी निर्माण होऊन प्रपंच नेटका करता येईल, अशी भावना श्रीखंडे परिवाराने व्यक्त केली.
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील प्रताप महाविद्यालयाचे तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवस विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर आयोजित केले आहे. शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक आसाराम पंडित पाटील, प्रा. डॉ.ए. बी.जैन यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.ए.बी.जैन होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, कवी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संचालक प्रा.डॉ. सचिन नांद्रे, दत्त संस्था चिमणपुरी पिंपळेचे अध्यक्ष निंबा चौधरी, महिला लोकनियुक्त सरपंच वर्षा पाटील, उपसरपंच शोभाबाई पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, रासेयोचे विभागीय समन्वयक डॉ.दिनेश पाटील, सिनेट सदस्य प्रा.डॉ.संदीप नेरकर, प्राचार्य डॉ.रवींद्र सोनवणे, उपप्राचार्य डॉ.विजय मांटे, राष्ट्रीय सेवा…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील ‘महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान’ संस्थेतर्फे ‘बेसिक्स ऑफ कन्फेशनरी टेक्नॉलॉजी’ ह्या पुस्तकाच्या लेखिका प्रा.सोनल नरेश चौधरी यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. संदीप पाटील होते. यावेळी तापी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा माजी आ.कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील, महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव स्मिता पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती भारती बोरसे, चोपडा सूतगिरणीचे व्हा.चेअरमन प्रल्हादराव पाटील, ह.भ.प. महंत अशोकदास महाराज, चोपडा नगर परिषदेचे माजी गटनेते जीवन चौधरी, माजी नगरसेविका राधाताई देशमुख, माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, चोपडा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, चोपडा काँग्रेसचे शहराध्यक्ष…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील खर्दे येथे भारतीय जनता पार्टीतर्फे सुरू असलेल्या ‘गाव चलो अभियानाचा’ कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यासाठी धरणगाव तालुक्याचे उपाध्यक्ष ॲड.व्ही.एस.भोलाणे यांची नेमणूक केली होती. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गेल्या अडीच वर्षापासून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सत्तेत आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात लोकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत. तसेच सध्या सुरू असलेल्या सर्व केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेबाबत ॲड.भोलाणे यांनी माहिती दिली. तसेच ज्यांना शासनाच्या योजनेचा फायदा घ्यावयाचा असेल, त्यांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, गावातील कार्यकर्ते यांच्याशी योजनेचा लाभ…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात ‘नमो’ चषकनिमित्त लोहारा विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन स्नेहदीप गरुड, कैलास चौधरी, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषिभूषण विश्वासराव पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. स्पर्धेत मुला-मुलींची स्वतंत्रपणे मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या चित्रकला, रांगोळी तसेच विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष ए.ए.पटेल, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य सुरेश चौधरी, उत्तमराव शेळके, डॉ.देवेंद्र शेळके, शिवराम भडके, वरिष्ठ पत्रकार महेंद्र शेळके, विकास देशमुख, राहुल कटारिया, संजय पाटील, शरद देशमुख,…
साईमत, रावेर : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीने ‘गाव चलो अभियान’ ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले होते. त्यात पदाधिकाऱ्यांना ग्रामीण भागात एक दिवस वास्तव्य करून पक्षाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करावयाची होती. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ.केतकी पाटील यांनी रावेर तालुक्यातील लालमाती येथे शनिवारी, १० फेब्रुवारी रोजी मुक्काम करून अभियान राबविले. अभियानाद्वारे त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. अभियानांतर्गत डॉ.केतकी पाटील यांनी येथील आश्रमशाळेस भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांसोबत संवाद साधला. विद्यार्थिनी सोबत आदिवासी नृत्यात सहभाग घेतला. यानंतर गावातील युवकांशी संवाद साधून शासकीय योजनांनबद्दल माहिती दिली. बूथ प्रमुख, बूथ समिती व पन्ना प्रमुख, नव मतदार यांच्याशी चर्चा केली. येथील रामदेव बाबा…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी लोकशाहीचा विश्वनीय चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार आहे. सद्यस्थितीला पत्रकारांकडून समरसता, सकारात्मक पत्रकारिता अपेक्षित असल्याचे प्रतिपादन प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संलग्न पत्रकार संस्था, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार सन्मान व नवरत्न पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. पत्रकार संस्थेतर्फे उपस्थित सर्व मान्यवर व पत्रकारांचा शाल, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील सामाजिक उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देत ‘नवरत्न’ पुरस्काराने महामंडलेश्वरांच्या…
साईमत, यावल : प्रतिनिधी यावल-भुसावळ रस्त्यावर यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात, यावल तहसील कार्यक्षेत्रातील बिन शेती परवानगी मिळालेल्या, बिन शेतीची परवानगी न मिळालेल्या गट नंबरमधून तहसील आणि तलाठी कार्यालयाला सुटी असते. त्या दिवशी विकासक आणि शेतमालक उंच टेकड्यांचे जेसीपी मशिनरीच्या साह्याने उत्खनन व सपाटीकरण करून त्या मातीची सर्रासपणे वाहतूक करून आर्थिक कमाई करून शासनाची लाखो रुपयाची रॉयल्टी बुडवित आहे. त्यामुळे यावलच्या तहसिलदारांनी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यामार्फत जागांचे मोजमाप करून विकासक आणि शेत मालकाविरुद्ध दंडात्मक, फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. यावल-भुसावळ रस्त्यावर बिनशेती परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या एका गट नंबरमध्ये बिनशेतीची परवानगी मिळण्याचा आधीच उंच भागाचे जेसीपी मशिनरीच्या सहाय्याने उत्खनन करून…