लालमातीला डॉ. केतकी पाटील यांनी मुक्कामी राहून राबविले ‘गाव चलो अभियान’

0
46

साईमत, रावेर : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीने ‘गाव चलो अभियान’ ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले होते. त्यात पदाधिकाऱ्यांना ग्रामीण भागात एक दिवस वास्तव्य करून पक्षाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करावयाची होती. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ.केतकी पाटील यांनी रावेर तालुक्यातील लालमाती येथे शनिवारी, १० फेब्रुवारी रोजी मुक्काम करून अभियान राबविले. अभियानाद्वारे त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

अभियानांतर्गत डॉ.केतकी पाटील यांनी येथील आश्रमशाळेस भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांसोबत संवाद साधला. विद्यार्थिनी सोबत आदिवासी नृत्यात सहभाग घेतला. यानंतर गावातील युवकांशी संवाद साधून शासकीय योजनांनबद्दल माहिती दिली. बूथ प्रमुख, बूथ समिती व पन्ना प्रमुख, नव मतदार यांच्याशी चर्चा केली. येथील रामदेव बाबा मंदिरात महिलांसोबत स्वयंपाकात सहभागी झाले होते. बचत गटाच्या महिलांशी संवाद साधून त्यांना सरकारच्या महिलांसाठी असलेल्या स्कीमची माहिती दिली. उपस्थित महिलांसोबत त्यांचे पारंपरिक होळी नृत्यात सहभाग घेतला. गावातील खेळाडू, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्याही भेटी घेतल्या. बूथ क्र.१९ चे प्रमुख व बूथ समितीच्या सदस्यासोबत दीवार लेखन केले. गावात ‘गाव चलो अभियाना’ची पत्रके वितरीत केली. यावेळी सरकारी योजनांच्या लाभार्थीसोबत चर्चाही केली. बालक, युवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांशी सकारात्मक चर्चा झाल्या.

यावेळी रावेर भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष चेतन पाटील, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’च्या जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण, लालमातीचे गाव नियोजक दिनेश पवार, बूथ प्रमुख अनिल पवार, पन्ना प्रमुख राधेश्‍याम पवार, शाखाप्रमुख प्रकाश चव्हाण, युवा मोर्चाचे हर्षल चव्हाण, व्हॉट्सॲप प्रमुख कृष्णा पवार, गणेश पवार, बुथ सदस्य जगराम पवार, नांदुरा मांगो मोती पवार, नवलसिंग पवार, फत्तु पवार, श्रावण पवार, अनिल पवार, जयवंत पवार, गिरधारी पवार, अशोक पवार, राधेश्‍याम पवार, प्रेमचंद पवार, लक्ष्मण पवार, दरबार पवार, दिलीप चव्हाण, गोविंदा पवार, दिनेश पवार, पांडुरंग चव्हाण, हर्षल चव्हाण, सचिन पवार, जगदीश पवार, भीमसिंह पवार, मुकेश चव्हाण, भागीरथ पवार, निलेश पवार, लखन पवार, कृष्णा चव्हाण, रवींद्र पवार तर महिलांमध्ये रेषीबाई जाधव, पार्वतीबाई चव्हाण, अबेबाई चव्हाण, लिलाबाई पवार, ताईबाई पवार, देवका चव्हाण, कोकीळा सावळे, कस्तुरा पवार, केसरी पवार, नीतू पवार, वंदना राठोड, मैना पवार, गोदाबाई पवार, बन्नीबाई पवार, रूपाली धनगर, सरला चव्हाण, पूजा पवार, कलाबाई राठोड, केसरीबाई पवार आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here