साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हा.चेअरमन भीमराव शेळके होते. प्रमुख पाहुणे म्हणून गणित तज्ज्ञ तथा माजी मुख्याध्यापक नाना लामखेडे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव सागरमल जैन, सहसचिव यु.यु.पाटील, युवा नेते स्नेहदीप गरुड, संस्थेचे संचालक डॉ.राजेंद्र शेळके, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्वासराव पाटील, उपाध्यक्ष ए.ए. पटेल, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ.देवेंद्र शेळके, उत्तम शेळके, सुरेश चौधरी, डिगंबर चौधरी, रमेश शेळके, कैलास चौधरी, अमृत चौधरी, संजय पाटील, पत्रकार दिलीप चौधरी, ज्ञानेश्वर राजपूत, गजानन क्षीरसागर, हेमंत गुरव, श्री.लिंगायत, पी.व्ही.जोशी, ज्ञानेश्वर…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक तथा पत्रकार उमेश प्रतापराव काटे यांना धुळे येथील राजश्री शाहू महाराज नाट्यगृहात महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षण परिषदही आयोजित केली होती. यावेळी माजी खासदार तथा राज्य सैनिकी शाळा असोसिएशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, पोलीस उपाधीक्षक एल.एन.कानडे (नाशिक), सहकार भारतीचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख दिलीप पाटील यांच्या हस्ते श्री. काटे यांना सहपरिवार सन्मानित करण्यात आले. यावेळी उमेश काटे यांच्या समवेत शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे, गायत्री काटे, वैशाली सोनवणे, निकिता काटे, शाहूराजे काटे, दक्षता काटे आदींनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी प्रमुख पाहुणे…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील वीज महावितरण कंपनीच्या विद्युत पुरवठा करणारा ट्रान्सफार्मर मध्यरात्री अचानक नादुरुस्त झाला होता. त्यामुळे पाळधीसह परिसरातील गावे मध्यरात्रीपासून अंधाऱ्यात होते. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले होते. जळगाव येथील अधिकारी येऊन त्यांनीही ते सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. हे सर्व ट्रान्सफॉर्मर जुने झाले आहेत. यापूर्वीही २०१७ मध्ये अशीच समस्या निर्माण झाली होती, अशीही नागरिकांमध्ये चर्चा होती. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे वीज महावितरण कंपनीचे कार्यालय आहे. येथूनच परिसरातील गावांना तीन विद्युत ट्रान्सफार्मरद्वारे विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यातील एक ट्रान्सफॉर्मर मध्यरात्री अचानक नादुरुस्त झाला होता. त्यामुळे पाळधीसह परिसरातील गावातील वीज पुरवठा ठप्प…
साईमत, पहुर,ता.जामनेर : वार्ताहर देशात भाजपातर्फे ‘गाव चलो अभियान’ राबविले जात आहे. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्र्त प्रतिसाद मिळत आहे. अशातच मंत्री ना.गिरीष महाजन आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या सुचनेनुसार जामनेर तालुक्यातील प्रत्येक गावात अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत पहूरपेठ येथील बुथ क्र.१८६ मध्ये प्रवासी कार्यकर्ते म्हणून भाजपाच्या महिला संघटनेच्या तालुका सरचिटणीस वैशाली चौधरी यांची उपस्थिती लाभली. यावेळी वैशाली चौधरी, भाजपा कामगार मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस तथा बुथ प्रमुख शरद बेलपत्रे यांच्यासह बुथ समितीतील सदस्यांनी ‘घर चलो अभियान’ राबविले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षाच्या कालावधीत अनेक विकासकामे केली. गोरगरीब, पीडित, वंचित तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना राबविल्या. त्याची माहिती…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीनंतर आपले करिअर निवडताना आपल्याला हवे ते क्षेत्र निश्चित निवडावे. परंतु त्यापूर्वी त्या क्षेत्रात आपल्याला यश न मिळाल्यास प्लॅन ‘बी’ तयार असू द्यावा, असे मत हरताळकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित हरताळकर यांनी व्यक्त केले. चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात दहावीचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात नुकताच झाला. त्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजनासह दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. याप्रसंगी चैतन्य पाटील, जैनब तडवी, सत्यम सोनवणे, तनीष लाठी, लतिका निकम, अवनी वानखेडे, तेजस्विनी पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगतातून त्यांच्या बालांगणापासून तर दहावीपर्यंतचे अनुभव व्यक्त करुन आपल्या भावनांना मोकळी वाट…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय ‘महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक पुरस्कार’ ब्राम्हणशेवगे येथील माध्यमिक शाळेचे उपक्रमशिल शिक्षक वाय.टी.पाटील यांना धुळे येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. पुरस्कारासाठी राज्यातून ४४ जण मानकरी ठरले होते. त्यात त्यांचाही समावेश होता. हा पुरस्कार नाशिक विभागाचे शिक्षक आ.सत्यजित तांबे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ब्राम्हणशेवगे पंचक्रोशीतून वाय.टी.पाटील यांचे कौतुक होत आहे.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांच्यावर गेल्या ७ फेब्रुवारी रोजी काही अज्ञातांनी गोळीबार करुन त्यांचा खून केला होता. त्यानंतर गोळीबार करणारे आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चाळीसगाव उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले होते. त्यानंतर अखेर याप्रकरणी पथकाने लोणीकंद परिसर पिंजून काढून दोन जणांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले. दोघा आरोपींना चाळीसगाव शहर पो.स्टे.ला पुढील तपास कामी ताब्यात देण्यात आले आहे. सविस्तर…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी मातृभूमीचे महत्त्व आणि विविधतेत एकता असा वारसा जपणाऱ्या भारत देशात जनजागृतीचा प्रसार करण्यासाठी श्रीमती पी.एन.दोशी महिला महाविद्यालयाच्या २१ धाडसी युवती २१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत गुवाहाटी ते गेटवे २ हजार ७५१ कि.मी.चा सायकल प्रवास करीत आहेत. युवतींचा हा सायकल प्रवास २६ दिवस सुरु राहणार आहे. एस. पी. आर. जे. कन्याशाळा ही शिक्षणसंस्था महिला शिक्षणाचे कार्य अविरत १०० वर्षे करीत आहे. शतकमहोत्सवी वर्षाचे महत्त्व साधून पी.एन.दोशी महिला महाविद्यालयाच्या महत्त्वाकांक्षी विद्यार्थी, शिक्षक व प्राचार्यांनी चौथे सायकलेथॉन आयोजित केले आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पनेतून महाविद्यालयाच्यावतीने मुलींसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्यात जनजागृती केली जाते. महाविद्यालयाच्या अनोख्या उपक्रमाचे पालकांसह…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या यावल तालुक्यातील आमोदा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या १२ जागांसाठी रविवारी मतदान होऊन सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. एक जागेची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित ११ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात सर्वसाधारण गटात ४, महिला प्रवर्गात ३ व इतर मागास प्रवर्गात एक अशा ८ जणांचा पराभव झाला. यावल तालुक्यातील आमोदा येथील विकास सोसायटीची निवडणूक लागली होती. त्यासाठी १२ जागा होत्या. त्यात सर्वसाधारण ८ जागांसाठी १२ उमेदवार, महिला राखीव दोन जागांवर ५ उमेदवार , इतर मागास प्रवर्गाच्या १ जागेसाठी २ उमेदवार होते. विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून रवींद्र आनंदा सपकाळे हे बिनविरोध…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी येत्या १९ फेब्रुवारी रोजी तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात शिवजयंती समिती स्थापन केली आहे. त्यात शिवजयंती समितीच्या अध्यक्षपदी लव झाडगे तर कार्याध्यक्षपदी चेतन सावकारे यांची निवड केली आहे. शहरातील सर्वपक्षीय व सर्व संघटनांची बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी भाजपाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी होते. यावेळी राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, मनसेचे शहराध्यक्ष राहुल सोनटक्के, शिवसेना उ.बा.ठा गटाचे शहर प्रमुख दीपक धांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे, युवा आधार प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष रितेश नायके आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते. शिवजयंती उत्सव समिती-२०२४ भुसावळची कार्यकारिणी अशी अध्यक्षपदी लव वामन झाडगे, उपाध्यक्षपदी चेतन तळेले,…