आमोदा विकासोचा निकाल जाहीर

0
3

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

येथून जवळच असलेल्या यावल तालुक्यातील आमोदा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या १२ जागांसाठी रविवारी मतदान होऊन सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. एक जागेची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित ११ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात सर्वसाधारण गटात ४, महिला प्रवर्गात ३ व इतर मागास प्रवर्गात एक अशा ८ जणांचा पराभव झाला.

यावल तालुक्यातील आमोदा येथील विकास सोसायटीची निवडणूक लागली होती. त्यासाठी १२ जागा होत्या. त्यात सर्वसाधारण ८ जागांसाठी १२ उमेदवार, महिला राखीव दोन जागांवर ५ उमेदवार , इतर मागास प्रवर्गाच्या १ जागेसाठी २ उमेदवार होते. विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून रवींद्र आनंदा सपकाळे हे बिनविरोध विजयी झाले होते. दरम्यान, रविवारी सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. चार वाजेपर्यंत शांततेत मतदान झाले. नंतर लगेच मतमोजणीला सुरुवात होऊन दोन तासात निकाल लागला. त्यात सर्वसाधारण मतदार संघातून भूषण पाटील २५० मते, यावल बाजार समितीचे संचालक उमेश पाटील २४१, मिठाराम सरोदे २३४, चंद्रकांत पाटील २२५, पंकजकुमार पाटील २११, एकनाथ लोखंडे १९५, महेश आमोदकर १६४, हेमराज पाटील १५१ हे विजयी झाले.

महिला राखीवमध्ये मीनाक्षी ललित महाजन १९३, मनीषा तुषार चौधरी १६३ मते घेऊन विजयी झाल्या. इतर मागासवर्ग प्रवर्गात धनंजय शेनफडू चौधरी हे २५३ मतांनी विजयी झाले. पराभूत झालेल्या ८ पैकी बहुतांश उमेदवार नवखे होते. निकाल जाहीर होताच उमेदवार समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. निवडणूक अधिकारी म्हणून के.व्ही.पाटील नंदकिशोर मोरे, दस्तगीर तडवी, विशाल भिरूड, हेमंत वारके आदींनी काम पाहिले. यावेळी फैजपूरचे एपीआय निलेश वाघ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here