Author: Sharad Bhalerao

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी येथील म्युनिसिपल हायस्कुलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती पाठ्यपुस्तक अभिवाचन स्पर्धेत शहरासह तालुक्यातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र तर पाच गटातून २० विजेत्यांना सन्मानचिन्हासह प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, मुख्याध्यापक ललितकुमार फिरके, माजी नगरसेवक दीपक धांडे, योगविद्या समितीच्या प्रभारी महानंदा पाटील, वेलनेस फाउंडेशनचे प्रा. निलेश गोरे, भूलतज्ज्ञ डॉ. मिलिंद धांडे, संस्थाध्यक्ष दंगल पाटील, समन्वयक संजीव पाटील, सचिव डॉ. जगदीश पाटील उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हा आणि तालुका स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून ‘राज्य रयतेचे-जिजाऊंच्या शिवबाचे’ अंतर्गत १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ‘स्वराज्य सप्ताह’ आयोजित केला होता. त्यात विविध उपक्रम साजरे केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दिली. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ‘स्वराज्य सप्ताह’ साजरा करून महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस जोडला आहे. पक्षाकडून शिवरायांनी स्थापन केलेले रयतेचे राज्य व त्यामधील संकल्पना लोकांसमोर मांडणे, यासाठी शिवराय केंद्रीत विविध उपक्रम राबविण्यात आल्याचेही जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सांगितले. स्वराज्य सप्ताहात मुक्ताईनगर येथील…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी गेल्या दोन वर्षांपूर्वी येथील नगरपरिषदेने ३ कोटी १७ लाख ६२ हजार ३१५ रुपये खर्च करून विकसित कॉलनी भागात नवीन पाईपलाईन टाकली आहे. ठेकेदाराने नवीन पाईपलाईनचे काम ९० टक्के चुकीच्या पद्धतीने आणि अटी शर्ती खड्ड्यात घालून केल्याने पाईपलाईनचे ठिकठिकाणी बारा वाजले आहेत. आता फैजपूर रस्त्यावर हॉटेल पूर्णब्रह्माजवळ पाईपलाईन लिक झालेली असल्यामुळे दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी गटारीत वाहून जात असल्याने पाण्याची नासाडी होत आहे. याकडे यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, पाणीपुरवठा विभाग प्रमुख दुर्लक्ष करून पाईपलाईन दुरुस्त करत नसल्याने पर्यायी नागरिकांना अत्यल्प पाणीपुरवठा आणि तो सुद्धा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान,सहाय्यक आयुक्त…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यात वैज्ञानिक गोष्टींचा प्रचार, प्रसार व्हावा या पार्श्‍वभूमीवर येथील उपक्रमशील शिक्षक कृती समितीने इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची नुकतीच भेट घेऊन तालुक्यात होत असलेल्या विज्ञानाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी तालुक्यात होत असलेल्या वैज्ञानिक उपक्रमाचे कौतुक केले. रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे चेअरमन डॉ. चंद्रमौली जोशी, इस्त्रोचे माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत जोशी हे रेल्वेने अहमदाबादकडून जळगावकडे जात होते. यावेळी अमळनेर रेल्वे स्टेशनवर दोन्ही शास्त्रज्ञांचे कृती समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले. कृती समितीत तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे, तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष डी.ए.धनगर, विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, गणित शिक्षक ए.बी.धनगर, सदस्य नेहा पाटील तसेच इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामधून स्वयंसेवकांचा व्यक्तिमत्व विकास होतो. आपण समाजाचा एक अविभाज्य घटक असून समाजाचे देणे लागतो. त्यासाठी रासेयोच्या प्रत्येक स्वयंसेवकाने समाजाची सेवा करण्याचे तत्त्व अंगीकारावे, असे प्रतिपादन खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांनी केले. जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी शिबिराचा चिमणपुरी पिंपळे येथे नुकताच समारोप करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. ए. बी.जैन होते. सात दिवसाच्या शिबिराचा १२५ स्वयंसेवकांनी लाभ घेतला. शिबिरात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ.जैन यांनी विविध कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. शिबिरात स्वयंसेवकांनी…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी ‘शिवचरित्रातून’ प्रेरणा घेऊन जीवनाचे ध्येय निश्‍चित करावे, असे प्रतिपादन शिवचरित्राचे अभ्यासक तथा प्रचारक ह. भ. प. संजीव सोनवणे यांनी केले. तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती उत्सवांतर्गत शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिवचरित्रातील विविध प्रसंग आपल्या ओघवत्या वाणीतून जसेच्या तसे विद्यार्थ्यांसमोर उभे केले. त्यात महाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाचे सुंदर शब्दचित्रण केले. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांसह शिक्षक प्रसंगातून प्रेरित झाले. यावेळी व्याख्याते ह.भ.प. संजीव सोनवणे यांचे शाळेचे मुख्याध्यापक आर.पी. चौधरी यांनी स्वागत केले. यावेळी चहार्डी गटाचे केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे,…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील बी.पी. आर्ट्स, एस.एम.एस. सायन्स अँड के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आदर्श गाव पाटोदा, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजी नगर येथे काढण्यात आली होती. राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करीत असताना प्रत्यक्ष जाऊन ग्रामपंचायतीच्या कार्याचा कामाचा अनुभव घेता यावा, यासाठी महाराष्ट्रातील आदर्श गाव पाटोदा येथे सहल काढण्यात आली. सहलीत विविध ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांनी पाहणी करुन सहलीचा आनंद लुटला. आदर्श गावाची संकल्पना ज्यांनी प्रत्यक्ष कृतीतून उतरवून त्या गावाला देशाच्या नकाशावर नेले त्या भास्करराव पेरे पाटील यांचे खऱ्या अर्थाने आदर्श गावासारखे आदर्श विचार अनुभवीयुक्त ज्ञान विद्यार्थ्यांना ऐकायला मिळाले. यावेळी भास्करराव…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील महाराणा प्रताप गृहनिर्माण सोसायटीच्या निवडणुकीसाठी शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी करण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकास कामांना, पारदर्शकतेला मतदारांनी एकतर्फी भरघोस असा कौल देऊन पसंती दिली. निवडणुकीत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले. मात्र, सभासदांनी कै. अण्णासाहेब पाटील विकास पॅनलला एकतर्फी भरघोस कौल दिला. निवडणुकीत विरोधकांना साधे खातेही उघडता आले नाही. विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते अशी- संजयसिंग ठाकरे ३५५, देवेंद्रसिंग पाटील ३५३, कोमलसिंग पाटील ३४७, मंगेश पाटील ३४७, अरुण पाटील ३३३, भाऊसाहेब जगताप ३२६, शैलेंद्रसिंग दात्रे ३२६, विनयसिंग पाटील ३२५, मधुकर पाटील ३२२, आबा कच्छवा ३१८, निलेश राजपूत…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कुलचे कलाशिक्षक सुनील डी.भिवसने यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीत खडूच्या माध्यमातून ‘सुवर्णयुग माझ्या शिवबाचं’ कलाकृतीचा सुंदर असा प्रसंग सायंकाळी रयतेच्या शेत शिवारात फेरफटका मारताना छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे शेतकरी यांचा हूबेहूब, बोलका सुंदर असा प्रसंग रेखाटला आहे. असे मनमोहक सर्वांना आवडणारे चित्र पाहून विद्यार्थ्यांसह पालक भारावले आहेत. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेश देशमुख, व्हा.चेअरमन विलास जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे वासुदेव महाजन, मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे,…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालय आणि जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवती सभेच्या ऋतुमती अभियानाअंतर्गत शुक्रवारी, १६ फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी होते. वक्त्या म्हणून डॉ. योगिता काटे, समुपदेशन तज्ज्ञ उज्ज्वला पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार, युवतीसभा प्रमुख डॉ. प्रिती रावतोळे, डॉ. क्रांती क्षीरसागर उपस्थित होते. कार्यक्रमास महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. स्मिता…

Read More