Author: Sharad Bhalerao

साईमत, यावल : प्रतिनिधी येथील नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रभागा-प्रभागात मोकाट असलेली हजारो डुकरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? असा प्रश्‍न उपस्थित होत असला तरी पशुसंवर्धन विभाग अद्यापही अनभिज्ञ राहिला आहे. कोणी म्हणतो आफ्रिकन स्वाइन फिवरसदृश्‍य आजाराने डुकरांचा मृत्यू झाला. त्यामुळे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. याकडे मात्र यावल नगरपरिषद संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चर्चिले जात आहे. तसेच नगरपालिकेच्या कार्यवाहीबाबत संशय व्यक्त केला जात आहे. सविस्तर असे की, यावल नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात गेल्या एक दीड महिन्याच्या कालावधीत अज्ञात आजारामुळे ८०० डुकरे मेल्याचे समजले. यावल शहरात ठिकठिकाणी डुकरे अदृश्‍य झाल्याने नागरिकांमध्ये समाधानकारक चर्चिले जात आहे. असे असले तरी डुकरे अज्ञात आजारामुळे मेल्याबाबत…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरातील बोदवड रस्त्यावरील वात्सल्य हॉस्पिटलजवळ २४ वर्षीय युवकाचा इलेक्ट्रिक मोटरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली. दरम्यान, याप्रकरणी गणेश महाजन यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मुक्ताईनगर शहरातील बोदवड रस्त्यावरील वात्सल्य हॉस्पिटलजवळ प्रदीप नाईक यांच्या दुकानाचे बांधकामाच्या ठिकाणी राहुल योगेश माळी (वय २४, रा.जुने गाव, मुक्ताईनगर) हा इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याला शॉक लागल्याची घटना २७ फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता पडली. यानंतर राहुल माळी याला मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पुढील तपास हवालदार चव्हाण करीत…

Read More

साईमत, रावेर : प्रतिनिधी रावेर पोलिसांनी एका मोटरसायकल चोरट्याला अटक करून त्याच्याकडून पाच विविध कंपन्यांच्या मोटर सायकली ताब्यात घेतल्या आहे. हा गुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आला आहे. संबंधित चोरट्याकडून पाचही मोटरसायकल ताब्यात घेण्यात आल्या आहे. त्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. सविस्तर असे की, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर रुजु झाल्यापासून अवैध गुरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची संक्रांत सुरू आहे. अशातच मोटरसायकल चोरीचा गुन्हा रावेर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे आरोपी अजय वाघोरे (वय २७, रा.भोर, रेल्वे स्टेशन, रावेर) हा एक फॅशन प्रो कंपनीची (क्र.एमएच १९ बीआर ५२६९) ही मोटर सायकल चोरून आणलेली…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी तालुक्यात २६ फेब्रुवारी रोजी बेमोसमी पाऊस पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात गारपीट व वादळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये मका, ज्वारी, हरभरा, केळी, दादर व गहू असे काढणीवर आलेल्या पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी, अशा आशयाचे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन नायब तहसीलदार आर. आर. महाजन यांनी स्वीकारले. तालुक्यात २६ रोजी रात्री अचानक वादळ व गारपीटसह पाऊस आल्याने तालुक्यातील ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तयार झालेली पिके जमीनदोस्त झाली असल्याने त्यांच्या पुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेती…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विजय नाना पाटील आर्मी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी कमांडट सुभेदार मेजर नागराज पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार मेजर श्रीराम पाटील, ज्येष्ठ शिक्षिका एस.पी.अहिरे होत्या. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शिक्षक डी. डी.घोडेस्वार, सांस्कृतिक विभाग प्रमुख शरद पाटील, संगणक शिक्षक व्ही. डी.पाटील होते. सर्वप्रथम थोर साहित्यिक वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांनी केले. इयत्ता सहावीचे विद्यार्थी भूमित धनगर आणि नेहान माळी यांनी कविता सादर केल्या.त्यानंतर शरद पाटील यांनी मराठी भाषेतील गंमती जमती सांगितल्या. त्याचबरोबर वि. वा. शिरवाडकर यांची ‘कणा’ कविता त्यांनी सादर केली.…

Read More

साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर चोपडा तालुक्यात सोमवारी, २६ फेबु्रवारी रोजी झालेल्या अवकाळी गारपीट आणि पावसाने तालुक्यातील निमगव्हाण, चुंचाळे, मामलदे, तांदळवाडी, डोंदवाडे, चहार्डी, हातेड, संपुले आणि तालुक्यातील इतर भागात विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले दादर, मका, हरभरा, बाजरी, गहू आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशा आशयाचे निवेदन चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (अजित पवार गट) निवासी नायब तहसीलदार महाजन यांना देण्यात आले. निवेदनावर जेडीसीसी बँकेचे संचालक घनश्‍याम अग्रवाल, रा.काँ.चे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नारायण पाटील, चोपडा कसबेचे चेअरमन प्रवीणभाई गुजराथी, रावेर मतदारसंघाच्या महिला…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशनचे संस्थापक अशोक गणेश राठोड यांना गुजरात येथील वेलनेस फाउंडेशनतर्फे २०२४ चा ‘विश्‍व रत्न सन्मान’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अशोक राठोड यांना हा पुरस्कार देण्यात आला. ते आपल्या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात नेहमीच नवनवीन उपक्रम आणि समाजोपयोगी कार्य करतात. त्यांच्या विविध कार्याची व कामाची दखल घेऊन वेलनेस फाउंडेशन गुजरातच्या संस्थापिका सोमिया बाजपाई आणि सह संस्थापक हर्षित बाजपाई यांनी ‘विश्‍व रत्न सन्मान २०२४’ पुरस्कार राठोड यांना ऑनलाइन माध्यमाने प्रदान केला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल अशोक राठोड यांचे मित्र परिवारासह तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयाद्वारे जागतिक पातळीवर वैश्‍विक सद्भावनेचे प्रयत्न होत आहेत. स्थानिक अमळनेर सेवाकेंद्रामार्फत होत असलेल्या नियोजित ब्रह्माकुमारीज्‌ शांती सरोवर राजयोग अभ्यासकेंद्रामुळे परिसरात वैश्‍विक शांतीचे वातावरण तयार होईल, असा संदेश माऊंट आबूतील राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोषदीदीजी यांनी दिला. ब्रह्माकुमारीज्‌तर्फे गलवाडे रोड स्थित नवीन राजयोग सेवास्थानाचे भूमिपूजन केले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. समाज परिवर्तन करत असतांना अवगुणमुक्त, व्यसनमुक्त आणि विकार मुक्त समाज व्हावा, यासाठी परिसरात अमळनेर सेवाकेंद्रामार्फत होत असलेल्या विशेष प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. परिसरात असलेल्या शांतीपूर्ण आणि नैसर्गिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी लाभलेल्या वातावरणात राजयोग अभ्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारकरित्या साधकांना करता येईल, असेही त्या म्हणाल्या.…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील शेंदुर्णी येथील शिवभोजन केंद्राला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते शाळेच्या मुलांना मोफत शिवभोजनचे वाटप करण्यात आले. शिवभोजन केंद्राचे संचालक विलास पाटील यांच्या शिवभोजन केंद्राच्या ठिकाणी अरविंद चितोडीया यांनी भेट देऊन शिवभोजन थाळ्यांचे वाटप केले. शासनाने सुरू केलेली शिवभोजन थाळी सर्वसामान्य व्यक्तीला दहा रुपयात परवडणारी आणि उच्च दर्जाचे जेवण मिळत असल्याची भावना चितोडीया यांनी व्यक्त केली. शासनाच्या माध्यमातून मिळत असलेल्या शिवभोजन थाळीची पाहणी करण्यासाठी आणि योजनेचा सर्वसामान्य जनतेला फायदा मिळत आहे की नाही त्याची माहिती घेण्यासाठी चितोडिया येथे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण पाटील, विनोद सोनवणे,…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या शिक्षकांसाठी ‘शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण शिबिर-२०२४’ २६ ते २८ फेब्रुवारी २०२४ यादरम्यान रोज सकाळी १० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत जामनेरातील इंदिराबाई ललवाणी विद्यालयात शिबिराला प्रारंभ झाला आहे. शिबिराच्या दुसऱ्या टप्प्यात जामनेर न्यू इंग्लिश स्कुलचे व्ही.डी.पाटील, आर.डी.येवले, पी.एम.पाटील, ललित लामखेडे, के.एस.शर्मा, एस. ए.सुरवाडे, एस.एस.शिरसाट, एस.एस.जंजाळ, एस.एस.भोंडे, एस.डी.पेडगावकर, एन. यू.बढे, पी.एम.पांढरे, व्ही.ए.पाटील, जी. आर. धांडे, के. व्ही.पाटील, आर.एस.ठाकूर, आर.बी.पाटील, ए.आर. टहाकळे, सौ.डी.बी.इंगळे, डी.वाय.बडगुजर, जी.एफ.पाटील आदी शिक्षकांनी…

Read More