मुक्ताईनगर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

0
2

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

शहरातील बोदवड रस्त्यावरील वात्सल्य हॉस्पिटलजवळ २४ वर्षीय युवकाचा इलेक्ट्रिक मोटरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली. दरम्यान, याप्रकरणी गणेश महाजन यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मुक्ताईनगर शहरातील बोदवड रस्त्यावरील वात्सल्य हॉस्पिटलजवळ प्रदीप नाईक यांच्या दुकानाचे बांधकामाच्या ठिकाणी राहुल योगेश माळी (वय २४, रा.जुने गाव, मुक्ताईनगर) हा इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याला शॉक लागल्याची घटना २७ फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता पडली. यानंतर राहुल माळी याला मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पुढील तपास हवालदार चव्हाण करीत आहे.

वाहनाच्या धडकेत मुलाचा मृत्यू

दुसऱ्या घटनेत मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथील सागर साहेबराव चंदनकर (वय १६, रा.चिखली, ता.मुक्ताईनगर) हा चिखली गावासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ हा रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिल्याची घटना मंगळवारी, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता घडली होती. यामध्ये सागरचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अक्षय चंदनकर यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय रघुनाथ पवार करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here