खुबचंद सागरमल विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : वन्यजीवांच्या अभ्यासातून औषधी संशोधनांना दिशा मिळते. पर्यटनाला चालना मिळून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते. त्यामुळे पर्यावरण संतुलनाची ‘वन्यजीव संरक्षण’ गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन पर्यावरणप्रेमी लक्ष्मीकांत महाजन यांनी केले. खुबचंद सागरमल विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेतर्फे वन्यजीव सप्ताहानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना ‘वन्यजीवांचे महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज’ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. वन्यजीव म्हणजे निसर्गात स्वाभाविकरित्या राहणारे प्राणी, पक्षी, मासे, कीटक आणि इतर जीव. हे सर्व पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत.अन्नसाखळी व अन्नजाळीद्वारे पर्यावरणातील संतुलन राखतात. वाघ, सिंह यांसारखे शिकारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात तर शाकाहारी…
Author: Sharad Bhalerao
पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी शिफारस दिल्याने निवड साईमत/जालना/प्रतिनिधी : “महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान” ह्या राज्यस्तरीय सांस्कृतिक संस्थेचे राज्य उपाध्यक्ष राम घोडके यांची जालना जिल्ह्याच्या राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत आणि साहित्यिक मानधन निवड समितीवर पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी शिफारस दिल्याने त्यांची निवड समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. गेल्या ३० वर्षापासून ते लोक-कलावंतांच्या प्रश्नांसाठी झगडत आहेत. उपोषण, मोर्चा व आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जालना जिल्ह्यातील अनेक कलावंतांना तसेच दिवंगत कलावंतांच्या पत्नीस न्याय मिळवून दिला आहे. संस्थेचे जालना जिल्हाध्यक्ष म्हणून सुमारे २५ वर्ष त्यांनी कार्य केले. ते या वयातही सक्रिय आहेत. त्यांची सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे संस्थाध्यक्ष शाहीर सुरेशचंद्र आहेर, सरचिटणीस अशोक भालेराव,अनिल…
डॉ. प्रकाश आमटे यांचा आशावाद ; डॉ. नितीन विसपुते लिखित पुस्तकाचे प्रकाशन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगावातील चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते लिखित “व्यसनमुक्तीवर बोलू काही” पुस्तकात सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत व्यसनमुक्तीविषयी उपयुक्त माहिती आणि प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे हे पुस्तक महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती कार्याला नक्कीच बळ देईल आणि जनजागृतीस हातभार लावेल, असा आशावाद डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केला. व्यसनमुक्त राहण्यासाठीचा संदेश देताना त्यांनी आपल्या अनुभवातून प्रेरक विचार मांडले. पुस्तकाचे अवलोकन केल्यानंतर ते बोलत होते. समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर उपाय शोधत, जनजागृतीचा दीप पेटवणारे जळगावातील चेतना व्यसनमुक्ती केंद्राने आणखी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते…
महिलांनी आनंदी वातावरणात साजरी केली सुवर्ण परंपरा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : अहिर सुवर्णकार महिला मंडळातर्फे कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यांत “भुलाबाई सुवर्ण उत्सव” मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. परंपरा, संस्कृती आणि आनंद यांचा सुंदर संगम सोहळ्यात अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. शरयू विसपुते, रूपाली वाघ, मीनाक्षी वाघ, मंडळाच्या अध्यक्षा रंजना वानखेडे, उपाध्यक्षा संगीता विसपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्ज्वलन व संत नरहरी महाराज पूजन तसेच भुलाबाई पूजनाने करण्यात आला. त्यानंतर रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम, आकर्षक भुलाबाई गीत गायन, लयबद्ध नृत्य स्पर्धा तसेच हास्य-आनंदाने भारलेल्या मनोरंजनात्मक खेळांद्वारे उपस्थित महिलांनी कार्यक्रमाला अविस्मरणीय रंग भरले. उत्सवात एक मिनिटात फुगे फुगवणे, शब्दखेळ, गरबा-दांडिया स्पर्धा,…
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : जेडीसीसी बँकेच्या जळगाव नवीपेठेतील ‘दगडी बँके’च्या इमारत विक्रीच्या प्रस्तावापाठोपाठ आता जळगाव मधीलच आणखी एका जुन्या वास्तूच्या विक्रीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग या संस्थेची इमारत विक्री करण्यासाठी संस्थेचे सर्वेसर्वा संजय पवार यांनी प्रयत्न चालवले आहे. दगडी बँक इमारत विक्री प्रस्ताव प्रकरण प्रचंड गाजत असताना आजच सहकारी कॉटन मार्केटिंगच्या इमारत विक्री करण्याचा विषय उजेडात आला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी १९४८ मध्ये स्थापन झालेली ही संस्था आहे. या संस्थेच्या उभारणीत अथवा या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष कै.रामरावजी जीभाऊ पाटील होते. त्यांच्यानंतर कै.दामूभाऊ पांडू पाटील यांनी संस्थेची धुरा सांभाळली. संस्थेला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी कै. उदयसिंग अण्णा पवार…
अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध जिल्हा पोलीस दलाने उचलले कडक पाऊल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्हा पोलीस दलाने अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कडक पाऊल उचलले आहे. १६ ते ३० सप्टेंबर या विशेष मोहिमेत १० देशी बनावटीची अग्निशस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. तसेच १२ आरोपींविरुद्ध ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. कारवाईत अटक झालेल्या अनेक आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यात पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी समाधान निकम याच्यावर आधीच ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच जळगाव शहरातील गुन्ह्यातील आरोपी युनूस पटेलवर २ तर विठ्ठल भोळेवर ३ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे कारवाईचे महत्त्व वाढले आहे. पोलिसांनी वेळेत…
गेल्या ३ महिन्यात २ लाखांवर ग्राहक सहभागी ; पर्यावरणस्नेही ७ लाखांवर ग्राहकांना ८ कोटींचा वार्षिक फायदा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : वीजबिलांच्या छापील कागदांचा वापर कमी करण्यासाठी वीज महावितरणने सुरू केलेल्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल दोन लाख तीन हजार ३४० ग्राहकांनी योजनेत सहभाग घेतला आहे. वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत, केवळ ‘इमेल’ व ‘एसएमएस’ द्वारे बिल पाठविण्याचा पर्याय निवडून सोमवारी, ६ ऑक्टोबरपर्यंत सात लाख हजार ९२४ पर्यावरणस्नेही ग्राहक योजनेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांना ८ कोटी ४८ लाख ३० हजार ८८० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. गो-ग्रीन योजनेतील ग्राहकांचा वाढता सहभाग स्वागतार्ह आहे. पर्यावरणाला…
साईमत/जळगाव/प्रतिनिधी : डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) येथे नवरात्र उत्सवानिमित्त दोन दिवसीय गरबा स्पर्धेने धुम उडवत एफवायबीकॉमच्या वर्गातील नेहा सुनील सपकाळे हिने ‘गरबा क्वीन’चा मान पटकाविला. टीवायबीएस्सीच्या वर्गातील तन्वी नंदकिशोर महाजन हिला ‘बेस्ट परफॉर्मन्स’ तर टीवायबीकॉमच्या वर्गातील दिक्षा नारायणराव शिंदे हिला ‘बेस्ट कॉस्च्युम’ पारितोषिक मिळाले. तसेच टीवायबीए वर्गातील दीपाली विनोद सोनी, एसवायबीकॉमच्या वर्गातील तृप्ती भरत सोनार यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. महाविद्यालयात नवरात्र उत्सवानिमित्त कला व संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी ‘गरबा प्रशिक्षण कार्यशाळा’ आयोजित केली होती. कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींसाठी कला मंडळातर्फे ‘गरबा स्पर्धा’ घेण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे शहरातील एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे होत्या.…
जलसंपदा मंत्री गिरीष महाजनांच्या भूमिकेची उत्सुकता साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जळगावच्या नवी पेठेतील ‘दगडी बँके’च्या इमारत विक्रीच्या प्रस्तावाबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. या विक्री प्रस्तावावर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त करत आपला विरोध स्पष्ट केला आहे. तर यापूर्वी ज्येष्ठ संचालक आ. एकनाथराव खडसे, आ.अमोल पाटील यांनीही विरोध दर्शविला आहे. ही स्थिती पाहता भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दगडी बँक इमारत विक्रीच्या प्रस्तावावर जिल्ह्याभर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. सर्वात आधी आ.खडसे यांनी जाहीररित्या आपला विरोध दर्शविला होता. त्यांच्या विरोधाला जिल्हा बँकेचे…
तेरा जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर साईमत/जळगाव/प्रतिनिधी : देवीच्या विसर्जन मिरवणुकीत धक्काबुक्की लागण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना सोमवारी, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. त्यात तेरा जण जखमी झाले आहे. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथे घडली. प्राप्त माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथे देवीच्या विसर्जन मिरवणुकीत धक्काबुक्की लागण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. त्यात दोन्ही गटातील १३ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या सर्वांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यावेळी दोन्ही गट पुन्हा रुग्णालयात समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांना पाचारण…