जी.एच. रायसोनी महाविद्यालयात आयोजित ‘युवारंग’ महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : खान्देशातून भास्काराचार्य, साने गुरूजी, शिरीष कुमार, बालकवी ठोंबरे, लता मंगेशकर, भालचंद्र नेमाडे, अभिनेत्री स्मिता पाटील, कवि ना.धो. महानोर, प्रतिभाताई पाटील, उद्योजक भंवरलाल जैन, शितल महाजन यांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी आपल्या क्षेत्रात नाम कमावले आहे. आजच्या तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन व्यसनमुक्त राहून ज्ञान देशासाठी अर्पण करावे, एक क्षेत्र निवडून त्यात सातत्याने सर्वोच्च स्थानी पोहचण्याचा प्रयत्न करावा, सोबतच आत्मविश्वास बाळगावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी केले. खान्देशातील प्रतिभावंत व्यक्तिमत्त्वांना प्रेरणा मानून युवारंग युवक महोत्सवाला गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी जळगावात भव्यपणे प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री गिरीष महाजन यांच्या…
Author: Sharad Bhalerao
सहकार विभागाने कॉटन मार्केटिंग इमारत विक्रीची परवानगी नाकारली साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : येथील जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग संस्थेच्या इमारत विक्रीचा प्रस्ताव विविध त्रुट्या दर्शवित सहकार विभागाच्या जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने नाकारला आहे. सहकार विभागाच्या अशा भूमिकेमुळे संस्थेची मालमत्ता (इमारत) विक्री करण्याचे संबंधित संस्था चालकांचे मनसुबे का प्रकारे उधळले गेले आहे. प्राप्त माहितीनुसार, जळगाव शहराच्या मोक्याच्या भागात असलेली जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग संस्थेची इमारत विक्री करण्याची परवानगी संबंधित संस्थेच्या चालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे मागितली होती. परवानगी संबंधात आलेल्या प्रस्तावाची जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सखोल चौकशी केली. त्यात संस्थेची इमारत विक्री करण्याची कारणे परवानगी प्रस्तावात दिलेली नाही. कॉटन मार्केटिंग संस्थेचे दोन वर्षापासून शासकीय लेखापरीक्षणही…
रा.काँ.एस.पी.गटाच्या जिल्हा बैठकीत याद्यांमधील घोळ मांडला साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील आकाशवाणी चौकाजवळील रा.काँ.शरद पवार गटाच्या कार्यालयात बुधवारी, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तालुकाध्यक्षांची जिल्हा बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील होते. बैठकीला प्रदेश सचिव रवींद्र पाटील, दिलीप खोडपे उपस्थित होते. बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादीतील दुबार नावे, वगळलेली नावे, नवीन जोडलेली नावे यांच्यावर हरकती घेण्यासाठी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. सर्व तालुकाध्यक्षांना हरकतींसाठी अभ्यासपूर्वक तयार केलेल्या याद्या दिल्या. आगामी दिवसांमध्ये प्रत्येक तालुकास्तरावर यासंदर्भातील हरकती घेण्यात येतील. अत्यंत चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या गेल्या विधानसभेच्या याद्यांमधील घोळ हा बैठकीत मांडण्यात आला. सर्व तालुक्यांमध्ये तालुका निरीक्षक बैठकीत नेमण्यात…
साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या कृषी मालाची किमान आधारभूत किंमतीपेक्षा (एमएसपी) कमी दराने होणारी खरेदी थांबविण्यासाठी कापूस, धान्याचे शासकीय खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे. तसेच जे व्यापारी किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात खरेदी करीत आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आ. एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाकडे आपले तातडीने लक्ष वेधण्यासाठी हे पत्र लिहित आहे. दसरा झाला अाहे. सणासुदीच्या खर्चासाठी शेतकरी आपला शेतमाल बाजारात विक्रीस आणत आहेत. मात्र, खासगी व्यापारी त्यांच्या या गरजेचा गैरफायदा घेत आहेत. शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत…
शालेय कराटे, स्केटिंग स्पर्धेत विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड साईमत/जळगाव/प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यात नुकत्याच धुळे येथे पार पडलेल्या विभागीय वूशू स्पर्धेत पोलीस क्लासमधील कराटेची खेळाडू मनस्वी तायडे हिने सुवर्णपदक घेऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सलग तिसऱ्यावर्षी आपले पद निश्चित केले आहे. ९ ते १२ ऑक्टोंबर दरम्यान संभाजीनगर गोवरखेडा येथे होत असलेल्या राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत मनस्वीची निवड झाली आहे. तसेच शालेय कराटे, स्केटिंग स्पर्धेत विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड झाली आहे. कराटेत कौस्तुभ जंजाळे, कार्तिक शिंदे, महेश वाघ, श्रेयस परदेशी, कुणाल बाविस्कर, नितीश भोसले, संकेत पवार, अदिती खंगार,…
नेतृत्वगुणासह संघभावना वाढीसाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ साठी शालेयस्तरीय मंत्री मंडळाची निवडणूक व शपथविधी सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि संघभावना वाढावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. निवडणूक प्रक्रियेचे नेतृत्व प्रा. योगेश धनगर, प्रा. प्रमोद भोई यांनी केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि नवनिर्वाचित उमेदवारांची नावे प्रभारी प्रा. अर्जुन शास्त्री यांनी जाहीर केली. शपथविधी सोहळा प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. नवनिर्वाचित सर्व विद्यार्थ्यांना उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे यांनी शपथ दिली. यावेळी पर्यवेक्षक स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश पाटील यांच्यासह संपूर्ण शिक्षक…
एसएनडीटी विद्यापीठ, डॉ. वर्षा पाटील गृहविज्ञान महाविद्यालयातर्फे क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या आहेत. त्या शारीरिक विकास घडवून आणतात. खेळ खेळताना मैदानात टीमवर्क, उत्साह, नियोजनासह कमालीचा संयम महत्वाचा ठरत असतो. खेळ ही केवळ स्पर्धा नसून एकत्र येण्याचा, संघभावना वाढवण्याचा आणि निरोगी जीवनशैली जोपासण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी केले. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन, जळगाव आयोजित क्रीडा स्पर्धांचे बुधवारी, ८ रोजी जळगाव येथे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी डॉ. उल्हास पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे…
खुबचंद सागरमल विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : वन्यजीवांच्या अभ्यासातून औषधी संशोधनांना दिशा मिळते. पर्यटनाला चालना मिळून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते. त्यामुळे पर्यावरण संतुलनाची ‘वन्यजीव संरक्षण’ गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन पर्यावरणप्रेमी लक्ष्मीकांत महाजन यांनी केले. खुबचंद सागरमल विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेतर्फे वन्यजीव सप्ताहानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना ‘वन्यजीवांचे महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज’ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. वन्यजीव म्हणजे निसर्गात स्वाभाविकरित्या राहणारे प्राणी, पक्षी, मासे, कीटक आणि इतर जीव. हे सर्व पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत.अन्नसाखळी व अन्नजाळीद्वारे पर्यावरणातील संतुलन राखतात. वाघ, सिंह यांसारखे शिकारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात तर शाकाहारी…
पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी शिफारस दिल्याने निवड साईमत/जालना/प्रतिनिधी : “महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान” ह्या राज्यस्तरीय सांस्कृतिक संस्थेचे राज्य उपाध्यक्ष राम घोडके यांची जालना जिल्ह्याच्या राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत आणि साहित्यिक मानधन निवड समितीवर पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी शिफारस दिल्याने त्यांची निवड समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. गेल्या ३० वर्षापासून ते लोक-कलावंतांच्या प्रश्नांसाठी झगडत आहेत. उपोषण, मोर्चा व आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जालना जिल्ह्यातील अनेक कलावंतांना तसेच दिवंगत कलावंतांच्या पत्नीस न्याय मिळवून दिला आहे. संस्थेचे जालना जिल्हाध्यक्ष म्हणून सुमारे २५ वर्ष त्यांनी कार्य केले. ते या वयातही सक्रिय आहेत. त्यांची सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे संस्थाध्यक्ष शाहीर सुरेशचंद्र आहेर, सरचिटणीस अशोक भालेराव,अनिल…
डॉ. प्रकाश आमटे यांचा आशावाद ; डॉ. नितीन विसपुते लिखित पुस्तकाचे प्रकाशन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगावातील चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते लिखित “व्यसनमुक्तीवर बोलू काही” पुस्तकात सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत व्यसनमुक्तीविषयी उपयुक्त माहिती आणि प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे हे पुस्तक महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती कार्याला नक्कीच बळ देईल आणि जनजागृतीस हातभार लावेल, असा आशावाद डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केला. व्यसनमुक्त राहण्यासाठीचा संदेश देताना त्यांनी आपल्या अनुभवातून प्रेरक विचार मांडले. पुस्तकाचे अवलोकन केल्यानंतर ते बोलत होते. समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर उपाय शोधत, जनजागृतीचा दीप पेटवणारे जळगावातील चेतना व्यसनमुक्ती केंद्राने आणखी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते…