साईमत, भुसावळ : प्रतिनिधी यावल रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणालगत असलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयामार्फत २ ते ६ मे २०२४ पर्यंत वयोगट ८ ते १४ वर्षाखालील मुलांसाठी विनामूल्य समर कॅम्पचे आयोजन केले आहे. त्यात मुलांचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्याच्या दृष्टीने संगीताच्या तालीवर व्यायाम कवायत विविध स्वरूपाचे चर्चासत्र, गीत, नृत्य, नाटिका यांचे प्रशिक्षण सोबतच छोट्या-छोट्या गोष्टीतून संस्कार मनोरंजनात्मक खेळ हे विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन स्थिर राहण्यासाठी व त्यांच्यातील चंचलता दूर होण्यासाठी ध्यान, धारणा मेडिटेशनवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. मुलांचे आरोग्य व संतुलित आहार याविषयी तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण जागर प्रतिष्ठान…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी निवडणूक आयोगाने लोकसभेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढावा आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, म्हणून घरूनच मतदान करण्याची सुविधा यंदापासून दिली आहे. अशातच जळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्वात ज्येष्ठ मतदार श्रीमती लिलाबाई शिवराम धनराळे यांनी अमळनेर तालुक्यातील सर्वात पहिला मतदार म्हणून शनिवारी, ४ मे रोजी घरून मतदानाचा हक्क बजावला आहे.
साईमत, भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मळगावला सध्या ८ ते ९ दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. दुसरीकडे पाझर तलाव कोरडा झाला आहे. पाणी पुरवठा करणारी विहीरही पाण्याचा तळ गाठत कोरडीठाक झाली आहे. गेल्या पंधरवड्यापासून पाणीटंचाईच्या झळा गडद होत आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांना पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी सामनाच करावा लागत आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यापुढे गावाला पाणी पुरवठा कसा होणार? असा गंभीर प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनासमोर उभा आहे. मळगावला पाणीटंचाई निर्माण झाल्याने पिण्याचे टँकर तात्काळ सुरु करावे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीचा प्रस्ताव मळगाव ग्रामपंचायतीमार्फत भडगाव पंचायत समितीच्या प्रशासनाला नुकताच देण्यात आला आहे. प्रशासनामार्फत मळगावासाठी तात्काळ पिण्याच्या पाण्यासाठी…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी यावल तालुक्यातील आमोदे येथील श्रीराम मंदिरावरील मजल्यावर जेडीसीसी बँकेच्या शाखेत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जेडीसीसी बँक व मंदिराचा उत्तरेकडील अर्धा भाग जळून खाक झाला आहे. ही भीषण आग गुरुवारी, २ मे रोजी रात्री १०-३० च्या सुमारास लागून रात्री तीन वाजता आटोक्यात आणता आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, बँकेतील टेबल, खुर्च्या व इतर फर्निचर, रजिष्टर, कागदपत्र सर्व जळून खाक झाले आहे. मंदिरावर असलेला झेंडा आणि गाभाऱ्यात विराजमान श्रीराम, लक्ष्मण, सीतामाईसह इतर देवता सुरक्षित असल्याचे पुजारी कन्हैया महाराज यांनी सांगितले. मंदिर अत्यंत पुरातन, तीन मजली सागवानी लाकडाचा ढाचा असलेले मजबूत बांधकामाचे, छान रंगरांगोटी केलेले भव्यदिव्य जागृत…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना मुंबईतील सहारा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये फिल्म सोसायटीतर्फे नुकत्याच झालेल्या आय.सी.सी.ए. इंटरनॅशनल कन्टेन्ट अवॉर्ड फंक्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. कार्यक्रमात चीफ गेस्ट म्हणून ‘राम तेरी गंगा मैली’ फेम बॉलीवूड अभिनेत्री मंदाकिनी उपस्थित होत्या. अतिशय रंगतदार अशा सोहळ्यास बॉलिवूड, टोलिवूड तसेच चित्रपट, टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. यावेळी फिल्म क्षेत्रातील विविध गुणवंतांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रेकॉर्ड होल्डर आर्टिस्ट, कवी साहित्यिक म्हणून दिनेश चव्हाण यांचाही सन्मान व्यासपीठाने व मंदाकिनी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चित्रकार दिनेश चव्हाण यांनी आपल्या कलाकुसरमधून मंदाकिनी यांचे फास्टेस्ट स्केच काढून त्यांना भेट दिले.…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या सहकार्याने ‘वॉल्टर क्लूवर’ कंपनीकडून मिळालेल्या सीएसआर फंडीगअंतर्गत चाळीसगाव येथील महिलांसह मुलींसाठी ‘उर्मी प्रकल्प’ राबविण्यात आला. उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील मुलींसह महिलांमध्ये मासिक पाळीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि माहिती देणे होता. उर्मी टीममधील प्रांजली इनामदार यांनी २८ व २९ एप्रिल रोजी चाळीसगाव येथील गावांमध्ये तसेच शहरामधील वस्त्यांमध्ये जागरूकता सत्र घेण्यात आली. सत्रात मासिक पाळी आणि आरोग्य तसेच त्यासाठी राखायची स्वच्छता, योग्य आहार, व्यायाम व नॅपकिन्सची विल्हेवाट याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. ग्रामोदय प्रकल्पाचे वरिष्ठ समन्वयक अनिल पाटील, चाळीसगावमधील प्रकल्प समन्वयक पंकज राठोड, प्रवीण राठोड, स्थानिक रहिवासी यांनी सर्व अंगणवाडी सेविका, बचत गट प्रमुख…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील वाकी रस्त्यावरील बेस्ट बाजाराच्या प्रांगणात लॉर्ड गणेशा इंग्लिश मेडीयम स्कूल आणि बोहरा परिवार यांच्यावतीने महाराष्ट्र दिनानिमित्त सांगली येथील प्रख्यात स्पीकर वसंत हंकारे यांचे ‘चला बाप समजाऊन घेऊ या’ व्याख्यान आयोजित केले होते. त्यांनी व्याख्यानाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष बोहरा (राजू बोहरा), पोलीस निरीक्षक किरण शिंदे, लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष अभय बोहरा, दीपक पाटील यांच्यासह बोहरा परिवाराचे सदस्य, शहरातील नागरिक, महिला, मुलींची उपस्थिती लक्षणीय ठरली. व्याख्यानात मुली आणि मुले यांच्या जीवनात आई, बापाची त्यातल्या त्यात बापाच्या मनाची घालमेल तारुण्यात पदार्पण करणाऱ्या आपल्या मुला-मुलींच्या बाबतीत काय असते. कसे त्यांना लहानाचे मोठे केलेले असते…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी शहराचे माजी नगराध्यक्ष, समाजभूषण, सहकार महर्षी स्व.डी.एम.माळी यांचे नातू तसेच शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक हेमंत ज्ञानेश्वर माळी आणि ज्योती माळी यांचे चि.चेतन व नांदगाव तालुक्यातील साकोरे गावाचे रहिवासी सुनिता व दिलीप उत्तम सुरसे यांची कन्या स्नेहल यांचा सत्यशोधक विवाह महात्मा फुले हायस्कूलच्या प्रांगणात नुकताच उत्साहात पार पडला. विवाह सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, पर्यावरण, क्रीडा, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. खंडेरायाची तळी भरून सत्यशोधक विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यानंतर सार्वजनिक सत्यधर्माची प्रार्थना सामूहिक रितीने घेण्यात आली. सत्यशोधक विवाह स्थळी क्रांतीची मशाल वधू-वरांच्या हस्ते पेटविण्यात आली. यानंतर…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र दिनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना जळगाव ते करवीर नगरी म्हणजेच कोल्हापूर अशी ‘हवाई सफर’ घडवून आणली. पालकमंत्र्यांच्या कृतीने शेतकरी भारावले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पालकमंत्री गुलाबराव पाटील कोल्हापूर, सोलापूर, सांगली दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समवेत महायुतीच्या उमेदवारांसाठी ते प्रचार सभा घेणार आहेत. शेतकरी म्हटला की, बैलगाडी आलीच. त्यांच्यासाठी रेल्वे मोठी गोष्ट आहे. विमानाने हवाई सफर हे तर शेतकऱ्यांसाठी दिवा स्वप्नच आहे. मात्र, शेतकरी पुत्र असलेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या शेतकऱ्यालाही ‘हवाई सफर’ घडली पाहिजे, अशी इच्छा बाळगून मतदार…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे बुधवारी, १ मे रोजी के.बी.एस. समाजमंदिरात कंजरभाट समाजातील झालेल्या विवाहात समाजबांधवांना मतदान करण्यासाठी शपथ देण्यात आली. जळगाव जिल्हा प्रशासनाला कंजरभाट समाज युवा फाऊंडेशन संस्थेनेही मतदान जनजागृतीसाठी हातभार लावला आहे. याबद्दल त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आम्हीही स्वतः लोकशाहीचा घटक आहोत. मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. मतदान हा तुमचा अधिकारच नाही तर तुमची जबाबदारी आहे, असे संस्थेचे सचिव राहुल नेतलेकर यांनी सांगितले. यावेळी नरेश बागडे यांनी उपस्थित सर्वांना मतदान करण्यासाठी शपथ दिली. याप्रसंगी मोहन गारुंगे, विजय अभंगे, शशिकांत बागडे, सचिन बाटूंगे, योगेश बागडे, संदीप गारुंगे, प्रदीप नेतले, पंकज गागडे, निखिल गारुंगे,…