साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगावातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या नावाने मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी खोटी पोस्ट सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाली. एबीपी चॅनलचा लोगो व नाव वापरलेली ही पोस्ट तयार करताना स्मितातार्इंचे फोटो व नाव वापरत खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब निदर्शसनास येताच स्मिताताई वाघ व ना. गिरीश महाजन यांनीही संताप व्यक्त केल्यानंतर आरोपींविरुध्द भाजपाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला आला असतांना अशातच प्रचार थांबण्याच्या काही तास आधी ‘खासदार झाल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी करणार’ अशा पोस्टवर एबीपी चॅनलचा लोगो व स्मिता वाघ यांचा फोटो वापरला आहे. अशा खोडसाळपणामुळे जिल्ह्यात…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील संत सखाराम महाराज यात्रा उत्सवाला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर समाधी मंदिरावर प्रारंभ झाला. यावेळी ह.भ.प. प्रसाद महाराज यांनी तालुक्यातील अधिकारी वर्ग, मानकरी, भक्तांना नारळासह खडीसाखर प्रसादाचे वाटप केले. पहाटे प्रसाद महाराज यांनी विठ्ठल रुक्माई, लालजीच्या मूर्तीची पूजासह आरती करून वाजतगाजत महाराज बोरी नदीच्या वाळवंटात समाधी मंदिराजवळ आले. मंदिरातील पुजारी अभय देव, जय देव, सुनील देव, केशव पुरानी, प्रसाद देव यांच्या हस्ते पूजा करून अन्नपूर्णा मुख्य स्तंभारोपण आणि ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर प्रसाद महाराज यांची पूजा करण्यात आली. यावेळी न्या.गुलाबराव पाटील, लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ, मा.नगराध्यक्ष विनोद पाटील, मा. नगराध्यक्ष जयश्री पाटील, ॲड.ललिता पाटील, वसुंधरा लांडगे, खा.शि.मंडळाचे…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक तथा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करुन शहरातील मुख्य मार्गावर भव्य शोभायात्रा काढून भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मलकापूर शहरात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये सकाळी ६ वाजता गौरक्षण येथे गोमातेचे पूजन व चारा तसेच नैवेद्य, सकाळी १०.३० वाजता पर्यावरणपूरक स्वास्थ करीता लाभदायक व मतदान जागृती करीता भव्य सायकल रॅलीचे आयोजन दुपारी १२ वाजता जन्मोत्सव व महाआरती करण्यात येवून सायंकाळी ६ वाजता लि.भो.चांडक विद्यालयाच्या प्रांगणावरून भगवान परशुराम यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा टाळ, ढोल-ताशांच्या निनादात तथा…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कुंझर येथे सेवा सहयोग फाउंडेशनचे गुणवंतदादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून प्रयास शार्लेट संस्था, सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प, भूजल अभियान चाळीसगाव, लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचालित हिरकणी महिला मंडळ चाळीसगाव, जलमित्र परिवार, सहज जलबोध अभियान, भूजल पाणी समिती, कुंझर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सहयोगाने शनिवारी, ११ मे रोजी राम बल्ली डोंगरावर सकाळी ६ वाजेपासून ते ९ वाजेपर्यंत महाश्रमदानाचे आयोजन केले होते. त्यात सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून मागील ३ महिन्यापासून माथा ते पायथा या पद्धतीने जलसंधारणाची कामे केली जात आहेत. त्यात शेकडो सीसीटी, डीप सीसीटी, दगडी बांध तयार केले आहेत. आज त्या सीसीटी श्रमदानातून व्यवस्थित…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या संचालकपदी मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष फिरोज शेख यांची निवड करण्यात आली. गेल्या १३ वर्षात फिरोज शेख यांनी संस्थेच्या माध्यमातून जळगाव शहरात व जिल्ह्याभरात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण, आरोग्य तसेच रक्तदान शिबिर या केलेल्या कार्याच्या आधारावर त्यांची निवड करण्यात आली. त्यांना जळगाव जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्या हस्ते इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रेडक्रॉस दिनानिमित्त सदस्य प्रमाणपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले. यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन विनोद बियाणी, सुभाष साखला, लक्ष्मण तिवारी, डॉ. राजेश सुरलकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन उज्ज्वला वर्मा यांनी केले.
साईमत, जळगाव : प्रतिनिधी ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री परशुराम जयंतीनिमित शुक्रवारी, १० मे रोजी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत प्रथमच महिलांनी दांडिया खेळल्याने त्यांनी लक्ष वेधून घेतले होते. ‘जय परशुराम बोलो जय परशुराम’ गाण्याच्या तालावर महिलांची पावले दांडियात थिरकली. तसेच चित्तथरारक प्रात्यक्षिक पूजा दायमा, नंदिता जोशीने ढाल तलवार बाजीने प्रेक्षकांचे मने जिंकुन लक्ष वेधून टाळ्या मिळविल्या. बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष नितीन पारगावकर, महिला अध्यक्ष वृंदा भालेराव, सुधा खटोड, छाया त्रिपाठी, श्रीकांत खटोड यांच्या उपस्थितीत सुभाष चौकातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी नंदिता जोशीने डोक्यावर कळसी ठेवून फायर नृत्य केला. दांडियात प्रियंका त्रिपाठी, अनुराधा दायमा, पूजा दायमा, नंदिता जोशी, मंगला दायमा,…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी संत मुक्ताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या स्वीप उपक्रम मतदार जनजागृती अभियानाचा कार्यक्रम घेण्यात आला. भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा मतदान आहे. भारतातील नागरिकांना तसेच नवमतदारांना मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने उपक्रम राबविण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. अभियानातील १३ मे २०२४ रोजी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ‘तारीख तेरा, मतदान मेरा’ ही घोषणा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये देण्याकरीता प्रशासनाने मार्गदर्शक सूचना केल्या. संत मुक्ताबाई महाविद्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘तारीख तेरा, मतदान मेरा’ ही सर्वाधिक मतदान होण्याच्या दृष्टीने घोषणा देण्यात आल्या. या…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील प्रथम वर्षातील एलएलबीच्या विद्यार्थ्यांनी एका कारवर रंगीबेरंगी स्वरूपात शत प्रतिशत ‘मतदान-देश का सन्मान’, ‘ना नशे से, ना नोट से, देश की किस्मत बदलेगी तो वोट से’, ‘वोट करो भाई वोट करो’, सीमापार दुश्मन पर चोट करो’, ‘कामाला लागा-मतदान करा’, ‘लग्न टाळा, साखरपुडा टाळा, आळस टाळा, मतदान करा’, ‘खुद मतदान करो, औरों से मतदान कराओ’, ‘मतदान म्हणजे राष्ट्रसेवा’, ‘मतदान म्हणजे समाजसेवा’ अशा विविध घोषणांचे स्टिकर चिटकवून मतदान जनजागृती रथ सजविला आहे. या रथावर एक ध्वनीक्षेपक(स्पीकर) बसविलेला आहे. १५ एप्रिलपासून दररोज साधारण १० गावांतील चौकाचौकात आणि गल्लीगल्लीत जाऊन रथ मतदार जागृती करीत आहे.…
साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर सुदृढ, सशक्त आणि प्रामाणिक समाज घडविण्यासाठी बालमनावर संस्कार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज यांनी केले. श्री संत सावता महाराज अध्यात्मिक बाल संस्कार शिबिराच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुदाम चौधरी यांच्या फार्म हाऊस येथे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बोरसे यांच्या प्रेरणेने गेल्या वर्षापासून बालसंस्कार शिबिर आयोजित केले जात आहे. यंदा शिबिरात ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. क्रांतीसूर्य फाउंडेशनतर्फे सर्व सहभागी बाल वारकऱ्यांना तसेच अन्नदात्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. दुसरीत शिकणाऱ्या हर्षल प्रविण घोंगडे या चिमुकल्याची हनुमान चालीसा तर ओम गणेश महाजन (जरंडी) या ९ वर्षांच्या चिमुकल्याचे विष्णूसहस्त्रनाम मुखोद्गत आहे. त्यांच्या सादरीकरणाबद्दल रोख…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे व विद्यमान शिंदे गटाचे आ.चंद्रकांत पाटील यांच्यामधील हाडवैर सर्वश्रुत आहे. माजी मंत्री खडसे यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आ.पाटील यांची शुक्रवारी, १० मे रोजी महायुतीच्या उमेदवार खा.रक्षाताई खडसे यांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आ.चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली. यावेळी प्रचार नियोजनाबाबत योग्य चर्चा झाली. याप्रसंगी खा.खडसे यांचे आ.पाटील यांच्या सौभाग्यवती यामिनी पाटील, संजना पाटील यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दोघांमध्ये आखाजीच्या मुहुर्तावर ‘दिलजमाई’ झाल्याने आ.पाटील हे आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सक्रीय होणार आहे. आ.चंद्रकांत पाटील यांच्या मनधरणीसाठी काही दिवसांपूर्वीच मुक्ताईनगर येथे आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष…