साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील वीज महावितरण कंपनीचे गिरणा पंपिंग सबस्टेशन अंतर्गत महाबळ येथील कार्यालयात कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्याला विद्युत पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून हरीविठ्ठल नगरातील एकाने बेदम मारहाण करून कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना बुधवारी, २२ मे रोजी रात्री १२.४५ मिनिटांनी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जळगाव शहरातील गिरणा पंपिंग रस्त्यावरील महावितरण कंपनीचे सबस्टेशनच्या अंतर्गत महाबळ येथे कार्यालय आहे. या ठिकाणाहून खंडेराव नगर, हरीविठ्ठल नगर, वाघ नगर, रामानंदनगर, समता नगर येथे विद्युतपुरवठा करण्याचे काम केले जाते. २२ मे रोजी रात्री १२.४५ वाजता हरीविठ्ठल नगरमध्ये राहणारा दीपक सपकाळे यांच्यासह एक जण असे दोन जण महाबळ कार्यालयात येथे…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव : प्रतिनिधी पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ या विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या देशातील प्रमुख नामांकीत विद्यापीठातील अभ्यासक्रमात जामनेर येथील साहित्यिक कवी डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या ‘अशानं आसं व्हतं’ या ललित लेख संग्रहाचा समावेश झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी (एम.ए.) मराठी द्वितीय वर्ष अभ्यासक्रमात जून २०२४ पासून कुमारसाहित्य अभ्यासक्रमांतर्गत ‘अशानं आसं व्हतं’ या ललित लेख संग्रहाची निवड झाली आहे. जामनेर तालुक्यातील सुनसगाव बु. गावाचे डॉ. अशोक कौतिक कोळी हे रहिवासी आहेत. पूर्व खान्देशातील ह्या छोट्या खेडे गावात त्यांचे बालपण गेले. आपल्या बालपणीच्या आठवणी, शालेय शिक्षण व जडणघडण सोबतच तेथील निसर्ग, शेतीभाती व लोकजीवन – लोकसंस्कृतीचा…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ब्राह्मणशेवगे ते हिरापूर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. नागरिकांच्या सततच्या मागणीनंतर हा रस्ता मंजूर झाला आहे. काही दिवसांपूर्वी साईडपट्ट्या तयार करण्यात आल्या आहे. तसेच खडी टाकण्यात येत आहे. परिसरातील पाण्याची स्थिती बिकट असल्याने रस्त्याच्या कामासाठी पाणी नसल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. दरम्यान, खराब रस्ता, अरुंद रेल्वे पुलामुळे रस्त्यावरील बस वाहतूक बंद केली आहे. तालुक्यातील ब्राह्मणशेवगे, नाईकनगर, माळशेवगे, शेवरी येथील नागरिकांना रस्ता खुपच खराब झाल्याने तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे डोणदिगरमार्गे शहराच्या ठिकाणी ये-जा करावी लागते. रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे व हिरापूर येथील रेल्वे पुलामुळे पूर्वीपार या मार्गाने ये-जा करणारी बस वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट येत्या २१ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे केला होता. आता या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली आहे. सोनाई फिल्म क्रिएशन यानिर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचे लेखनही केले आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलताडे पाटील, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यात तापमानाचा पारा ४४ अंशावर गेला आहे. त्यामुळे रोजच तापमान वाढत आहे. यासोबत पाणीटंचाईच्या झळाही तीव्र होत आहे. चाळीसगाव तालुक्यात ३३ गावांमध्ये पाणीबाणीची स्थिती उद्भवली असल्याचे चित्र आहे. यासाठी प्रशासनाने ‘मागेल त्याला टँकर’ देण्याची भूमिका घेतली पाहिजे, अशी जनतेतून अपेक्षा व्यक्त होत आहे. तालुक्यातील ३३ गावांना सद्यस्थितीला ४६ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मे माहिन्यात पाणीटंचाईच्या सावटाखाली येणाऱ्या गावांची संख्या ७० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मागीलवर्षी कमी पावसामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. विहिरींच्या भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई चाळीसगाव तालुक्यात आहे. मागीलवर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे, गिरणा धरणात ५६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.…
साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर येथील गावाबाहेर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन दिवसांपूर्वी एका बाळंतीण झालेल्या आदिवासी महिलेचा वेळेत उपचार न झाल्यामुळे मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच जिल्हास्तरावर आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. त्यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी ‘गैरहजर’ राहिल्याने यांना कामाचे व आपल्या जबाबदारीचे कोणतेही सोयर सुतक नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. चोपडा तालुक्यातील धानोरा येथे गावाबाहेर धानोरासह परिसरातील आदिवासी पाडे, वस्ती येथील रुग्णांना चांगली सेवा मिळावी, म्हणून भव्य असे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर त्याचप्रमाणे परिसरातील उपकेंद्रात तीन डॉक्टर नियुक्त केले आहे. येथे वैद्यकीय अधिकारी निवासस्थान असूनही…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील खादगाव येथील माजी उपसरपंच तथा शेतकरी प्रमोद चौधरी (वय ४०) यांचा उष्माघातामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी, २२ मे रोजी दुपारी १ ते १:३० वाजेच्या दरम्यान घडली आहे. ह्या घटनेमुळे प्रमोद चौधरी यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. खादगाव येथील माजी उपसरपंच प्रमोद चौधरी हे त्यांच्या शेतात काही कामानिमित्त गेले होते. दुपारी १ वाजेची वेळ असल्याने सूर्य आग ओकत होता. या तापमानात ते घरी परतल्यानंतर त्यांनी थंडगार पाणी पिले. एकदम थंड पाणी जास्त प्रमाणात पिल्यानंतर अचानक त्यांना चक्कर येऊन त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्याने…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील सराफ गल्लीतील भवानी मातेच्या मंदिरासमोर असलेल्या सौरभ ज्वेलर्स नावाच्या दुकानाच्या मागच्या बाजूने येत दोन कर्मचाऱ्यांना चॉपरचा दाखवून सोने लुटणाऱ्या सहा दरोडेखोरांपैकी तीन दरोडेखोरांना अटक करण्यात शनिपेठ पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यातील एकाला पुण्यातून तर उर्वरित दोन जणांना शहरातील राजीव गांधी नगरातून अटक केली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सागरसिंग जीवनसिंग जुन्नी, रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी आणि लकीसिंग जीवनसिंग जुन्नी (सर्व रा. राजीव गांधी नगर, जळगाव) अशी अटक केलेल्या तीन दरोडेखोरांची नावे आहेत. तिघे दरोडेखोरे हे सख्खे भाऊ असल्याचे सांगण्यात आले. सविस्तर असे की, जळगाव शहरातील सराफ…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी येथील राष्ट्रीय महामार्गावर दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात १७ जण जखमी त्यापैकी पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी घडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पालघर येथील निवडणूक आटोपल्यानंतर गृहरक्षकांना घेवून निघालेली बस (क्र.एम.एच. १४ बी.पी. ३८८२) अकोलाकडे जात असतांना २१ मे रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मलकापूर नजीकच्या पेट्रोल पंपाजवळ ओव्हरब्रिजवरील दुभाजकाला धडकली. अपघातात बस चालकासह १४ जण जखमी झाले. त्यापैकी गोपाल जाधव (वय २८, रा. जवळा बु.) आणि संतोष दामोदर गणोजे (वय ४२, रा. कोळंबी, मुर्तीजापूर) या दोघांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर केले. उर्वरित १२ जणांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी बँकॉक येथे संयुक्त राष्ट्र कौन्सिलच्यावतीने थायलंड बँकॉक येथे १९ व २० तारखेला आयोजित वैशाख महोत्सव कार्यक्रमाला भारतातून धम्मकार्यात कार्यरत डॉ.अ.फ. भालेराव (साहित्यिक) उपस्थित होते. यावेळी भदंत विरत्न महाथेरो, सिने अभिनेते डॉ.गगन मलिक यांची उपस्थिती होती. वैशाख पौर्णिमेला बुद्धांचा जन्म झाला. तसेच ज्ञान प्राप्तीही झाली. बुद्धांचे महापरिनिर्वाण ही वैशाख पौर्णिमेला झाले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने १९९९ मध्ये आपल्या आमसभेत संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून मान्यता दिली आहे. न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्य कार्यालयात २००१ या वर्षात साजरा केला होता. इंटरनॅशनल कौन्सिल फॉर वैशाख दिन ज्याला युनायटेड नेशन इकॉनोमिक व सोशल कौन्सिल सह सल्लागार दर्जा मिळाला आहे. १९…