साईमत, यावल : प्रतिनिधी रावेर मतदार संघातील अटवाडे, दोधे तालुका रावेर परिसरात रविवारी, २६ रोजी वादळी पावसामुळे केळी पिकांचे झालेल्या नुकसानीची डॉ. कुंदन फेगडे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी दोधे येथील जनार्दन पाटील, सुनील पाटील, गोपाळ पाटील, भूषण महाजन, योगेश पाटील, आटवाडे येथील, रावेर बाजार समितीचे सदस्य जयेश कुयटे, सरपंच किरण कोळी, सदस्य भगवान धनगर, गणेश धनगर, गोपाळ महाजन, एकनाथ पाटील, सुनील महाजन, हितेश पाटील, शेतकरी अलोककुमार गर्ग, संतोष पाटील उपस्थित होते. वादळी पावसामुळे केळी पिक जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संपूर्ण नुकसानीची पाहणी करून संबंधित अधिकारी वर्गाला तत्काळ पंचनामे करून खर्च व उत्पादनाचा आढावा…
Author: Sharad Bhalerao
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी तालुक्यात अस्मानी चक्रीवादळामुळे अनेकांना चक्रीवादळाचा सामना करावा लागला तर यामध्ये भीमनगर येथील रहिवासी रवींद्र निकम हे महादेवाच्या मंदिरात पावसामुळे बसले असता मंदिरावरील घुमट डोक्यात पडून मृत्यू झाला आहे. चक्रीवादळामुळे अनेकांच्या घरावरील तीन पत्रे उडाले तर झाडे उन्मळून पडले आहे. तसेच समर्पण लोन येथील लग्नप्रसंगी काम करणाऱ्या स्वयंपाकी महिलांच्या अंगावर भिंत कोसळल्याने एक महिलेचा हात तुटला तर तीन महिला जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले. तसेच समर्थ लॉनवरील तीन सेट उडाले आहे. भीमनगर येथील मोलमजुरी करणाऱ्या रवींद्र विश्राम निकम (वय ५५) हे महादेवाच्या मंदिरात चक्रीवादळ आणि पावसामुळे आसरा घेण्यासाठी मंदिरात बसले होते. तेव्हा…
साईमत, यावल : प्रतिनिधी अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय मार्गावर सावदा येथून बऱ्हाणपूरकडे जात असतांना शनिवारी, २५ मे रोजी दुपारी प्रवासी वाहतूक करणारी एक ॲपेरिक्षा रस्त्यात अचानक उलटली. हा अपघात वडगाव रस्त्यावर झाला. अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेसोबत एक २ वर्षीय बाळ व एक ७ वर्षीय मुलगी होती. योगायोगाने यावेळी याच मार्गावरून यावल येथील आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे हे आपल्या कामानिमित्त जात होते. अपघात झाल्याचे त्यांना दिसल्याबरोबर त्यांनी आपले वाहन थांबवून आपल्या स्वतःच्या वाहनांमध्ये त्या जखमी महिलेस तात्काळ बसवून रावेर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करून (शासकीय वैद्यकीय सेवेचा अनुभव असल्याने) त्यांनी स्वतःच त्या महिलेवर उपचार सुरू केले. माणुसकी दाखवीत जखमी…
साईमत, बोदवड : प्रतिनिधी मुक्ताईनगर, रावेर, बोदवड तालुक्यात शनिवारी, २५ मे रोजी सायंकाळी आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहे. शेती शिवार आणि घरांचे, जनावरांच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे रविवारी, २६ मे रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील शिरसाळा, चिंचखेडा सीम, लहान मनुर, ऐणगाव, चिखली येथे नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिकांना धीर देऊन नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यासंबंधी प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासोबत चर्चा केली.तसेच आचारसंहिता शिथिल करून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावेळी रामदास पाटील, कैलास चौधरी, चिंचखेडा सीमचे…
साईमत, रावेर : प्रतिनिधी एकीकडे विविध समस्यांनी केळी उत्पादक आधीच चिंताग्रस्त झालेला असतांना शनिवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनाने करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. रावेर तालुक्यात शनिवारी, २५ मे रोजी सायंकाळी जोरदार वादळाचा फटका बसला. त्यात प्रामुख्याने अटवाडा, दोधे, नेहते, अजनाड आदी गावांच्या शिवारांमधील केळीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. वादळात हजारो हेक्टर जमीनीवरील केळीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यंदा केळी उत्पादकांच्या समोर अनेक अडचणी आल्या आहेत. आधीच केळी पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नाडविण्याची भूमिका घेतली. यानंतर अलीकडच्या काळात केळीचे भाव कोसळल्यामुळे उत्पादक अक्षरश: निराश…
साईमत, वरणगाव : प्रतिनिधी महामार्ग चौपदरीकरणाच्या नावाखाली प्रशासनाने जुन्या महामार्गालगत बिट्रीश कालीन असलेल्या डेरेदार हिरव्या कडुनिंबाच्या झाडांच्या कत्तलीना हिरवी झेंडी दाखविली. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने तरसोद ते चिखली मार्गावर रात्रीचा-दिवस करून अडसर नसलेल्या वृक्षांवरही कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांना नामशेष केले. त्यामुळे नव्याने निर्माण झालेला हा महामार्ग डेरेदार वृक्षाविना बोडखा झाला असला तरी वरणगाव ते भुसावळ मार्गावरील जाडगाव फाट्याजवळ असलेल्या नागेबाबा देवस्थानामुळे ‘जीवदान’ मिळालेला एकमेव कडुनिंबाचा डेरेदार वृक्ष दुभाजकामध्ये डौलात उभा असल्याने वाहनधारकांना दिलासादायक ठरत आहे. राज्य व केंद्र शासनाच्या महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून धुळे ते अमरावतीपर्यंत जुन्या महामार्गाचे टप्प्याटप्याने चौपदरीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चौपदरीकरणाचाही समावेश आहे. जिल्ह्यातील तरसोद ते…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यामध्ये शनिवारी, २५ मे रोजी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे फत्तेपूर देऊळगाव कापूसवाडी पळासखेडा यांच्यासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये चक्रीवादळ झाले. यामुळे मोठ्या प्रमाणावर घराचे गोठ्याचे नुकसान झाले आहे.सायंकाळपासून तालुक्यातील विविध गावांना वादळाचा फटका बसला. त्यात उडालेल्या पत्रामुळे जनावरे मोठ्या प्रमाणावर गंभीर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर शेती पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतीचे घराचे व जनावरे जखमी झालेल्या व दगावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान, जामनेर तालुक्यातील वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करुन तात्काळ पंचनामे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर…
साईमत, पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर येथील पोलीस चौकीतील अधिकारी आणि कर्मचारी यांना चांगल्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक यांच्याकडून प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. बहिणाबाई चौधरी विद्यापीठ येथे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी योगेश रामा वळवी हा जेवण करून रूमवर जात असताना गेटजवळ त्याला फोन आला. तो मोबाईलवर बोलत असताना धूम स्टाईलने तीन जण मोटारसायकलवर आले. त्यांनी त्याचा मोबाईल लांबविला. यावेळी त्याने पाठलाग केला. मात्र ते पळून गेले. याबाबत त्याने तात्काळ पाळधी पोलीस चौकी येथे धाव घेऊन माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन सीसीटीव्हीद्वारे शोध घेवून त्यांना पकडून त्या विद्यार्थ्याला मोबाईल मिळवून दिला. याबाबत येथील स. पो. नि.सचिन शिरसाठ, गजानन महाजन, ज्ञानेश्वर बाविस्कर,…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर मतदार संघातील काही भागात शनिवारी, २५ मे रोजी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दरम्यान, अवकाळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले आहे. मतदार संघात राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी आ.चंद्रकांत पाटील यांच्या समवेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून चौकशी केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार, कृषी अधिकारी, संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली व पातोंडी भागात येथे झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या शेतीमध्ये केळीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसानाची पाहणी केली. यावेळी आ.चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर तहसीलदार गिरीश वखारे तसेच संबंधित अधिकारी यांना सोबत घेऊन तात्काळ पंचनामे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी अखिल भारतीय माळी समाज महासंघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा डॉ.प्रमिलाताई पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांची सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम पाहता त्यांची अखिल भारतीय माळी समाज महासंघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी रमेश सोनवणे (चाळीसगाव), उपाध्यक्षपदी कैलास वेळू माळी (बोदवड), दिनेश रघुनाथ माळी (भडगाव), महेंद्र कृपाराम बाविस्कर (जामनेर), बापू तुकाराम महाजन…