Author: Sharad Bhalerao

साईमत, पहूर, ता.जामनेर : वार्ताहर पहुर पेठ येथील वाघूर नदीच्या तीरावर श्री क्षेत्र केवडेश्‍वर महादेव मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमी परिसरातील अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी वाघूर विकास आघाडीतर्फे मंगळवारी, १८ जूनपासून सुरू असलेले साखळी उपोषण बुधवारी, १९ जूनला निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आले. याप्रकरणी येत्या २८ जून रोजी अंतीम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पहूर पेठ येथील हिंदू स्मशानभूमीजवळ होत असलेले अतिक्रमण काढण्यात यावे, यासंदर्भातत वाघूर विकास आघाडीतर्फे सुकलाल बारी, सहकाऱ्यांनी तहसिलदारांकडे अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. अतिक्रमण न काढल्यास साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारपासून साखळी उपोषण सुरू होते.…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी तालुक्यातील बेलाड येथे गेल्या २६ मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे ३३ के.व्ही. बेलाड उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील गावातील व शेतीतील वीज खंडित झाली होती. त्यामध्ये प्रामुख्याने उपकेंद्रापासून ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणारे विद्युत खांबे जमीनदोस्त झाले होते. वीस ते पंचवीस दिवस उलटूनही शेतीपर्यंत वीज पोचलेले नाही. त्यामुळे शेतकरी खूप मोठा अडचणीत आलेला आहे. उपकेंद्र अभियंता यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याला खूप मोठ्या नुकसानीचा फटका बसत आहे. त्याच त्रासाला कंटाळून बुधवारी, १९ जून रोजी शेतकऱ्यांनी संभाजी शिर्के यांना सोबत घेऊन महावितरणमध्ये ठिय्या आंदोलन करुन महावितरणला टाळे ठोकले.विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी बेलाड उपकेंद्र येथे आपल्या व्यथा मांडल्या. पेरणीच्या तोंडावर वीज…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीन बंधू आंबेडकर बोर्डिंग, जुनी दोस्त टॉकिज, घाट रोड, चाळीसगाव येथे जाहीर भाषण केले होते. त्या प्रसंगाला ८६ वर्षे झाली आहेत. त्यानिमित्त बुधवारी, १९ जून रोजी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन सभा आयोजित केली होती. सभेत मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रा.गौतम निकम लिखित ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची खान्देशातील भाषणे व वृत्तांत’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा स्मारक निर्मिती महाराष्ट्र शासनाने करण्यासाठी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून जनहितार्थ निवेदन देण्यात येत आहे की, १९ जून १९३८ (८६ वर्षे होत आहे) आणि २३ ऑक्टोबर १९२९ (९५ वर्षे होत आहे) या दोन्ही दिवशी…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील देशमुख वाडा येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तरूणाला टेलीग्राम व व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क देवून त्यांच्याकडून ऑनलाईन पध्दतीने वेळोवेळी पैसे घेवून कोणताही परतावा न देता तब्बल १२ लाख ७९ हजार ३७५ रूपयांची ऑनलाईन फसवणूक करुन गंडविल्याची घटना मंगळवारी, १८ जून रोजी घडली आहे. याप्रकरणी रात्री साडेआठ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चाळीसगाव शहरातील देशमुख वाडा येथे विशाल रामराव सूर्यवंशी (वय २७) हा तरूण वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. गेल्या १० मे २०२४ रोजी विशालला प्लेक्स मुव्हीज या टेलीग्रामवर तसेच व्हॉटस्‌ॲपवर आणि कस्टमर केंअर व्हॉटस्‌ॲप क्रमांकावरून फोन व…

Read More

साईमत, पहूर, ता.जामनेर : वार्ताहर पहूर पेठ येथील वाघूर नदीच्या तीरावर केवडेश्‍वर मंदिराजवळ हिंदू स्मशानभूमी लगतचे अतिक्रमण काढण्यासाठी वाघूर विकास आघाडीतर्फे बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरु केले आहे. पहूर पेठ येथे वाघूर नदीच्या तीरावर केवडेश्‍वर मंदिराजवळ हिंदू स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीलगत अतिक्रमण झालेले आहे. या अतिक्रमणामुळे शोकाकुल बांधवांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नसते. दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच आहे. याकडे मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गेल्यावर्षी वाघूर विकास आघाडीतर्फे स्मशानभूमीतील अतिक्रमण काढण्यासाठी घंटानाद आंदोलन करून जागा मोजणीसाठी लोकवर्गणीतून शासकीय शुल्क भरले. प्रशासनाने अतिक्रमण काढण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, वर्ष उलटले तरी अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी आत्मशोधातून कवितेची रचना करत असताना कवी आपल्या संवेदनशील मनातून सभोवतालचे जगही टिपत असतो. जयश्री काळवीट यांची कविता आत्मशोध आणि सभोवतालचे अभिव्यक्ती मांडणारी आहे. त्यांच्या कवितेचे मुख्य सूत्र आशयगर्भ कविता आहे. ‘कवितेच्या गहिऱ्या डोही’ ह्या काव्यसंग्रहातून त्यांच्या संवेदनशील मनाचे प्रतिबिंब उमटले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांनी केले. भुसावळ येथील ब्राह्मण संघात आयोजित कवयित्री जयश्री काळवीट रचित ‘कवितेच्या गहिऱ्या डोही’ ह्या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मू.जे.महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉ. चारूता गोखले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपप्राचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. वा. ना. आंधळे, मू.जे. कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.सौ. संध्या महाजन,…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ येथील कळमडू माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तथा व्याख्याते प्रदीप देसले यांना अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे एरंडोल तालुक्यातील श्रीक्षेत्र पद्मालय येथे नुकतेच आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी खा.श्रीमती स्मिताताई वाघ, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी राजे दहातोंडे, राष्ट्रीय संघटक डॉ.गजेंद्र भोसले, जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पी.एम.पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल बिडे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, जिल्हा संघटक बी.बी.भोसले, जिल्हा सल्लागार संभाजी इंगळे, मच्छिंद्र पाटील, जिल्हा सचिव साहेबराव पाटील, उ.बा.ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष महानंदा पाटील, पंचायत समितीचे सभापती तथा पद्मालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष…

Read More

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी येथील बस स्थानक चौक तिरंगा सर्कल येथे दुपारी शाळा भरताना आणि सुटताना वाहतूक पोलीस आणि शाळेजवळ दामिनी पथक किंवा साध्या वेशातील पोलीस यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन शिवसेना (शिंदे गट) यांच्यावतीने बुधवारी, १९ जून रोजी पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना देण्यात आले. निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, १५ जूनपासून शाळा, विद्यालय, महाविद्यालय सुरू झाले आहे. वरणगावसह परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनी वरणगाव येथे मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करत असतात. बसस्थानक चौक तिरंगा सर्कलजवळ दुपारी ११ ते १२ या वेळेत विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी आणि तिकडून शाळेतून घरी येण्यासाठी…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या जे.ई.स्कुलच्या ज्यु.कॉलेजचे १९९३-९४ व १९९४-९५ च्या बॅचचे माजी विद्यार्थ्यांनी व्हाट्सॲप ग्रुपवर ‘गेट-टु गेदरची’ संकल्पना मांडली. त्याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘गेट-टु गेदरची’ संकल्पना प्रत्यक्षात खरी करुन दाखविली. मुक्ताईनगर-मलकापूर हायवेला लागून पद्मश्री लॉन्समध्ये हा ‘गेट-टु गेदर’चा कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाला मुंबई, पनवेल, कल्याण, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, अमरावती, नागपूर, पुणे येथून विद्यार्थी आले होते. २९ वर्षानंतर मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी जे.ई.स्कुलचे प्राचार्य आर.पी.पाटील, उपशिक्षक एस.पी.राठोड, संजय ठाकूर, कल्याण येथून आलेले प्रकाश इंगळे उपस्थित होते. शाळेप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी व शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या निमखेडी येथील शाळेच्या…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी संसाराचा गाडा चालविणाऱ्या घरातील कर्त्या पुरुषाच्या मदतीला आपणही आलो पाहिजे, असे अनेक स्त्रियांना वाटते. मात्र, शिक्षणाचा अभाव म्हणा वा उंबरठा ओलांडून बाहेर निघण्याची परवानगी नसल्याने अनेकींच्या मनात ही खंत राहत आली आहे. असे कष्ट घेण्याची तयारी असलेल्या होतकरू महिलांसह युवतींना रोजगाराचे दालन सामाजिक कार्यकर्त्या इंजि. कोमल सचिन तायडे यांनी कापड पिशवी उद्योगाच्या माध्यमातून देत आहे. मलकापूर, नांदुरा, खामगाव आदी भागात घरोघरी शिलाई मशिनचे काम करणाऱ्या कष्टकरी महिलांना एस.के.स्केअर इंटरप्राईजेसच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या इंजि. कोमल तायडे ह्या शासनमान्य कापड देऊन त्यांच्याकडून पिशव्या शिवून घेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्या उपक्रमात असंख्य महिला जोडल्या गेल्या…

Read More