साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील पिंप्राळ्यातील ७, सूर्या अपार्टमेंटमधील रहिवासी तथा दै.‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांचे पिताश्री निळकंठ अवसू बऱ्हाटे (वय ८६) यांना रविवारी, २३ जून २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास देवाज्ञा झाली. त्यांची अंत्ययात्रा आज रात्री ८.३० वाजता त्यांच्या राहत्या घरुन निघेल. त्यांच्या पार्थिवावर नेरी नाका येथील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते ‘साईमत’ मीडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक परेश बऱ्हाटे यांचे आजोबा तर ‘लोकहित दर्पण’च्या संपादिका सुरेखा बऱ्हाटे यांचे सासरे होत.
Author: Sharad Bhalerao
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा गावातील युवकांनी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीचा अभ्यास दौरा नुकताच यशस्वीरित्या केला. शेती क्षेत्राची पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामतीचे वैभव प्रत्यक्ष बघता यावे, या उद्देशाने जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. धरणगाव शहर तसेच डॉ.हेडगेवार ग्रामपंचायत येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी तथा गावातील होतकरू युवकांनी सहभाग नोंदविला. नियोजित दौऱ्यात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या भेटींचा योग जुळून आला. जिद्द उराशी बाळगून युवक परतले…! बारामतीचे खरे वैभव असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राचा…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर दातृत्व हा एक अलौकिक असा सद्गुण आहे. शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या बालमनावर दातृत्वाचा संस्कार बिंबविण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात होत आहे. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या हातांना दातृत्वाच्या सुगंधाचा स्पर्श होऊन त्यांच्यातील माणुसकी जोपासली जात असल्याच्या प्रतिक्रिया पालक व्यक्त करीत आहेत. वाढदिवसानिमित्त विद्यार्थी आपल्या मित्रांना, शिक्षकांना चॉकलेट किंवा खाऊचे वाटप करतात. परंतु आपल्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी जर काही मदत केली तर नक्कीच ती उपयोगी ठरू शकते, ही संकल्पना शाळेतील उपक्रमशील शिक्षक शंकर रंगनाथ भामेरे यांनी राबविली. त्यांनी वाढदिवसानिमित्त दोन वर्षांपूर्वी शाळेला गरीब विद्यार्थी सहायता निधी पेटी भेट देऊन उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. गेल्या दोन वर्षांत गरीब विद्यार्थी…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. येथील विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी योग साधनेस प्रारंभ झाला. प्रार्थना, ओमकार यांच्यासह योगाचे विविध धडे योग शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांनी विद्यार्थ्यांना दिले. तसेच ‘करो योग, रहो निरोग’ असे योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन.चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन. मराठे, पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे, पर्यवेक्षक व्ही.जी. महाजन, जी.जे.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. योग दिन कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा विभागप्रमुख जी.सी.पाटील यांनी केले होते. यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक प्रा.समीर घोडेस्वार तर आभार बी.पी.बेनाडे यांनी मानले.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील शासकीय विश्रामगृहात अण्णाभाऊ साठे स्मारक समितीची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात स्मारक समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन अध्यक्षपदी नितीन मरसाळे, उपाध्यक्षपदी गजानन चंदनशिव तर सचिवपदी रवींद्र खैरनार यांची सर्व समाज बांधवांच्यावतीने सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीला सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. स्मारक समितीच्या उर्वरित कार्यकारिणीत सहसचिव कल्पना शेजवळ, कार्याध्यक्ष अण्णा कांबळे, संपर्क प्रमुख रवींद्र कालोंखे, कोषाध्यक्ष सुभाष पगारे, उपकोषाध्यक्ष निलेश खरात, संघटक निलेश शिरसाठ, प्रसिध्दी प्रमुख अजय पाखरे, समन्वयकपदी राहुल मरसाळे, मनोज नावगिरे, गजानन हतांगडे तर सदस्यांमध्ये प्रशांत शिरसाठ, भूषण मरसाळे, अक्षय शिरसाठ, लकी शिरसाठ, सोनु साळवे, वंश साळवे, संदीप मरसाळे, योगेश शिरसाठ, गौरव शिरसाठ,…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकक, राष्ट्रीय छात्र सेना आणि जिमखाना विभागातर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाचे धडे देण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी होते. कार्यक्रमासाठी योग शिक्षिका लीना पाटील यांना मार्गदर्शक म्हणून आमंत्रित केले होते. यावेळी उपप्राचार्य डॉ.ए. एल.चौधरी, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, वसंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी योग शिक्षिका लीना पाटील यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिके करत त्या प्रत्येक आसनांचे महत्त्व उपस्थितांना पटवून सांगितले. यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अमोल पाटील, विजय शुक्ल, सुधाकर बाविस्कर यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर येथील विविध शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांकडून ‘योगाचे पाठ’ गिरवून घेण्यात आले. यावेळी विविध शाळांमध्ये मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आर. टी. लेले हायस्कुल पहुर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर.टी. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगाचे प्रात्यक्षिके सादर केली. गोपाळ थोरात, अनिल पाटील, संतोष भडांगे यांनी विद्यार्थ्यांसमोर योगाची प्रात्यक्षिके सादर केली. मुख्याध्यापक एस. आर. सोनवणे, पर्यवेक्षक मधुकर पवार यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते. मिल्लत उर्दू हायस्कुल येथील शकील शहा यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिके करून दाखवित विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील नगरपालिकाचे मुख्याधिकारी (प्रशासक) निवडणूक कामासाठी बाहेरगावी गेले असल्यामुळे नगरपालिकेच्या कार्यालयात दुपारी ‘सन्नाटा’ पसरल्याचे दिसून आले. अक्षरशः कार्यालयात कर्मचारी आपल्या खुर्च्यावरून गायब होते. कोणी खासगी कामाने बाहेर गेले आहे तर कोणी जेवण करून अद्याप आलेच नाही, असे तेथील कर्मचाऱ्यांनी बोलतांना सांगितले. मुख्याधिकारी कार्यालयात नसले तर कर्मचारी, अधिकारी पण गायब असतात. त्यांची संबंधित अधिकारी चौकशी करतील का? अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरात नागरी सुविधांच्या समस्यांचे डोंगर उभे असतांना अधिकाऱ्यांसह कर्मचारी त्यांची कामे वेळेवर करत नाही. चाळीसगाव नगरपालिका प्रभागात अस्वच्छता पसरली आहे. ठिकठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. वार्डात कचरा साचला आहे. बहुतांश वेळा रस्त्यावरील पोलवरचे स्ट्रीट लाईट दिवसा…
साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर पहूर कसबे येथील हिंदू स्मशानभूमीतील बैठक ओट्याचे अर्धवट बांधकाम पूर्ण होण्यासाठी शुक्रवारी, २१ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली ‘भीक मांगो आंदोलन’ करण्यात आले. यावेळी पहूर कसबे ग्रामपंचायतीसमोर महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पहुर कसबे येथील हिंदू स्मशानभूमीतील बैठक ओट्याचे बांधकाम ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने निधी काढून हे काम अर्धवट सोडून दिले आहे. यासंदर्भात गेल्या १० दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार दिलेली आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच रखडलेले काम पूर्ण करण्याचे कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचखेडा बु. गावातील अल्पवयीन चिमुकलीवर गेल्या ११ जून रोजी अत्याचार करून तिचा खून करून पसार झालेल्या सुभाष उमाजी भील (वय ३५) या आरोपीला गुरुवारी, २० जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ येथील तापी नदीच्या परिसरातून अटक केली. आरोपीला जामनेरमध्ये घेऊन येणार आल्याची वार्ता शहरासह तालुक्यात पसरल्याने जामनेर पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठा जमाव जमा झाला होता. यावेळी जमावाने शहरातील महामार्ग रोखून रस्त्यांमध्ये टायर जाळून आरोपीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांकडून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला गेला. आरोपी जामनेर येथे नसून तो जळगाव येथे असल्याचे पोलिसांकडून जमावाला सांगण्यात आले. जमावाचे समाधान न झाल्याने त्यांनी आरोपीला…