Author: Sharad Bhalerao

साईमत/ न्यूज नेटवर्क/ यावल : आदिवासींशिवाय जंगल नाही आणि जंगलावाचून आदिवासी नाही, ही संकल्पना मांडून त्यांचे व जंगलाचे महत्व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. त्यांनी यावल येथे यावल वन विभागाच्या आयोजित कार्यक्रमात उपस्थित आदिवासी बांधव, वन अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. उमेद स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने यावल पूर्व वनक्षेत्रात वन महोत्सव सप्ताहानिमित्त आदिवासी बांधव, ग्रामस्थ व शेतकरी तसेच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना पाच दिवसीय गौण वनोपजाचे उत्पादन, व्यवस्थापन आणि कौशल्य वाढविण्याचे प्रशिक्षण फाउंडेशनचे अध्यक्ष विरेंद्र छाजेड आणि त्यांच्या चमूकडून नुकतेच देण्यात आले. प्रशिक्षणार्थी आदिवासी ग्रामस्थ, शेतकरी, बचत गट सदस्य, संयुक्त वन व्यवस्थापन समिती व वन कर्मचारी यांना…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ वरणगाव : बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारोती मंदिर येथे नवस फेडण्यासाठी जाणारे चार चाकी वाहन हतनूर ते वरणगाव फॅक्टरी मार्गावर उलटून अपघात घडला. त्यात नऊ भाविक जखमी झाले असुन सुदैवाने जीवितहानी टळली आहे. ही घटना रविवारी, ७ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली. अपघातात बोरेलो वाहनाचे मागील दोन्ही चाके निखळून पडली असल्याचे घटनास्थळी दिसून आले. याप्रकरणी वरणगाव पोलिसात रात्री उशीरापर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले. सविस्तर असे की, चोपडा तालुक्यातील आडगाव येथील सूर्यवंशी कुटुंबातील मनोज ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांचा एक वर्षीय बालकाचा मानलेला नवस फेडण्यासाठी बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारोती मंदिर येथे रविवारी, ७ जुलै रोजी आयोजन…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ फैजपूर : जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचा पाया रचणारे, तापी परिसराला सुजलाम्‌-सुफलाम्‌ करणारे नेतृत्व लोकसेवक बाळासाहेब स्व.मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी, ७ जुलै रोजी खिरोदा येथे कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. सोहळ्यात कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र शासन, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा यांनी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र जनतेसाठी काम केले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी स्व.मधुकरराव चौधरी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला स्व.मधुकरराव चौधरी यांना मान्यवरांच्या हस्ते श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कार्यक्रमानिमित्त व्यक्त केलेल्या भावनांची चित्रफित दाखविण्यात आली. शिक्षण क्षेत्रात पहिली श्वेतपत्रिका काढणारे मंत्री. त्यांच्या श्वेतपत्रिकेतील…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/फैजपूर : स्व. मधुकरराव चौधरी यांनी आपल्या ३५ वर्षाच्या राजकारणात राहून आपल्या चरित्रावर कोणत्याही प्रकारचा डाग लागू दिला नाही, हे विशेष आहे. त्यामुळे स्व.मधुकरराव चौधरी यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आदर्श आजच्या राजकारण्यांनी घ्यावा,असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. लोकसेवक बाळासाहेब स्व.मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञता सोहळा रविवारी, ७ जुलै रोजी खिरोदा येथे आयोजित केला होता.त्यावेळी कृतज्ञता सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. संयुक्त महाराष्ट्राचेे वातावरण होते. अशा संतप्त वातावरणात निवडून आल्यानंतर मधुकरराव यांना यशवंतराव चव्हाण यांनी पहिल्याच वेळी मंत्री केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात तापी व सातपुडा परिसराचा विकास, प्रक्रिया उद्योग सुरू केले. उमवि, विमानतळ, इंजिनिअरिंग कॉलेज विधानसभा…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/अमळनेर : शहरातील राम मंदिर, प्रताप तत्त्वज्ञान केंद्रापासून ते बंगाली फाईल, अयोध्या नगर, रामवाडी, केशवनगर, गायत्री नगर, गणेश कॉलनी आणि तांबेपुरापर्यंत पूर्ण ‘रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता’ आहे हेच कळत नाही. कारण या भागातील रस्ते चिखलाने पूर्णपणे माखले आहेत. त्यामुळे रस्त्याचे ‘तीन तेरा’ वाजले आहेत. या रस्त्यातून पायी चालणे आणि दुचाकीवरूनही जाणे अशक्य झाले आहे. त्यामुळे परिसरातील महिलांनी डंपर अडवून रास्ता रोको केला. ही समस्या तात्काळ न मिटविल्यास महिलांनी पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे परिसरातील महिलांनी नगर पालिका प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला होता. अमळनेर शहरातील विविध भागात भुयारी गटारीचे काम अद्यापही सुरूच आहे. त्यासाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यात…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/चाळीसगाव : पंचक्रोशीला पंढरपुरच्या वारीची अशी मोठी परंपरा आहे. टिळक चौकातील तीनशे वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदीर या परंपरेचे प्रतिक म्हणता येईल. वै. ह.भ.प. मोतीराम महाराज यांनी पंढरपूर वारीचा पाया रचला तर बेलदारवाडी येथील सिद्धेश्वर आश्रमाचे प्रमुख ह.भ.प. १००८ महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली यांनी यावर कळस चढविला. गावोगावी अलंकापुरीची वारी करणारे असंख्य कुटूंबे, परिवार आहे. वारकरी कुटुंबाचा वारसा असणारे आ.मंगेश चव्हाण यांनी २०१९ पासून चाळीसगाव मतदारसंघातील हजारो वारकऱ्यांसाठी “भक्ती जेष्ठांची… वारी पंढरीची” असा अभिनव उपक्रम सुरु केला. परिस्थितीमुळे असो की वेळेमुळे असो ज्यांना पंढरीची वारी शक्य नाही अश्या भाविकांना मोफत प्रवास, जेवण, निवास व्यवस्था आदींच्या माध्यमातून पंढरीचे दर्शन घडविले जाते. २०१९…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/यावल : संपूर्ण यावल शहराचे नाक असलेल्या फालकनगरमध्ये दर्शनी भागातील गटारींचा आणि रस्त्याचा कसा बोजबारा वाजला आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत लागत आहे. यावल शहरातील अनेक भागात स्वच्छता आणि आरोग्य विभागाच्या अभियंत्यांचे कामकाज कसे चालले आहे, हे दिसून येत आहे. त्यांच्या कामाचा लक्षवेधी नमुना आणि पुरावा समोर आला आहे. यावल नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात भुसावळ रस्त्यावरील फालकनगर एस.टी.बस स्टॉपजवळील भागात म्हणजे सद्गुरु ऑटोपासून पत्रकार डी.बी.पाटील यांच्या घरापर्यंतच्या व आजूबाजूच्या परिसरात गटारींची आणि रस्त्याची किती व कशी दयनीय अवस्था झाली आहे. रहिवाशांना किती त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे अभियंता आणि आरोग्य विभागाच्या प्रमुखांचे दुर्लक्ष…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/मलकापूर : जुन्या जाणत्या वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घराघरात ‘वंचित’ कशी पोहोचेल, यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा तर वंचितचे मलकापूर येथील जिल्ह्यातील स्वयंघोषित नेते यांनी लोकसभेत भ्रष्टाचाराचे बी पेरले. त्यामुळे पक्षांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. कोणीतरी पक्षाच्या किंवा कोणाच्यातरी हिताच्या बाजू करून पक्ष विरोधी घटना घडवून आणतात. चुकीची माहिती देऊन पक्षाच्या ध्येय धोरणात दुरावा निर्माण करतात. त्यामुळे पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलल्या जाते, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर यांनी व्यक्त केले. नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे मलकापूर विधानसभा क्षेत्राच्या चिंतन बैठकप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद इंगळे, अॅड.सदानंद…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/मलकापूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष बच्चू कडू यांच्या जनसेवेच्या कार्याला साजेसे असे कार्य मलकापूर येथे प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. अशातच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन ‘समतेचे निळे वादळ’ सामाजिक संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी केले. शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक श्री आत्मानंद दरबार जैन मराठी प्राथमिक पूर्व माध्यमिक शाळा येथे प्रहार जनशक्ती पक्ष आणि महेश अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. यावेळी रमेशसिंह राजपूत, बी.जे.संचेती लोकसेवा ट्रस्टचे अमरकुमार संचेती, महेश अर्बनचे संचालक धिरज मुंधडा, पत्रकार बाळासाहेब जगताप, हरीभाऊ गोसावी, विरसिंहदादा…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/वरणगाव : भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने पूल बांधल्याने येथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, बोहर्डीचे सरपंच विशाल सोनवणे यांनी पूल बांधतांना पाईपांच्या पुलाप्रमाणे तिरपा बांधा, असे सांगितले होते. परंतु, याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खिरोदा – वाकोद राज्य मार्ग क्रमांक ४६ वर भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ उन्हाळ्यात पुलाचे बांधकाम केले आहे. मात्र, हा पूल पूर्वी असलेल्या नाल्याच्या प्रवाहाच्या वेगळ्या पद्धतीने बांधला आहे. नाल्याचे पाणी थेट तीन ते चार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाल्याचे पाणी जात असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच पूल बांधताना एका…

Read More