Author: Sharad Bhalerao

साईमत/ न्यूज नेटवर्क/ अमळनेर : तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गातील विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन याचा शेवटच्या तासाला शाळेत चक्कर येऊन पडून दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन (वय १५) हा शाळेच्या पटांगणात खेळत असताना अचानक चक्कर येऊन पडला. त्यावेळेस शिक्षकांनी त्याला सावरले. त्यानंतर स्थानिक डॉक्टरांनी त्याची तपासणी करत त्याच्यावर प्रथमोपचार केले. त्याला त्वरित अमळनेर येथे डॉ.निखिल बहुगुणे यांच्या दवाखान्यात दाखल केले. त्यांनी तपासून अमळनेर…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/जामनेर : येथील गोविंद महाराज नगरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पत्रकार बांधवांतर्फे शैक्षणिक साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, जामनेर न.प.चे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, जिकरा शिक्षण संस्थेचे सचिव जाकीर शेख यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार सुनील इंगळे, अनिल शिरसाठ, नितीन इंगळे, देविदास विसपुते, किरण चौधरी, सागर लव्हाळे, बबलु शेख, इम्रान खान, ईश्वर चौधरी, सुनील सुरवाडे, मनोज दुबे तसेच केंद्र प्रमुख संगिता पालवे, शाळेचे मुख्याध्यापक अनंत अरतकर, खेमराज नाईक यांच्यासह नागरिक उपस्थित होते. प्रत्येक महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आपणही समाजाचे…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ पहुर, ता.जामनेर : खान्देश आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या जळगाव -छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफवरील पहूर येथील वाघूर नदीच्या पुलाचे रखडलेले काम पूर्ण होण्यासाठी पहूर येथे चक्क पत्रकार बांधवांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शुक्रवारी, १२ जुलै रोजी तब्बल तासभर चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे चारही रस्त्यांवर शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जालना विभागाचे अभियंता संदीप पाटील यांनी पुलाचे काम महिन्याभरात पूर्ण करतो, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर आणि पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना शहर पत्रकार संघटनेतर्फे महामार्ग संदर्भातील विविध आणि प्रमुख मागण्यांचे…

Read More

साईमत I जळगाव I न. प्र. I ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक बिपिन दिनकर झोपे आणि नंदिनीबाई माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका वैशाली बिपिन झोपे यांच्या विवाहबंधनाच्या स्नेहील सहजीवनाच्या वाटचालीला २५ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त ए. टी.झांबरे विद्यालयाच्या मैदानावर मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या सहकार्याने झोपे दांपत्याने आरोग्यदायी २५ वृक्षांचे रोपण केले. तसेच त्या वृक्षांच्या संवर्धनाचा संकल्प केला. वृक्षारोपण म्हणजे भविष्यासाठी एक नवे पणाची पेरणी आहे. हळुवार बहरणाऱ्या, फुलणाऱ्या या वृक्षांप्रमाणे या झोपे पती, पत्नीच्या आयुष्यात स्नेह, प्रेम फुलत रहावे. समाजाप्रती नवजाणीव जपणाऱ्या या उभयंताना शुभकामना देण्यात आल्या. या वेळी नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सी.एस पाटील, शालेय समन्वयक राहुल वराडे, एन.…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ जळगाव : शहरातील सुकृत्ती ड्रीम होम प्लॅट न. वी वाटीका आश्रमजवळील रहिवासी तथा प्रशासकीय सेवेतील कार्यरत कर्मचारी भारत कुंडलिक भगत यांनी काही कारणास्तव वीज बील उशीराने अदा केले होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा लेखी आदेश नसताना गुरुवारी, ११ जुलै रोजी विद्युत पुरवठा खंडीत केेला आहे. त्यामुळे त्यांनी पिंप्राळा सबस्टेशन वीज महावितरणचे उपअभियंता यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर उकाडा होत आहे. अशातच भारत भगत यांना अस्थमाचा त्रास आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचारी जबाबदार राहतील, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या तक्रारीची महावितरणच्या…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ यावल : शहरातील एकूण ८ रेशन दुकानदारांच्या दुकान तपासणीचा नमुना प्रत्यक्ष बघितल्यावर यावल पुरवठा विभागातील निरीक्षक अधिकारी अर्चना एस.भगत, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड आणि स्वस्त धान्य दुकानदार यांचा अनुक्रमे तपासणी व कार्यवाही अहवाल म्हणजे ‘चोर पोलिसांचा खेळ’ झाला आहे. आजही अनेक स्वस्त धान्य दुकानांमध्ये त्रुटी राहिल्या असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. कारवाई झाल्यानंतर पुढे काय ? स्वस्त धान्य दुकानदार पुरवठा विभागाच्या नियमानुसार आणि प्रमाणानुसार ग्राहकांना धान्य वितरित करीत आहेत का..? असा प्रश्न तालुक्यात उपस्थित केला जात आहे. शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ता प्रवीण डांबरे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे गेल्या २८ फेब्रुवारी २०२४ रोजी माहितीचा अर्ज…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ पहुर, ता.जामनेर : जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील पहुर येथील पूलाचे काम पूर्ण करा, अशा प्रमुख मागण्यांसाठी शहर पत्रकार संघटनेतर्फे शुक्रवारी, १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता वाघुर नदी पुलावरच शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कुमावत यांच्या नेतृत्वाखाली ‘रास्तारोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. पत्रकार संघाकडून तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना आंदोलनाची माहिती देण्यात आली आहे. शहर पत्रकार संघटनेतर्फे पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप आणि जामनेर येथील तहसीलदार नानासाहेब आगळे यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कुमावत, ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम लाठे, कार्याध्यक्ष किरण जाधव, सदस्य डॉ. संभाजी क्षीरसागर, माजी अध्यक्ष शंकर भामेरे…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ जळगाव : डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विश्वविद्यालय इन्दोर (म.प्र.) यांच्यामार्फत मिनल बऱ्हाटे (मिनल तुषार कोल्हे) यांना “Design and Implementation Facial Expressions Recognition Based on LBP and DRLBP” विषयावर प्रबंध सादर करून कॉम्पयुटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये पी.एच.डी. पदवी प्रदान केली आहे. सध्या त्या पुणे येथे विश्वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ टेकनॉलॉजी येथे कार्यरत आहेत. याबद्दल विश्वविद्यालयाचे सर्व स्टाप, कर्मचारी, स्नेही, परिवारातील सर्व सदस्य, मित्र व महाविद्यालयाकडून डॉ. मिनल बऱ्हाटे (मिनल तुषार कोल्हे) यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ लोहारा, ता.पाचोरा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘माणुसकी रुग्णसेवा समूहाचे’ जळगाव जिल्हाध्यक्ष तथा समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पावसाळा असल्याने साथरोग आशयासंदर्भात विचारणा केली. तेव्हा सर्व ग्रामपंचायत स्तरावर पाणी तपासणी, टीसीएल साठा अद्ययावत ठेवणे, पाईपलाईन गळतीबाबत पत्र देण्यात आले आहे. औषधसाठा दोन ते तीन महिने पुरेल एवढा उपलब्ध आहे, अशी माहिती मिळाली. तसेच साथरोग पथक तयार केले आहे. यावेळी मुख्यालयीन कर्मचारी, वैद्यकीय अधीक्षक, औषधी निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, शिपाई सर्व कर्मचारी हजर होते. मात्र, आरोग्य सहाय्यक दयाराम नेटके हे गैरहजर होते. त्यामुळे सरकारी पगार घेऊन कर्तव्यात कसूर करत असल्याने आरोग्य सहाय्यक यांची त्वरित…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ जामनेर : शहरातील फळ विक्रेते व हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या समस्येसंदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्यावतीने गेल्या ५ रोजी निवेदन दिले होते. निवेदनावर तीन दिवसात कुठलीही कार्यवाही न झाल्याने अखेर हातगाडी धारकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून हातगाडी धारकांच्या समस्येवर तात्पुरता मार्ग काढला आहे. रहदारीला अडथळा होणार नाही त्याची खबदारी घेऊन हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना हातगाडी लावण्यास तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. आंदोलनानंतर मुख्याधिकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, माजी युवक तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, शहराध्यक्ष सचिन बोरसे, प्रल्हाद बोरसे, उत्तम पाटील, संतोष…

Read More