Author: Sharad Bhalerao

प्रहारचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी केली पाहणी साईमत/ न्यूज नेटवर्क/ फैजपूर : शहरातील मिल्लत नगर परिसर नव्याने वाढणारा भाग आहे. त्याठिकाणी सोयीसुविधा नसल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी नुकतीच भेट दिली. चिखलातून वाट तुडवित त्यांनी संपूर्ण भागात पाहणी केली. तसेच लागलीच नगरपालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. फैजपूर नगरपालिकेतर्फे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरात लवकर पाऊले न उचलल्यास आगामी काळात आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल, असे अनिल चौधरी यांनी सांगितले. फैजपूर शहरातील मिल्लत नगर परिसरात नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिसरात जाण्यासाठी रस्ते नाही, पिण्याच्या…

Read More

मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश, वितरणाचे आदेश : रा.काँ.चे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांच्या माहिती साईमत/ न्यूज नेटवर्क/ अमळनेर : शेतकऱ्यांसाठी नेहमीच संवेदनशील असणाऱ्या मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांसाठी सुखद वार्ता आली आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये 75 टक्के रकमेसाठी 68 हजार 850 शेतकऱ्यांना 41 कोटी 97 लाख, 24 हजार 104 रकमेचा पीकविमा मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी दिली. जळगाव येथे मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पीक विम्याची रक्कम वितरित करण्याचे आदेशही झाले आहे. रक्कम ऑगस्ट अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती भागवत पाटील यांनी दिली. अडचणीच्या वेळी…

Read More

विठ्ठलाच्या चरणी माथा टेकून मुक्ताई पालखी माघारी साईमत/ न्यूज नेटवर्क/ मुक्ताईनगर : पंढरपुरात दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी कोथळी मुक्ताईनगर येथून मुक्ताईबाईची पालखी जात असते. आषाढी ए‌कादेशीला लाखो भाविकांनी जावून विठ्ठलाचे दर्शन घेतले. तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांकडून भगिनी आदिशक्ती मुक्ताबाईस साडीचोळी भेट देण्याचा ऐतिहासिक भावनिक सोहळा शनिवारी झाला. 21 जुलै रोजी सकाळी गोपाळपुऱ्यात पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र हरणे महाराज यांचे गोपाळकाला व काल्याचे कीर्तन होवून भगवान श्रीविठ्ठल दर्शन घेवून पालखीने निरोप घेऊन दुपारी माघारी मुक्ताईनगरच्या दिशेने निघाली. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर मुक्ताबाई पादुकांना मंत्रोच्चारात पंचामृत अभिषेक पूजा करण्यात आली. पंढरपुरात मुक्ताईचे पालखी गुरूपौर्णिमेला विठ्ठलाचे सर्व वारकरीचे दर्शन झाल्याचा आनंद सर्व वारकऱ्यांना आहे. मुक्ताईला…

Read More

गुरु पौर्णिमेनिमित्त महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे प्रतिपादन साईमत/ न्यूज नेटवर्क/ फैजपूर : एकदंत महाराज यांनी ब्रह्म जाणणारा तो ब्रह्म आहे. गुरु हे स्वयं ब्रह्मरूप असतात. या गुरुच्या सिद्धांतांना आचरणात आणणे ही गुरूंना खरी ‘वंदना’ ठरते. परिस केवळ लोखंडाला सोनं करतो तर गुरु हे शिष्याला आपल्यासमान बनवितात इतके ते महान असतात, असे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. गुरु पौर्णिमेनिमित्त श्री सतपंथ मंदिर संस्थान येथे सकाळी महापूजेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. महापूजेनंतर निष्क्रलंक धाम वढोदा याठिकाणी गुरुवाणी सत्संग व गुरुदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रारंभी अक्षर निवासी सद्गुरू शास्त्री भक्तीकिशोरजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. नंतर वैदिक…

Read More

वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल साईमत/ न्यूज नेटवर्क/ वरणगाव : भर वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने वरणगावातील युवकाचा मृत्यू झाला. घटनेत दोन जण जखमी झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास महामार्गावरील कपील वास्तु नगर समोर घडली. याबाबत वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दादाराव नारायण जमदाडे (वय ३६, रा. वामन नगर, वरणगाव) त्याची दुचाकी (क्र.एम. एच. १९ ए. एच. ४७३९) वरुन दीपनगर येथील कामावरुन घरी येत असतांना त्यास समोरुन भरवेगात हिरो होंडा शाईन कंपनीच्या दुचाकी (क्र.एम.एच. १९ डी. ए. ७९२६) वरील चालक साजीद अहमद पूर्ण नाव माहित नाही. त्याने धडक दिल्याने दादाराव नारायण जमदाडे यांचे डोक्याला जबर मार लागल्याने जागीच…

Read More

दोन हजार वृक्षांचे वृक्षारोपण करण्याचे काम घेतले हाती साईमत/ न्यूज नेटवर्क/ जामनेर : तालुक्यातील मालदाभाडी येथील न्यू इंग्लिश स्कुल शाळेत वन महोत्सवानिमित्त ‘एक पेेड माॅ के नाम’ उपक्रमाचे आयोजन केले होते. सामाजिक वनीकरण विभाग जामनेर व ग्रीन आर्मी यांच्यातर्फे ‘एक पेेड माॅ के नाम’ संकल्पनेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला एक विद्यार्थी एक झाड देवून वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी २०० वृक्षांचे वाटप मालदाभाड़ी शाळेत करण्यात आले. यासाठी भारतीय जैन संघटना, जैन सोशल ग्रुप, तेरापंथ युवक परिषद, जैन सेवा मंडल, आदिनाथ ग्रुप, नवकार ग्रुप, जैन अलर्ट ग्रुप अशा संघटना एकत्र येऊन ग्लोबल वार्मिंगवर मात करण्यासाठी विविध शाळांच्या माध्यमातून दोन हजार वृक्षांचे वृक्षारोपण करण्याचे कार्य…

Read More

धामणगावमधील राष्ट्रवादी एसपी गटाचे ग्रा. पं. सरपंच, सदस्यांचा भाजपात पक्षप्रवेश साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव : तालुक्यातील धामणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, विकासो संचालक यांनी आ.मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मार्केट संचालक कमिटी संचालक नवल पवार, माजी जि प सदस्य अनिल गायकवाड, सर्वोदयचे संचालक प्रशांत पाटील, भाजपा गटप्रमुख सुनील पवार, भूषण पाटील, शिवदास महाजन, ताराचंद मोरे आदी उपस्थित होते. यावेळी सरपंच लुभान बळवंत जगताप यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य एकनाथ सुभाषराव निकम, मनोज प्रभाकर निकम, दिलीप गोविंदराव जगताप, विकासोचे संचालक लालचंद जगन्नाथ मोरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मोरे, संदीप प्रभाकर…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ रावेर : जुना सावदा रावेर रस्त्यावरील नागझिरी नाल्यावरील नवीन पुलाचे काम सुरु झालेले आहे. पुलाचे काम सुरु असतांना परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणताही पर्यायी रस्ता जवळपास नाही. नागरिकांना सोयीचा पर्यायी रस्ता तयार करावा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश चिंधु पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात नमुद केले आहे की, सावदा रावेर जुना रस्त्यावरील नागझिरी नाल्यावरील पुलाचे काम सुरु झालेले आहे. काम सुरू करण्यापुर्वी ठेकेदाराने पर्यायी रस्ता बायपास वाहतुकीसाठी करणे आवश्यक असते. तशी अंदाज पत्रकात तरतूद असते. कामही संथगतीने सुरू आहे. नागझिरी नालापार शाळा, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, वसाहत असल्याने…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ पहुर, ता. जामनेर : कपाशीच्या शेतात कोळपणी करण्यासाठी जात असताना लोंबकळलेल्या विजेच्या तारांना कोळप्याच्या लोखंडी दांड्याचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील दोंदवाडे येथे एकुलती शिवारात शनिवारी, २० जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर असे की, सध्या सर्वत्र शेती कामांना वेग आला आहे. दोंदवाडे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा प्रगतिशील शेतकरी शिवाजी गरबड पाटील ( वय ५५) हे त्यांच्या कपाशीच्या शेतात कोळपणी करण्यासाठी जात होते. त्यांनी कोळपे खांद्यावर घेऊन शेतात प्रवेश करताच लोंबकळलेल्या वीजतारांना त्यांच्या खांद्यावरील कोळप्याच्या लोखंडी दांड्याचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला. विजेच्या धक्क्यामुळे त्यांनी जोरात किंकाळी मारुन ते…

Read More

साईमत/न्यूज नेटवर्क/नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत देशातील सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्याची जबाबदारी असलेल्या गुप्तचर विभागाच्या एमएसी अर्थात बहु- संस्था केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी संस्थांच्या विविध प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत करताना गृहमंत्र्यांनी देशभरातील विविध सुरक्षा संस्थांच्या प्रमुखांना तसेच इतर गुप्तचर आणि अंमलबजावणी संस्थांच्या प्रमुखांना राष्ट्रीय सुरक्षेप्रति समग्र सरकार दृष्टिकोन अवलंबण्याचे निर्देश दिले. देशातील नव्याने उद्भवणाऱ्या सुरक्षा विषयक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दहशतवादी जाळे आणि त्यांना मदत करणारी व्यवस्था उध्वस्त करण्यासाठी सर्व संस्थांमध्ये अधिक समन्वय राखण्यावर त्यांनी भर दिला. देशातील एकूण अंतर्गत सुरक्षा स्थिती आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईचा आढावा घेताना गृहमंत्र्यांनी उपस्थितांना…

Read More