Author: Sharad Bhalerao

य.ना.चव्हाण महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ज्ञानेश्वर नेरकर यांचे प्रतिपादन साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : वय वर्ष ५ ते २५ दरम्यान मेंदूची स्वीकारण्याची क्षमता योग्य असते. मेंदू परिपक्व होतो. लहानपणी ज्या सवयी लागतात. त्या मेंदूचा एक भाग बनतात. त्या मोठेपणी सुद्धा कायम सोबत राहतात. म्हणून विद्यार्थ्यांनी वय वर्ष २५ पर्यंत स्वतःला काळजीपूर्वक जपले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी झोपण्यापूर्वी एक तास आणि उठल्यानंतर एक तास आपला मोबाईल उघडून पाहू नये असा महत्त्वपूर्ण संदेश ज्ञानेश्वर नेरकर (डिजिटल वेलनेस, फोकस मास्टरी कोच, पुणे) यांनी विद्यार्थ्यांना दिला. येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव, नॅक क्रायटेरिया क्रमांक सात आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय लक्ष्मी नगर सेंटर…

Read More

सैनिकांनी देशसेवा करत असतानाचे प्रसंगाचे केले कथन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : जामनेर तलाठी आणि मंडळाधिकारी कार्यालयातर्फे महसूल पंधरवडानिमित्त ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी सैनिकांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आले. त्यांचे अनुभव महसुलसाठी कसे प्रेरणादायी ठरतील, याबाबत हितगुज करण्यात आले. कार्यक्रमाला तालुक्यातील माजी सैनिक किशोर पाटील, कृष्णा डकले, रघुनाथ चौधरी, प्यारेलाल महाजन, राजेश देवळे, बुध्दशील सोनवणे, के. एम. राजपूत, काशिनाथ शिंदे, मंडळ अधिकारी जामनेर विजय पाटील, विष्णू पाटील, तलाठी नितीन मनोरे, आप्पा कोतवाल, संतोष कोळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी सैनिकांनी देशसेवा करत असतानाचे प्रसंग सांगितले. कारगील लढाईचे प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे प्रसंग कथन केले. यावेळी मंडळ अधिकारी…

Read More

मंत्री गिरीष महाजनांकडे अध्यक्ष डी. डी. पाटील यांचे निवेदनाद्वारे साकडे साईमत/जामनेर/प्रतिनिधी : गेल्या १४ वर्षापासून जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ कार्यरत आहे. मंडळातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय साहित्य संमेलन भरवून मंडळातर्फे साहित्यिकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, शासनाकडून कोणताही भरीव निधी आजपर्यंत मंडळाला मिळालेला नाही. त्यामुळे शासनाने त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे साकडे साहित्य सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डी.डी. पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट नुकतीच घेऊन निवेदन दिले आहे. दरम्यान, मागणीचा पाठपुरावा करून शासनाकडून निधी मिळवून देऊ, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. निवेदनात म्हटले आहे की, मंडळाचे सभासद व देणगीदार यांच्या देणगीतूनच आतापर्यंत संस्थेचा कार्यभार सुरु…

Read More

शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार साईमत/यावल/प्रतिनिधी- तालुक्यातील पाडळसे येथील भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेशदादा पाटील यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या माध्यमातून लेवा पाटीदार समाजातील एक महनीय व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबनायक रमेशदादा पाटील हे आजारी होते. अलीकडच्या काळात पंचायतीच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा ही त्यांच्या चिरंजीव ललित दादा यांच्याकडे सोपवण्यात आली होती. गुरुवारी, ८ ऑगस्ट रोजी रमेशदादा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर शुक्रवारी, ९ ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रमेशदादा पाटील यांना वंश परंपरागत पद्धतीने १९६९ साली लेवा पंचायतीच्या कुटुंबनायक पदाची धुरा मिळाली होती. यानंतर तब्बल सुमारे ५५ वर्ष त्यांनी या पदावर राहून समाजातील कौटुंबिक कलहाचा न्यायनिवाडा…

Read More

वाहन चालकांची कसरत, नेहमीच घडताहेत अपघातांच्या घटना साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : शहरातील मुख्य रस्त्यावर गुरे दिवसभर मोकळे सोडून देतात. यामध्ये गोमातेचे प्रमाण जास्त आहे. भाजी व फळविक्रेते खराब भाजी किंवा फळे रस्त्यावर टाकून देतात. तसेच काही नागरिक, व्यापारी भुतदया दाखवत मोकाट जनावरांना रस्त्यावर खायला टाकतात. ही मोकळे जनावरे खातात. रस्त्याच्या कडेला किंवा चक्क रस्त्यावर ‘बस्तान’ मांडतात. त्यामुळे वाहनचालकांना वाट काढत आपले वाहन चालवावे लागते. अशा प्रकारामुळे अनेक अपघात होतात. तसेच रस्त्यावर बसलेल्या गायींना ही यामुळे ईजा होतात. सध्या नवीन होत असलेल्या विरशिरोमणी महाराणा प्रताप चौकापासून ते जुना मालेगाव नाक्यादरम्यान ३० ते ४० गोमाता व गोवंश नियमितपणे रस्त्यावर बसलेले असतात. यामुळे अनेक अपघात…

Read More

प्रताप महाविद्यालय, धनदाई कॉलेज परिसरात पोलिसांची धडक साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : शहरात कॉलेज परिसरात तसेच गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन महिला व मुलींची छेडखानी करण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी गांभीर्यपूर्वक विचार करत शहरातील प्रताप महाविद्यालय व धनदाई कॉलेज परिसरात कारवाई करण्याचे नियोजन केले. दोन्ही महाविद्यालय परिसरात दोन वेगवेगळे पथके तयार करून पथकांना कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले होते. त्यावरुन टवाळखोर रोड रोमिओंवर कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही पथकांनी दोन्ही महाविद्यालयीन परिसरात आठ रोडरोमिओंना हेरून त्यांच्याकडून महाविद्यालयीन ओळखपत्राची मागणी केली. परिसरात फिरण्याचा आणि थांबण्याचा उद्देश विचारला. परंतु त्यांच्याकडे ओळखपत्र नसल्याने व उडवाउडविची…

Read More

जामनेर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी प्रलंबित मागण्यांसाठी मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देत आपल्या व्यथा मांडल्या आहेत. ग्रामरोजगार सेवकांना फिक्स मानधन मिळत नाही. तसेच त्यांना कर्मचाऱ्यांना सुविधा मिळतात. त्या मिळत नाहीत. तसेच इतरही प्रलंबित मागण्या असून त्याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी निवेदनाचा निश्चित विचार करून त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष शांताराम जाधव, प्रभाकर पाटील, युवराज बाविस्कर, रमेश पाटील, प्रवीण तायडे, अनिल पाटील, सचिन सोळंके, राहुल भोळे, गोपाल पाटील, राजू पाटील, विश्वनाथ गाभे, सुधाकर राऊत, राहुल महाजन, गणेश किंनगे, सुनील कवरसिंग, बी.बी.सोनवणे, श्याम…

Read More

वार्डाचे चारही नगरसेवक, ठेकेदार मस्त अन्‌ नागरिक त्रस्त साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा परिसरातील सोनी नगर ते सावखेडा रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने वाहन चालकांना जणू काही ‘उंटावरची स्वारी’ करत असल्याचा जाणवत आहे. याबाबत वार्ड क्र. १० चे चारही नगरसेवक, रस्त्याचा संबंधित ठेकेदार मस्त चारचाकी वाहनात फिरत आहे. मात्र नागरिक त्रस्त आहे. दुसरीकडे नगरसेवक आणि ठेकेदार रस्त्याकडे रस्त्याचे उद्घाटन होऊन सात महिने झाले ढुंकूनही पाहत नाही. याच रस्त्यावर एका ट्रॅक्टर चालकाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आणखी किती बळी घेण्याची वाट संबंधित ठेकेदार बघत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करीत आहे. पिंप्राळा वटुकेश्वर मंदिर ते सावखेडा रस्ता मंजूर झाला आहे.…

Read More

पाळधीत महिला बचत गटांच्या मेळाव्यात मंत्री ना. गिरीष महाजन यांचे प्रतिपादन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : केंद्र आणि राज्य सरकार यांच्या विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देऊन महिला, शेतकरी, विद्यार्थी व समाजातील प्रत्येक घटकांसाठी केंद्र आणि महायुती सरकार सर्वांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. तालुक्यातील पाळधी येथील माळी समाज मंगल कार्यालयात आयोजित महिला बचत गटांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, पं.स.चे माजी सभापती तथा पाळधीच्या उपसरपंच नीता पाटील, सरपंच प्रशांत बाविस्कर, माजी सरपंच कमलाकर पाटील, भाजपा गटप्रमुख नाना पाटील, बचत गटाचे तालुका समन्वयक कैलास गोपाळ, तालुका व्यवस्थापक अनिल बडगुजर, बापू काळबैले, माजी सरपंच सोपान सोनवणे,…

Read More

उद्बोधन, प्रश्नोत्तरे अन्‌ खेळांच्या माध्यमातून विषयाची दिली माहिती साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील मालदाभाडी येथील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय युनीसेफ ३, एकात्मिक महिला व बालविकास, जळगाव व सानेगुरुजी फाऊंडेशन, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त अभियान सुरू आहे. यासंदर्भात शाळेतील विद्यार्थ्यांसह पालकांसाठी चर्चासत्र आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी प्र‌. मुख्याध्यापक एस.आर.शिकोकारे होते. यावेळी के.आर.महाजन, जी.टी.पाटील उपस्थित होते. कार्यक्रमातून बालविवाहामुळे शारीरिक व मानसिक ताणतणावाबाबत स्वयंसेवक भाग्यश्री जैन यांनी माहिती दिली. तसेच रजनी जैन यांनी छोट्या छोट्या खेळांच्या माध्यमातून ताण कसा येतो, हे पटवून दिले. यशस्वीतेसाठी ए. बी. पाटील, आर. एल. कोळी, एन.जी.पाटील, एम. एस‌. जैन, सनील जैन यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विजय सैतवाल तर…

Read More