Author: Sharad Bhalerao

शिवसेना-उबाठाच्या ‘तिरंगा रॅलीस’ उत्स्फूर्त प्रतिसाद साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. रॅलीला महाराणा प्रताप चौकापासून सुरूवात झाली. रॅलीच्या अग्रभागी वैशालीताई सूर्यवंशी हातात राष्ट्रध्वज घेऊन सहभागी झाल्या. ठिकठिकाणाहून लोक यात्रेत सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’च्या जोरदार जयघोषात छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरपालिका, देशमुखवाडी, जामनेर रोडमार्गे रॅली काढण्यात आली. भारतमाता पूजन करून राष्ट्रगीताने तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीत उद्धव मराठे, दीपक राजपूत, अरुण पाटील, रमेश बाफना, अनिल सावंत, दीपक पाटील, योजना पाटील, जे.के. पाटील, पुष्पा परदेशी, शंकर मारवाडी, तिलोत्तमा मौर्य, कुंदन पांड्या, सुरेखा वाघ, मनोहर चौधरी, जिजाबाई चव्हाण, माधव जगताप…

Read More

भावनिक बळ देण्यासाठी हिंदू समाजाचा जिल्हा बंद आवाहनाला प्रतिसाद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : बांगलादेशात हिंदू समाजासह, बौध्द, जैन समाजाच्या नागरिकांवर क्रुर अत्याचार होत आहेत. महिला, मुलींवर घृणास्पद कृत्य समाजकंटकांकडून केले जात आहेत. त्याचप्रमाणे मंदिरे व श्रध्दास्थाने जिहादींकडून लक्ष्य केली जात आहेत, तोडफोड केली जात आहे. अशा अन्याय अत्याचाराविरुध्द आवाज उठविण्यासाठी शहरात सकल हिंदू समाजाच्यावतीने निषेध मोर्चा तसेच अन्यायग्रस्त बांधवांना भावनिक बळ देण्यासाठी हिंदू समाजाचा जळगाव जिल्हा बंद आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली होती. तसेच असंख्य व्यवहार ठप्प झाले होते. भुसावळला सकल हिंदू समाजातर्फे भव्य निषेध मूक मोर्चा भुसावळ : बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर तेथील बहुसंख्य समाजाकडून प्रचंड…

Read More

स्वातंत्र्य दिनानिमित्त ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, अनेकांचा गौरव, विविध उपक्रमांचा समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : ‘दिल दिया है जान भी देंगे… ए वतन तेरे लिए’ असे देशभक्तीपर वातावरण निर्माण होऊन यंदाचा स्वातंत्र्य दिनाचा महोत्सव गुरुवारी, १५ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच अनेकांचा गौरव, विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण चाळीसगाव : येथील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी देशभक्तीवर गीत सादर करण्यात आली. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडून पोलिसांनी परेड सादर करून मानवंदना दिली. यावेळी तालुक्याचे…

Read More

दुकाने बंद ठेवून व्यावसायिकांनी बंदला दिले समर्थन, शेतकऱ्यांसह सर्वांचे व्यवहार ठप्प साईमत/जळगाव/प्रतिनिधी: बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर या देशात सामुदायिक हिंसाचार मोठ्या प्रमाणावर झाला. अशा सत्तांतर घडामोडीत बांगलादेशात राहणाऱ्या हिंदू लोकांना अराजकता माजविणाऱ्या विविध संघटनांनी नियोजपूर्वक लक्ष करून हिंदूंची पवित्र मंदिरे, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि घरांना आगी लावून प्रचंड प्रमाणात हिंदू समाजाचे नुकसान केले. बांगलादेशातील सत्तांतर ही त्या देशाची अंतर्गत आणि सत्तेची लढाई असतांना त्यात हिंदू समाजाला वेठीस धरून त्यांना देशातून जाण्यास भाग पाडले जात आहे. अनेक हिंदू कुटुंब आणि त्या परिवारातील महिला, पुरुष, लहान मुले तरुणींचा अमानुष छळ आणि अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे हिंदू लोकांना जगणे…

Read More

मयताच्या कुटुंबियांना धीर देत मदत मिळवून देणार : आ.मंगेश चव्हाण साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : वाकडी शेतात बकऱ्यांसाठी चारा घेण्यास गेलेल्या १२ वर्षीय महेश अनिल सूर्यवंशी या चिमुकल्याचा शेतात तुटलेल्या वीज तारेचा धक्का लागून जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, १६ ऑगस्ट रोजी सकाळी वाकडी शिवारात घडली. या घटनेत मुलाचे वडील थोडक्यात बचावले. बापाच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याचा हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे गावात पसरताच घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. योगायोगाने त्याचवेळी एका अंत्यविधीसाठी आ.मंगेश चव्हाण वाकडी गावात आले होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी उपस्थित वीज महावितरण कंपनी आणि पोलीस…

Read More

जामनेर तालुक्यात दर आठवड्याला होणार शिबिर साईमत/जामनेर/प्रतिनिधी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुका आरोग्य विभागाच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. शिबिरात दोन मुलींवर एक तर तीन शस्त्रक्रिया दोन अपत्य असलेल्या पुरुषांवर करण्यात आल्या. पत्नीस आरोग्याच्या दृष्टीने त्रास नको म्हणून पुरुषांनी स्वतःवर शस्त्रक्रिया करून घेतली. यापुढे दर आठवड्याला पुरुष नसबंदी शिबिर घेणार असल्याचे डॉ.धापते यांनी सांगितले. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतल्यामुळे आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.रमेश धापते यांच्याकडून शस्त्रक्रिया केलेल्यांचा शाल, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात…

Read More

गावातील समस्यांची अधिकाऱ्यांनी पायी फिरून केली प्रत्यक्ष पाहणी साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी : येथील ग्रामपंचायतीच्या समस्यांबाबत ग्रामस्थांनी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे नुकताच समस्यांचा पाढा वाचत तक्रार केली होती. त्यावर ना .महाजन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठविण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला होता. त्यानुसार बुधवारी, १४ ऑगस्ट रोजी जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अनिकेत पाटील, पाचोऱ्याच्या गटविकास अधिकारी स्नेहल शेलार, विस्तार अधिकारी राजेंद्र धस यांनी लोहारा ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यानंतर सरपंच अक्षय जैस्वाल, ग्रामविकास अधिकारी गजानन काळे यांची झाडाझडती घेतली. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार समस्यांच्या पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष पायी फिरून समस्या जाणून घेतल्या. गावातील कन्याशाळेच्या मागील अंगणवाडी क्रमांक ०२१३ याठिकाणी भेट देत अंगणवाडी समोरच भले मोठे…

Read More

रेल्वे मार्ग विस्तारीकरण काम बंद पाडू; स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आ. किशोर पाटील यांचा एल्गार साईमत/पाचोरा/प्रतिनिधी: तालुक्यातून जाणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गामुळे तारखेडा-गाळण नगरदेवळा परिसरातील तारखेडा बु., तारखेडा खु., चिंचखेडा गाळण (हनुमानवाडी), गाळण बु., गाळण खु., गाळण (विष्णुनगर), चुंचाळे, नगरदेवळा अशा सुमारे दहा गावांचा तालुक्याच्या गावाला जोडणारा रस्ताच बंद झाला आहे. त्यामुळे सुमारे वीस हजार नागरिकांच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, आगामी चार दिवसात रस्त्याचा विषय मार्गी न लागल्यास आपण रेल्वे मार्ग विस्तारीकरणाचे काम बंद पाडू, अशा इशारा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एल्गार पुकारुन आ.किशोर पाटील यांनी दिला आहे. त्यांनी रेल्वे प्रशासनाला चार दिवसात काम सुरू करण्याबाबत ‘अल्टीमेटम’ दिला…

Read More

सोयगावला रा.काँ.तर्फे (एसपी गट) तहसिलदारांना निवेदन साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : एक हेक्टर सोयाबीन पिकांसाठी पाच हजार तर कापूस पिकांसाठी एका हेक्टरला पाच हजार असे स्वतंत्र अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु २०२३ खरीप हंगामात ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल, अशी अट घालण्यात आल्यामुळे हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ई-पीक पाहणी केलेल्या व न केलेल्या वंचित शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी अर्थात गुरुवारी, १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोयगावच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याचे निवेदन ज्येष्ठ नेते रंगनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगावच्या तहसिलदारांना देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोयगाव…

Read More

जिल्हा निवड समितीकडून निवड केल्याचे पत्र प्राप्त साईमत/यावल/प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातून यावल, भुसावळ, पारोळा येथील टॉप मोस्ट उत्कृष्ट तहसीलदार म्हणून जिल्हा निवड समितीने निवड केल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यात यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचे जळगाव जिल्ह्यासह नाशिक विभाग महसूल विभागातर्फे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुळ कायदा तहसीलदार तथा निवड समिती सदस्य विजय सूर्यवंशी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव गजेंद्र पाटोळे यांच्या निवड समितीचे पत्र बघितल्यावर त्यात टॉप मोस्ट उत्कृष्ट तहसीलदार म्हणून भुसावळ येथील नीता लबडे, यावल येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पारोळा येथील तहसीलदार उल्हास देवरे यांच्यासह इतर काही तहसिलदारांची उत्कृष्ट तहसीलदार निवड केल्याचे पत्र १५…

Read More