Author: Sharad Bhalerao

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची माहिती साईमत/यावल/प्रतिनिधी : शहराची पुढील ३० वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाकडून २३ ऑगस्ट २०२४ मंजुरी मिळाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली. यावल शहराला पाणीपुरवठा सुरळीत व नियमित मिळण्यासाठी आराखडा तयार करून दरडोई १३५ लिटर पाणी पुरवठा व्हावा, म्हणून यावल नगरपालिकेने जुन २०२१ मध्ये पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजुर करून योजनेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी नाशिक येथील सल्लागार समिती नेमुन कंपनीस काम दिले होते. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. दरम्यान, शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प जलाशयातून पाणीपुरवठा योजनेकरीता पाणी आरक्षण मंजूर होणे…

Read More

वर्गांमध्ये साचले पाणीच पाणी, महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी दिली शाळेला भेट साईमत/फैजपूर/प्रतिनिधी : शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी सूचना अर्ज देऊनही उपयोग झालेला नाही. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींनी थेट महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांची भेट घेऊन म्युनिसिपल हायस्कुच्या दयनीय अवस्थेचा पाढाच वाचून समस्या सोडविण्याची गळ घातली आहे. वर्गांमध्ये साचले पाणीच पाणी, महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी शाळेला भेट दिली आहे. येथील स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या नगरपालिकेच्या मुन्सिपल हायस्कुलची ‘बाप भीक मागू देईना आणि आई जेवण देईना’ अशी अत्यंत दयनीय परिस्थिती झाली आहे. शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींना अनेक विषयांचे शिक्षकच उपलब्ध नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास जबाबदार कोण…? विज्ञान विषयाच्या प्रयोग शाळेत प्रॅक्टिकलसाठी मोठ्या प्रमाणात साहित्य…

Read More

साठवण तलाव ‘ओव्हर फ्लो’, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सह आयुक्तांचे दुर्लक्ष साईमत/यावल/प्रतिनिधी : शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी नगरपरिषदेने साठवण तलावाचे बांधकाम केले आहे. तो साठवण तलाव गुरुवारी, २९ रोजी ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेल्याने तसेच साठवण तलाव फुटण्याची भीती निर्माण झाल्याने यावल शहरात जोरदार चर्चा सुरू झाली. याबाबत यावल नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल ‘नो रिप्लाय’ झाल्याने माहिती मिळाली नाही. यावल नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी म्हणून चोपडा येथील मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्याकडे यावल नगरपरिषदेचा प्रभारी पदभार दिला आहे.यावल नगर परिषदेच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी अनेकांच्या आहेत. आणि कार्यालयात दाखल माहिती अधिकार अर्ज प्रथम…

Read More

चोपडा तालुका रा.काँ. (एसपी गट) तर्फे अनोखे ‘रास्ता रोको’ आंदोलन साईमत/चोपडा/प्रतिनिधी : तालुक्यातून जाणारा बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर अशा आंतरराज्य महामार्गाची परिस्थिती बरीच खराब झाली आहे. त्यावरील पडलेल्या खड्डयांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. त्यावरून प्रचंड वाहतूक असल्याने प्रवाशांसह वाहनधारकांची हाड खिळखिळी होत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती पावरा सध्या तालुक्यात जनसंपर्क दौरा करत आहे. त्यामुळे त्यांच्या ही समस्या लक्षात आल्याने त्यांनी ‘खिचडी’ आंदोलन करून ‘रास्ता रोको’ ही संकल्पना पक्षातील वरिष्ठांकडे मांडली. त्याला तात्काळ वरिष्ठांनी मान्यता दिल्याने संकल्पनेतून तालुक्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रा.काँ. (एसपी)च्या गटाने वर्डी ते माचला फाटा अंतर्गत एक छोट्याशा पुलावर पडलेल्या रस्त्यावरील मोठ्या जीवघेण्या…

Read More

गंधमुक्तीच्या कार्यक्रमानिमित्त केली वृक्ष लागवड साईमत/जामनेर /प्रतिनिधी : येथील रहिवासी दीपक विजय माळी यांचे लहान बंधू दिलीप माळी (वय ३२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म म्हणजेच सत्यशोधक पद्धतीने विधीकर्ते साडूबा पांडव (छत्रपती संभाजी नगर) यांच्या हस्ते त्यांचा दशक्रियासह गंधमुक्तीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यांच्या गंधमुक्तीच्या कार्यक्रमानिमित्त वृक्ष लागवड करण्यात आली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही अकराशे रुपयाची देणगी दिली. कार्यक्रमास ह.भ.प. देवराम माळी, सत्यशोधक समाजाचे प्रचारक रमेश वराडे, महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पवन माळी, समाज सेवक मुकुंदा माळी, कैलास माळी, युवराज माळी, अनिल माळी, नंदू माळी, किरण माळी, आकाश माळी, शेनफडू वराडे, शिवाजी…

Read More

कवी संमेलनात ३० कवींनी केले काव्य वाचन साईमत/जामनेर /प्रतिनिधी : नाशिक कवी संस्थेचे कवी संमेलन नुकतेच नाट्य परिषद सभागृह कालिदास कला मंदिरात पार पडले. कवी संमेलनात खान्देशरत्न कवी डी.डी.पाटील यांनी श्रावण महिना सुरू असल्याने ‘श्रावण व पाऊस’ विषयावर कविता सादर करून उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. कवी डी .डी .पाटील यांच्यासह उपस्थित कवींनीही श्रावणावरच कविता सादर केल्या. अध्यक्षस्थानी खान्देश कवी अजय बिरारी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाडीवर्हे येथील लेखक पुंजाजी मालुंजकर होते. कवी संमेलनात ३० कवींनी काव्य वाचन केले. संमेलनात ‘कविण्यक चर्चा पाऊसच पडला’, ‘श्रावण प्रेम’, ‘श्रावणातला प्रेमाचा मोसम’, ‘पावसामुळे प्रेमाचा आलेला अडथळा’, ‘श्रावणातील सण’, ‘श्रावण सरी’ आदी विषयावर कवींनी सहभाग…

Read More

प्रेतयात्रा नेण्यासाठी रस्ताही नाही, रात्री लाईटही नाही, अंधाऱ्यात प्रेतावर करावे लागताहेत अंत्यसंस्कार साईमत/धानोरा, ता. चोपडा/प्रतिनिधी : अंकलेश्वर -बऱ्हाणपूर या राज्य महामार्गावर आणि सातपुडा पर्वताजवळील अतिजवळचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धानोरा गावाच्या स्मशानभूमीत मरणानंतरही ‘यातना’च भोगाव्या लागत असल्याचे येथील असुविधांमुळे दिसून येत आहे. २५ हजार लोकवस्तीच्या गावात हिंदू बांधवासाठी मरणानंतर अंतिम संस्कार करण्यासाठी बिडगाव रस्त्यावर एकच स्मशानभूमी आहे. स्मशानभुमीत प्रेतावर अंतिम संस्कार करण्यासाठी व्यवस्थित जागाही नाही. फार जुन्या असलेल्या स्मशानभूमीचे छत केव्हा कोसळेल, हे सांगता येत नाही. त्याच बाजुला नवीन बांधकाम केलेले व्यवस्थित नाही, स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पायवाटेने जावे लागते. पावसाळ्यात अत्यंयात्रेचा प्रवासही यातनामय होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून…

Read More

पाळधीत संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी : संत सेना महाराजांनी आपल्या जीवनात भक्तीला सर्वोच्च स्थान दिले आहे. त्यांच्या अभंगातून त्यांनी भक्तिरसाची उपासना केली. सेना महाराजांचे विचार आणि शिकवण आजही आपल्याला दिशादर्शक आहे. त्यांच्या विचार व शिकवणीतून आपल्याला जीवनात शांती, समाधान आणि आनंद मिळण्याचा मार्ग सापडतो, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधीत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी अ.भा.जीवा सेनाचे प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगार होते. सुरुवातीला संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी निमित्त श्री सत्यनारायण पूजन व संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाळधी बु.चे लोकनियुक्त सरपंच विजय पाटील, पाळधी…

Read More

व्यापारी भवन लोकार्पण कार्यक्रमात आमदारांनी केला भविष्यातील विकासाचा संकल्प ! साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : वैशालीताईची बुध्दी अद्यापही लहान असून ती राजकारणात ‘अपरिपक्व’ आहे. ‘तात्या’ त्यांचे वडील असले तरी ‘तात्या’ माझा राजकारणातील बाप आहे. बॅनरवरुन फोटो निघाले तरी ‘तात्या’ माझ्या हृदयात कायम आहेत. त्यांच्या नावाचा फोटोचा वापर करणार नाही. मात्र, त्यांच्या नावाने असलेल्या व्यापारी भवनात सर्व ठिकाणी त्यांचे फोटो स्वखर्चातून लावणार आहे. सोबतच व्यापारी बांधवानी केलेल्या मागणीनुसार टेरेसवर योगा, व्यायाम करण्याची आणि पत्रकारांसाठी बसण्याची व्यवस्था करणार असल्याची ग्वाही आ.किशोर पाटील यांनी दिली. पाचोरा नगरपरिषद अंतर्गत शहरातील भडगाव रोड, बाजार समितीच्या समोर पाच कोटी रुपये खर्चून बांधलेल्या कृषिरत्न माजी आमदार कै.तात्यासाहेब आर.ओ.पाटील व्यापारी भवनाचा…

Read More

गिरणा धरणातही ९२ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : गेल्या महिन्याभरात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम सिंचन प्रकल्पात लक्षणिय पाणीसाठा झाला आहे. विशेषत: मध्यम प्रकल्पांपैकी बोरी, सुकी, मंगरुळ आणि अभोरा या धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच जिल्ह्याच्या निम्मे भागाची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात ९२ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्याने काही प्रमाणात गिरणा नदीही प्रवाहीत झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंतच्या एकूण सरासरीपैकी ९५ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे, पाझर तलाव पाण्याने भरले आहेत. हतनूर धरणात पाण्याची आवक कायम असून बुधवारपर्यंत धरणाचे आठ…

Read More