आमदार मंजुळाताई गावित यांची ग्वाही साईमत/साक्री, जि.धुळे/प्रतिनिधी स्टॅम्पवेंडर व्यवसायिकांच्या प्रश्नांसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा करून योग्य तो सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही साक्रीच्या आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी स्टॅम्पवेंडर संघटनेला दिली आहे. महाराष्ट्र राज्य मुद्रांक विक्रेता, अर्ज व दस्त लेखक संघटना नाशिक विभाग यांच्यावतीने साक्री तालुका स्टॅम्प वेंडर संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार गावित यांच्याशी त्यांच्या धुळे येथील निवासस्थानी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली यावेळी आमदार यांनी याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून योग्य तो सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. राज्य शासनाने गेल्या जून महिन्यात मयत स्टॅम्प वेंडरांच्या वारसांना परवाने देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु…
Author: Sharad Bhalerao
मंडळात दरवर्षी घेतले जाताहेत विविध कार्यक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळ्यातील सहयोग कॉलनी मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात आले. गेल्या आठ वर्षांपासून हे मंडळ सुरु आहे. मंडळात दरवर्षी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. त्यात कार्यकर्त्यांसह महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग असतो. यशस्वीतेसाठी उदय कोळी, शाम (SV) विसपुते, भूषण विसपुते, भूषण उदावंत, हर्षल मिस्तरी, वैभव कोळी, अंकुश मांडोळे, विजय विसपुते, राजु मिस्तरी, रितेश पिंगळे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
तोटा सहन करणे मान्य पण ‘इथिक्स’ सोडत नाही साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी मी प्रखर संघर्षातून उभा राहिलेला एक उद्योजक आहे. कठोर परिश्रम आणि जोखीम घेण्याची वचनबध्दता या बाबी मला यशाच्या मार्गावर नेतात. त्यामुळे दूरदृष्टी, बाजाराची सखोल माहिती, नवीन संधी ओळखण्याची हातोटी आणि उद्योगासाठी भांडवल उभे करण्याची प्रतिभा प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी सहाय्यक ठरतात. उद्योग क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यासह आम्ही सचोटी आणि प्रामाणिकपणा कायम ठेवला आहे. त्यामुळे प्रसंगी आम्ही तोटा सहन करु पण इथिक्स कधीही सोडत नाही. आज माझ्या उद्योग समूहाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अडीच हजार आणि अप्रत्यक्ष एकूण पाच हजार जणांना रोजगार देण्याची क्षमता आम्ही स्पेक्ट्रम उद्योग समूहाच्या माध्यमातून निर्माण केली आहे. तीव्र…
अन्यथा जल-सत्याग्रह, जलसमाधी आंदोलन : समिती कार्यकर्ता उर्वेश साळुंखे तब्बल २६ वर्षांपासून दुर्लक्षित, धरण पूर्ण होण्याची प्रतीक्षा साईमत/चोपडा/प्रतिनिधी : चोपडा आणि अमळनेर तालुका सुजलाम्-सुफलाम् होण्यासाठी चातकासारखी पाण्यासाठी वाट पहात आहे. ते पाडळसरे बॅरेज (धरण) कुठल्याही निवडणुका आल्या की, सत्ताधारी व विरोधकांच्या ऐरणीवर असते. निव्वळ राजकीय महत्वाकांक्षापोटी जाणून बुजून तब्बल २६ वर्षांपासून दुर्लक्षित-आर्थिक फुगवटा झालेले धरणाला पूर्ण होण्याची प्रतीक्षा लागलेली आहे. हा रेंगाळलेला प्रकल्प पूर्ण करण्याची एकट्या राज्याची आजतरी आर्थिक परिस्थिती नाही, म्हणून पूर्वीं धरणासाठी आपल्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणारे तालुक्यातील बुधगाव येथील धरण समिती कार्यकर्ता उर्वेश साळुंखे यांनी येत्या 60 दिवसात पाडळसरे धरण केंद्रामध्ये सामील न झाल्यास ते धरणावरच जल-…
आर.डी.पाटील, विजया पाटील निवडपत्र देऊन सन्मानित साईमत।चोपडा।प्रतिनिधी। येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे शिक्षक दिननिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक पंकज बोरोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक एम.व्ही.पाटील, व्ही.आर.पाटील यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमात संस्थेअंतर्गत कार्य गौरव सन्मान देण्याची परंपरा या वर्षापासून सुरू केली आहे. संस्थेतर्फे २०२४ साठी आर.डी.पाटील यांची प्राथमिक विभाग आणि श्रीमती विजया पाटील यांची माध्यमिक विभागातून निवड जाहीर करण्यात आली. त्याबद्दल निवडपत्र देऊन दोघांचे अभिनंदन करून सन्मानित करण्यात आले. दोन्ही शिक्षकांचे अनेकांकडून कौतुक आगामी काळात संस्थेतर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून कार्य गौरव सन्मान दिला जाईल, असे पंकज बोरोले यांनी…
लेवा पाटीदार महासंघाची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा साईमत/जळगाव/प्रतिनिधी: लेवा पाटीदार समाजाची भाषा म्हणून ‘लेवा बोलीभाषेला’ शासनाने राजमान्य भाषेचा दर्जा देऊन लेवा पाटीदार समाजाला अल्पसंख्याक दर्जा प्रदान करण्यात यावा, लेवा पाटीदार आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्यात यावे, वाघूर धरणाला वै. ह. भ. प. तोताराम महाराज गाडेगावकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुबई येथील सागर बंगला येथे बोलाविलेल्या बैठकीत निवेदनाद्वारे करण्यात आली. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, मंत्री अतुल सावे, आ. हंसराज अहिर, आ. राजुमामा भोळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, भाजपा जळगाव जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, सचिव…
विरोधकांकडून केला गेला विपर्यास साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील लिहा तांडा गावात मंत्री ना.गिरीष महाजन भंडाऱ्याच्या कार्यक्रमानिमित्त गेले होते. खराब रस्त्यासंदर्भात ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडिओबाबत पत्रकारांनी त्यांना प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी सांगितले की, जामनेर तालुक्यात ३० ते ३२ तांडे आहेत. त्या ठिकाणी रामदेव बाबा यांच्या सप्ताहाचे कार्यक्रम होत असतात. मी दरवर्षी त्याठिकाणी जात असतो. लिहा तांडा याठिकाणी मी गेलो होतो. तेथील सरपंच यांच्या बहिणीचा मृत्यू झाला होता. त्याठिकाणी मोठी गाडी जात नव्हती. त्यामुळे मी कार्यकर्त्याला घेऊन मोटर सायकलने त्यांच्याकडे जात असतांना कार्यकर्त्याने मला सांगितले की, भाऊ याठिकाणी पाण्याची डाब तुंबलेली आहे. त्यावेळी मीच कार्यकर्त्याला सांगितले की,…
बोदवडातील कार्यक्रमात डाॅ. बी.के.प्रमोद आपटे यांचे प्रतिपादन साईमत/बोदवड/प्रतिनिधी : ध्यानाच्या माध्यमातून विविध आजारापासून मुक्ती मिळते. स्वत आठ-आठ तास ध्यान करुन व्याधीपासून कशी सुटका झाली. त्याचा अनुभव डाॅ. बी.के.प्रमोद आपटे यांनी सांगितला. कर्माचे फळ हे भोगावेच लागते. परंतु नियमित ध्यान केले. शिवबाबांची मुरली जर ऐकली तर दु:खापासून व्याधीपासून मुक्ती मिळते. मी कोण आहे काय करीत आहेत. माझे कर्तव्य काय त्याचे स्मरण वेळोवेळी करावे, आज प्रजापती ब्रम्हकुमारीज माऊंट अबु केंद्राद्वारे नियमित शिबिरे चालतात. ते शिबिरे जीवनात सकारात्मक बदल येण्यासाठी करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. बोदवड येथील बाळासाहेब ठाकरे नगर येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्रावर मर्जिवा भोग कार्यक्रम झाला. कार्यक्रमात डाॅ.प्रमोद आपटे ठाणा…
प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर करणे गरजेचे साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : जगातील सर्वात सुंदर व आदर्श राज्यघटना म्हणजे भारतीय संविधान आहे. संविधानानेच देशाची प्रगती झाली आहे. आज संविधानाच्या मुळावर घाव घालण्याचे प्रकार सुरू आहेत. असे घडल्यास लोकशाही धोक्यात येऊन राष्ट्राच्या प्रगतीत अडथळे निर्माण होऊन राष्ट्राचे अस्तित्वच धोक्यात येईल. त्यामुळे संविधान व पर्यायाने राष्ट्र वाचण्याची जबाबदारी भावी पिढीवर असल्याचे प्रतिपादन ॲड.मनोहर खैरनार यांनी केले. ते मुक्ताईनगर येथील शासकीय तंत्र विद्यालय आयोजित संविधान मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डी.पी.कोळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून चांगदेव हायस्कुलचे मुख्याध्यापक विजय चौधरी, संत मुक्ताई पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद बोदडे उपस्थित होते. हा कार्यक्रम प्राचार्य एम.एस.राजपूत…
श्री स्वामी समर्थ गुरुपीठ भाविकांची मागणी साईमत/यावल/प्रतिनिधी : ज्ञानेश महाराव यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर शाखा यावल येथील ४० स्री – पुरुषांसह तरुण भाविकांनी यावल तहसीलदार व यावल पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली. यावल निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, २२ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेनात ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला. भाषणातून आमच्या हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम तसेच श्री स्वामी समर्थ…