Author: Sharad Bhalerao

मंडळातर्फे राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र होतेय कौतुक साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने शहरातील पार्वती सुतभक्त गणेश मंडळातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्याचा अनोखा उपक्रम राबवून १२ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. सोबतच मंडळाचे १२५ वर्ष पूर्ण झाल्याने वर्षभरात १२५ सायकलींचे वाटप करण्याचा मानस मंडळातर्फे केला. मंडळातर्फे राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजाचे एकत्रीकरण तथा स्वातंत्र्याच्या लढ्यात उपयोग होण्याच्या उद्देशातून लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा करण्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या संकल्पनेला प्रेरित होऊन मलकापूर शहरातील विद्वान धार्मिक लोकांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणारा दुर्गा नगर परिसरातील त्या काळातील नागरिकांनी पुढाकार घेत पार्वती सुतभक्त गणेश मंडळाची…

Read More

चांदसरला अवैध वाळू उपसाचा वाद उफाळला साईमत।पाळधी, ता.धरणगाव ।प्रतिनिधी। चांदसर गावाजवळील गिरणा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करत असतानाचे फोटो काढल्यावरून हवेत गोळीबार करून दहशत माजवून आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनास्थळी चोपडा भागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी घोलप, पो. नि.पवन देसले यांनी भेट देऊन तपासाबाबत माहिती दिली. आरोपीच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना केली असल्याचे सांगण्यात आले. येथून जवळील चांदसर गावातील नदीपात्रातून वाळू उपसा होत होता. तो रोखण्यासाठी तेथे चाऱ्या खोदून रस्ता बंद केला होता. त्यामुळे अवैध वाळू उपसा होत नव्हता. अवैध वाळू उपसा करण्यासाठी चांदसर, वाकटुकी येथील काही जण चाऱ्या बुजत होते. हे तेथील कोतवाल अमोल गुलाब मालचे यांना समजले.…

Read More

नाभिक समाज बांधवांना व्यवसाय साहित्याच्या किटचे वितरण साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : येथे संत शिरोमणी सेना महाराज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन मुक्ताईनगर महाराष्ट्र शासनातर्फे विविध समाजहिताच्या अनेक योजना हाती घेतल्या आहे. शासन समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आ.चंद्रकांत पाटील यांनी केले. मुक्ताईनगर येथे संत शिरोमणी सेना महाराज सामाजिक सभागृहासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आ.चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे पुन्हा २० लाखांचा निधी देण्यात येणार आहे. अशा सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाभिक हितवर्धक संस्थेचे रामा टोंगे होते. याप्रसंगी आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उपस्थित बांधवांना नाभिक व्यवसाय साहित्याचे किटचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र नेरपगार, जगदीश सोनवणे, तालुकाध्यक्ष गणेश टोंगे,…

Read More

गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात साहित्यिक प्रा.व.पु.होले यांचे मार्गदर्शन साईमत/फैजपूर, ता.यावल/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी प्रामाणिक अभ्यास व मेहनतीने प्रामाणिक प्रयत्न करून मिळविलेले यश भविष्यात आपले जीवन उज्ज्वल करते. मात्र, अवैध मार्गाने मिळविलेले कोणतेही यश भविष्यात अडचणीचे ठरते, असे मोलाचे मार्गदर्शन साहित्यिक प्रा.व.पु.होले यांनी केले. लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे होते. प्रमुख पाहुणे माजी आमदार अरुणदादा पाटील यांनीही विद्यार्थ्यांनी मोठे अधिकारी व डाॅक्टर होऊन समाजाची सेवा करावी. देशसेवा करून आपला नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले. अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी गुणवंत विद्यार्थी देशाची संपत्ती आहे.…

Read More

डीवायएसपी राजकुमार शिंदे यांनी दोन्ही समाजाचे केले कौतुक साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सामाजिक ऐक्य जपून स्वत: सावदा येथील हिंदू-मुस्लिम बांधवांनी ज्या पद्धतीने ऐक्य दाखवले हे बघून चिंतामुक्त झालो. यापुढेही अशीच सर्वांनी मिळून सामाजिक बांधिलकी जोपासून कायम स्वरुपी टिकून ठेवावी, अशी अपेक्षा मनोगतात व्यक्त करुन जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे दोन्ही समाज बांधवांचे कौतुक केले. यंदा योगायोगाने सप्टेंबर महिन्यात ईद-ए-मिलाद आणि गणेश उत्सव आल्याने छत्रपती संभाजी मित्र मंडळ, राणा गणेश मंडळ, प्रभात गणेश मंडळ यांनी नियोजित ठिकाणऐवजी दोघा समाजात जातीय सलोखा कायम रहावा, याकरिता मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बैठकीत असे ठरवले की, १६ तारखेला ईद-ए-मिलादची…

Read More

यावल पोलिसांनी प्रथमच सुरू केली जातीय सलोख्याची उत्तम कौतुकास्पद प्रथा साईमत/यावल/प्रतिनिधी : यावल पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने यावल पोलीस आणि होमगार्डच्या पथकाने श्री गणेशाची स्थापना केली होती. यावल शहरात पाचव्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत यावल पोलिसांनी यशस्वीपणे बंदोबस्त ठेवला होता. शासकीय कामकाज कर्तव्य आटोपल्यानंतर यावल पोलीस व होमगार्डच्या पथकाने स्थापन केलेल्या गणपती बाप्पाची बुधवारी, १८ रोजी सकाळी ११ वाजता गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सर्व जाती-धर्मातील नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साह, शांततेत यावल पोलीस कार्यालयाच्या आवारातून पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांसह होमगार्ड पथकाने काढली. त्यात यावल शहरातील सर्व स्तरातील, सर्व जाती-धर्मातील नागरिक…

Read More

विरोधकांच्या टीकेला विकासकामातून दिले उत्तर साईमत।पाचोरा।प्रतिनिधी। शहरातील पाणीपुरवठा, भुयारी गटार आणि रस्त्यांच्या विकास कामासंदर्भात काही दिवसांपासून विरोधकांकडून टिका सुरू आहे. अशा टिकेला मी विकासाने उत्तर देत आहे. आगामी किमान २५ वर्षापर्यंत शहरातील मुलभुत सुविधांवर विरोधकांना बोलायची संधीच मिळणार नाही. मुलभुत गरजांवर २२२ कोटी रूपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला आहे. लवकरच या कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती आ.किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, एम.एस.पी.बिल्डकाॅनचे संचालक मनोज पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, पदमसिंग पाटील, गंगाराम पाटील, प्रवक्ते प्रदीप देसले, शरद पाटे, बंडु चौधरी, मुख्याधिकारी मंगेश देवरे, लखीचंद पाटील, स्विय सहाय्यक राजेश पाटील…

Read More

वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या ६५ महिलांचा सन्मान साईमत।चोपडा।प्रतिनिधी। अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त मौर्यक्रांती संघ आणि चोपडा तालुका सकल धनगर जमात यांच्या माध्यमातून “अहिल्यादेवी कन्या सन्मान सोहळा” मूकबधीर विद्यालय बोरोले नगर दोन चोपडा येथे नुकताच घेण्यात आला. त्यात तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या ६५ महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात नगरसेविका सरला शिरसाठ, पो.पाटील पुष्पा सुलताने, पो.पाटील पुष्पा कचरे, पो.पाटील वैशाली सोनवणे, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, आरोग्य सेविका, वन विभागतील कर्मचारी, वाहक परिवहन मंडळ, अंगणवाडी- शिक्षिका, मदतनीस अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश होता. अध्यक्षस्थानी माजी महापौर सदाशिवराव ढेकळे होते. यावेळी मौर्यक्रांती संघाचे राज्य उपाध्यक्ष बन्सिलाल भागवत, धनगर समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष विठूसाहेब बोरसे, जिल्हाध्यक्ष…

Read More

मेळाव्यात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख करणार मार्गदर्शन साईमत।पाचोरा।प्रतिनिधी। पाचोरा- भडगाव बाजार समितीच्यावतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधत गुरुवारी, १९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पाचोरा बाजार समितीच्या आवारात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख हे खरीप पिक काढणीची वेळ आलेली असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन, मका, कापूस पीक घरात येण्यासाठी हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याला आ.किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, बाजार समितीच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पत्रकांचे वाचन करून मंजुरी देणे तसेच अध्यक्षांच्या…

Read More

आढावा बैठकीत रा.काँ.चा उमेदवार विजयी करण्याचा सर्वांनी केला निर्धार साईमत।चोपडा।प्रतिनिधी। चोपडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चोपडा विधानसभा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा पक्ष निरीक्षक भास्करराव काळे होते. बैठकीत माजी आमदार जगदीश वळवी, डी.बी.पाटील, ज्योती पावरा, डॉ. चंद्रकांत बारेला, रुस्तम तडवी अशा इच्छुक पाच उमेदवारांनी विधानसभेबाबत मनोगत व्यक्त करतांना सर्व राष्ट्रवादी पक्षाचे स्थानिक ज्येष्ठ, श्रेष्ठ नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकत्रित, प्रामाणिकपणे मेहनत घेऊन प्रयत्न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निश्चित विजयी होईल, असा निर्धार व्यक्त केला. यांची होती उपस्थिती बैठकीला चोपडा विधानसभा मतदार संघातील प्रमुख ज्येष्ठ नेते माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,…

Read More