प्राचार्य डॉ.संतोष कडले यांनी व्यक्त केले समाधान साईमत।जामनेर।प्रतिनिधी। तालुक्यातील वाकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गतवैभव मिळून देण्यासाठी सर्व ग्रामस्थ वाकडी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे आणि आरोग्य केंद्राचा स्टाफ यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्राचा गुणवत्ता दर्जा, सेवा -सुविधा यामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने वाकडी आरोग्य केंद्रात छत्रपती संभाजीनगरचे आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ.संतोष कडले, अभिषेक वैद्य बुलढाणा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे प्रतिनिधी वैशाली गर्ग, श्रीशष्मा, कृष्णा वेणी यांनी नुकतीच भेट देऊन राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन नामांकनबाबत तपासणी केली. याद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण, गरोदर माता, वार्धक्य जन्य आजार,…
Author: Sharad Bhalerao
मिरवणुकीत पारसनाथ ढोल पथक ठरले मुख्य आकर्षण साईमत।जामनेर।प्रतिनिधी। येथील पारसनाथ देवस्थान हे दीडशे वर्षांपेक्षा जास्त पुरातन आहे. जैन मंदिराची जैन धमियांतर्फे पवित्र पर्युषण पर्वाची सांगता नुकतीच मिरवणूक काढून करण्यात आली. सजविलेल्या अश्व रथावर इंद्र भरत सैतवाल इंद्रायणी, सुरेखा सैतवाल यांच्यासह पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून पंचरंगी जैन ध्वज घेऊन भाविक जलयात्रेत सहभागी झाले होते. दररोज सकाळी अभिषेक, पूजापाठ, प्रवचन स्वाध्यायाच्या माध्यमातून धर्म ज्ञान वृद्धी केली. दहा दिवसात युवक युवतींसाठी विविध धार्मिक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील यशस्वी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थी व राज्य राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यासोबत जैन साहित्य परिषदेतर्फे प्राचीन ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले…
जिल्ह्यातील सर्व ११ जागांची चाचपणी; इच्छुकांचे तब्बल ३५ अर्ज येत्या विधानसभेसाठी काँग्रेसने पक्ष संघटन मजबूत करण्यासह जिल्ह्यात गमाविलेला प्रभाव पुर्नस्थापित करण्यासाठी प्रयत्नांना गती दिली आहे. आमचे संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते त्यादृष्टीने कामाला लागलेले आहेत. राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष निर्णायक भूमिकेत असून आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविण्याची मानसिकता पक्षात आता तरी आहे. आघाडी अंतर्गंत जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदार अथवा जागा सुटतील, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही, तरी पण जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ जागांसाठी इच्छुकांचे तब्बल ३५ अर्ज पक्षाच्या प्रदेश समितीकउे दाखल केले गेले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत आमचा पक्ष नवा इतिहास घडविण्याच्या तयारीत असल्याचा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी व्यक्त केला…
कार्यकारी अभियंता एस.आर.भोसले यांनी दिल्या सूचना साईमत।यावल।प्रतिनिधी। जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पामध्ये ऑक्टोबर २०२४ पासून पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होणार असल्याने शेळगाव प्रकल्प कार्यक्षेत्रातील संपादित केलेल्या जमिनीवरील पिकाचे अथवा बांधकामाचे नुकसान झाल्यास त्यास जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र.२ हे जबाबदार राहणार नाही, अशी महत्त्वाची सूचना कार्यकारी अभियंता एस.आर.भोसले यांनी दिली आहे. त्यांनी दिलेली माहिती अशी की, तापी नदीवरील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प, ता.जि.जळगाव प्रकल्पात ऑक्टोबर २०२४ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याचे नियोजन आहे. शेळगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी यावल (बोरावल बु. टाकरखेडा, वाघळुद, भोरटेक, अंजाळे, पिळोदा, पाडळसे, कठोरे प्र. सावदा) भुसावळ (जोगलखेडा, भानखेडे, साकेगाव, सतारे) व जळगाव (शेळगाव, तिघ्रे, कडगाव) तालुक्यातील…
पारोळा पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल साईमत।जळगाव।प्रतिनिधी। जळगाव लाचलुचपतच्या विभागाने कामाची वर्कऑर्डर काढण्यासाठी एक लाखाची लाच घेणाऱ्या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह कंत्राटी सेवकाला रंगेहात पकडले आहे. सुनील अमृत पाटील (वय ५८) असे ग्रामविस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे तर कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय २८) असे कंत्राटी सेवकाचे नाव आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही लाचखोरांविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. सविस्तर असे की, पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथील तक्रारदार रहिवासी आहे. ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रीट व पेवर ब्लॉक करण्याचे चार कामे प्रत्येकी १५ लाख रुपयाप्रमाणे ६० लाखांचे काम शासनाकडून मंजूर…
शेतकरी मेळाव्यात विरोधकांचा घेतला खरपूस समाचार साईमत।पाचोरा।प्रतिनिधी। गेल्या दहा वर्षांत केलेली रस्ते, गटारी, पूल, शेत रस्ते यांच्यासह विविध विकास कामे सांगून मला पुन्हा एकदा संधी दिल्यास मी मतदार संघाचे नंदनवन करेल, अशी आ. किशोर आप्पा पाटील यांनी ग्वाही दिली. तसेच माजी आमदार दिलीप वाघ आणि माजी सभापती सतिष शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात बाजार समितीत केलेल्या कामांचे वाभाडे काढून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. पाचोरा – भडगाव तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या पाचोरा बाजार समितीत वार्षिक सर्वसाधारण सभा आणि शेतकरी मेळाव्याच आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. सभेत वर्षभरात केलेल्या शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजना, शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय, वार्षिक उलाढाली, नफा-तोटाबाबत सभापती गणेश पाटील…
प्राथमिक शाळा ‘खासगी व्यवस्थापन’मध्ये ठरली पात्र साईमत।चोपडा।प्रतिनिधी। ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा २ मध्ये जळगाव जिल्हास्तरासाठी चोपडा तालुक्यात येथील पंकज विद्यालय प्राथमिक शाळेने ‘खासगी व्यवस्थापन’ मध्ये शाळा पात्र ठरल्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.महाराष्ट्र शासनाच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत राज्यभर अभियान राबविण्यात येत आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अव्वलस्थानी असणारी शाळा म्हणून पंकज प्राथमिक विद्यालयाची ख्याती आहे. संस्थाध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले यांच्या प्रेरणेने आणि संचालक पंकज बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाने शासनाच्या स्तुत्य उपक्रमात सहभाग घेतला. विद्यालयात असणाऱ्या पायाभूत सुविधांसह इतर बाबींचे परीक्षण करून तालुकास्तरावर समितीने प्रथम क्रमांक जाहीर केला आहे. यांनी केले अभिनंदन उपक्रमाच्या यशाबद्दल मुख्याध्यापक एम. व्ही.पाटील यांच्या…
सळयांचा पिंजरा अंगावर पडून जखमी साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : शहरातील प्रवर्तन चौकामधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात उभारण्यात येत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम सुरू असतांना सळयांचा पिंजरा अंगावर पडून झालेल्या अपघातात दोन मजूर किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी, २० सप्टेंबर रोजी सकाळी घडली. सविस्तर असे की, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मुक्ताईनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्याचे काम प्रवर्तन चौकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात सुरू आहे. पुतळ्यावरून मध्यंतरी आमदार पाटील आणि आमदार खडसे समर्थकांमध्ये वाद झाले होते. दरम्यान, शुक्रवारी पुतळ्यासाठीचा चौथरा उभारण्याचे काम सुरू असतांना मजुरांच्या अंगावर सळ्यांचा (आसाऱ्या) पिंजरा पडला. त्यात दोन मजूर जखमी झाले…
पत्रकार परिषदेत समाज मंडळाचे अध्यक्ष शरद मोराणकर यांची माहिती साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी। अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचा महामेळावा रविवारी, २२ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता येथील मालेगाव रस्त्यावरील विशाल वंदन नगर येथे आयोजित केला असल्याची माहिती समाज मंडळाचे अध्यक्ष शरद मोराणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सचिव सी.सी.वाणी, सतीश पाटे, भिकन वाणी, अशोक बागड, डॉ.संतोष मालपुरे, संदेश येवले, अमोल नानकर, संजय ब्राह्मणकार, पंकज पिंगळे, चंद्रकांत पाखले, निलेश वाणी, महेश येवले, भावेश कोठावदे, सतीश येवले, गणेश बागड, स्वप्नील धामणे, अनिल कुडे, सागर मेखे, यश चिंचोले, कल्पेश मालपुरे, मनोज चिंचोले आदी उपस्थित होते. मेळाव्यासाठी राज्यस्तरीय ज्येष्ठ नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे अमोल नानकर,…
जामनेर विधानसभेत पुन्हा श्रीराम पाटील पुनरावृत्तीची शक्यता जामनेर विधानसभा मतदार संघात येत्या निवडणुकीत भाजपाचे राज्यातील पहिल्या फळीतील नेते व ग्रामविकासमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्यासमोर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांना प्रबळ दावेदार म्हणून पुढे आणले गेले आहे.भाजपाच्या मुशीतून राजकारणात असलेले खोडपे सर यांना महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उमेदवारी जाहीर करण्याचे अंतिम टप्प्यात आहे. पण त्यांना प्रोजेक्ट करतांना केवळ सामाजिक मतदानाचे गणित मांडून एक नेरेटिव्ह इथे तयार केला जात असल्याने गत लोकसभेत झालेल्या श्रीराम पाटील यांच्या पराभवाची पुनरावृत्ती जामनेर विधानसभा निवडणुकीत कशावरून होणार नाही,अशी चर्चा आहे. जामनेर तालुक्यातील सर्वात मोठ्या नेरी गावातून आपला राजकीय प्रवास पुढे घेऊन गेलेले…