खून झाल्याची खोटी माहिती दिल्यावरुन एकाला अटक साईमत/पाचोरा/प्रतिनिधी येथील जारगाव चौफुली येथे दोन जणांचा खून झाल्याची ११२ डायल क्रमांकावर खोटी माहिती दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. यामुळे नागरिकांसह पोलिसांची दिशाभूल करणे त्याला महागात पडले आहे. पाचोरा पोलीस स्टेशनला रविवारी, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजुन २५ मिनिटांनी डायल ११२ वर अज्ञात इसमाने मोबाईलवरुन फोन करुन माहिती दिली की, पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीवर १५० ते २०० लोक विशिष्ट समाजाच्या लोकांना मारहाण करीत आहे. त्यापैकी दोन लोकांचा खून झालेला आहे. त्यात चॉपरसारख्या हत्याराचा वापर केलेला आहे. तात्काळ पोलीस पाठवा, असा फोन आलेला होता. अशी माहिती मिळताच पाचोरा…
Author: Sharad Bhalerao
भुसावळ शहर पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल साईमत/भुसावळ/प्रतिनिधी शहरातील तापी नगरात राहणाऱ्या एका ६५वर्षीय वृद्धाला बँकेचे व्यवहार घरपोहच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १९ लाख ४०५ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रदीपसिंह प्रतापसिंह परदेशी (वय६५, रा. तापी नगर, भुसावळ) हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते सेवानिवृत्त आहेत. १० मार्च २०२३ ते ६ डिसेंबर २०२३ च्या दरम्यानच्या काळात जळगाव येथे राहणारे संदीप चौधरी आणि सोनाली चौधरी यांनी प्रदीपसिंह परदेशी यांना बँकेचे व्यवहार घरपोहच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देऊ, असे सांगून विश्वास संपादन…
संयुक्त कारवाईत पथकाने एकाला घेतले ताब्यात साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी तालुक्यातील कुऱ्हा येथील एकाला स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलीस पथक यांच्या संयुक्त कारवाईत बेकायदेशीररित्या गांजाची विक्री करणाऱ्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही कारवाई १७ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास केली असल्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सांगितले. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील रहिवासी नसीर शहा रऊफ शहा हा इसम गांज्याची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली होती. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अर्थात एलसीबीला देण्यात आली. त्या अनुषंगाने एलसीबी आणि मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून कारवाई केली. त्यात पोलिसांसह पंच तसेच अन्य आवश्यक…
ग.स.सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी निवड साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि., जळगाव (ग.स.सोसायटी) च्या स्वीकृत संचालकपदी निवड झाल्याबद्दल विजय दगा पाटील यांचा चाळीसगाव येथील समृध्दी शिक्षक फाउंडेशनतर्फे शाल, पुष्पहार व ‘सेल्फी विथ सक्सेस’ पुस्तक देवून नुकताच सत्कार केला. याप्रसंगी समृध्दी शिक्षक फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सतीष साहेबराव सूर्यवंशी, सहसचिव महेंद्र पवार, कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकांत ठाकरे, ज्येष्ठ संचालक जामराव पाटील, शिवापूर जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक सदाशिव पाटील उपस्थित होते.
चाळीसगावला मराठा महासंघातर्फे तहसिलदारांना निवेदन साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या स्नेहल विजय पाटील हिच्या वारसांना वन विभागाने आर्थिक मदत द्यावी, अशा आशयाची मागणी चाळीसगाव येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने तहसिलदारांना निवेदन देऊन केली आहे. निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे खुशाल बिडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, शहर उपाध्यक्ष दादा पाटील, शहर कोषाध्यक्ष विजय पाटील, तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील, तालुका संघटक शेखर पाटील, शहर संघटक किरण जाधव, मोतीराम मांडोळे, पत्रकार महेश पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. गेल्या १९ नोव्हेंबर २०२४ रोजी स्नेहल विजय पाटील (रा. तांबोळे बु., ता.चाळीसगाव) ही शेतात काम करत असताना तिच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ती पळत सुटली…
‘बाप्पा’ मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी ‘भोंगा’, ‘धग’, ‘हलाल’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शक तथा बेस्ट डायरेक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिवाजीराव लोटन पाटील यांच्याकडून ‘बाप्पा’ चित्रपटात मुख्य भुमिकेसाठी चाळीसगाव येथील बालकलाकार मनस्वी सचिन सोनवणे हिची आणि देवम पाटील (सातारा) यांची निवड झाल्याबद्दल ‘बाप्पा’ टिमने अभिनंदन करून चित्रपटाच्या चित्रीकरणाचा प्रारंभ नुकताच झाला. अनेक पुरस्कार प्राप्त कलाकारांसोबत काम करण्याचा योग व अनुभव मनस्वीला येत असल्याचे तिने सांगितले. चाळीसगावच्या चिमुरडीच्या ‘बाप्पा’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार नक्कीच प्राप्त होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. मनस्वी ही लहान बंधू तथा चाळीसगाव येथील अंधशाळेचे प्राचार्य सचिन यशवंतराव सोनवणे आणि कळमडू येथील कन्या शाळेतील शिक्षिका गजश्री सचिन सोनवणे यांची…
संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रतीला केले माल्यार्पण साईमत/यावल/प्रतिनिधी येथील सरस्वती विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक जी.डी. कुलकर्णी यांनी संविधानाची प्रत ही अत्यंत आदराने विद्यार्थ्यांसमोर ठेवून संविधानाच्या प्रतीला माल्यार्पण केले. याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक दीपक पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच संविधान दिनाचे महत्त्व व आजची स्थिती यासंदर्भात ज्येष्ठ शिक्षक प्रा. एस.एम.जोशी यांनी सविस्तर विवेचन केले. संविधानाबद्दल बोलताना एस.बी.चंदनकार यांनी संविधानाचे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्व आपल्या भाषेत विशद केले. त्याचबरोबर अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक जी.डी.कुलकर्णी यांनी हक्क व कर्तव्य यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. तसेच संविधानाची प्रास्ताविका ही सर्वांनी सामूहिकरित्या…
विद्यार्थ्यांची रॅली काढून संविधान दिन उत्साहात साजरा साईमत/यावल/प्रतिनिधी तालुक्यातील मोहराळा येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत मंगळवारी, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी माध्यमिक मुख्याध्यापक सागर पवार होते. यावेळी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी भारताची संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी राहुल जावळे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाबाबत माहिती दिली. त्यात संविधानाची मूल्ये व तत्त्वे यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रती वाचनासाठी उपलब्ध करून दिल्या. संविधान दिनानिमित्त मोहराळा गावातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन भूषण तायडे यांनी केले.
फैजपुरला धनाजी नाना महाविद्यालया संविधान दिन साजरा साईमत/फैजपूर/प्रतिनिधी संविधान उद्देशिकेची शपथ देवून जनमानसात जावून संविधान जनजागृती करावी, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आर.बी. वाघुळदे यांनी उपस्थित मान्यवरांसह एनएसएसच्या स्वयंसेवकांना केले. येथील धनाजी नाना महाविद्यालयात मंगळवारी, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी युवा नेते धनंजय चौधरी, माजी प्राचार्य प्रा. डॉ. जी.पी.पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. जाधव, उपप्राचार्य प्रा. डॉ.कल्पना पाटील, प्रा.डॉ.डी.एल.सूर्यवंशी, एनएसएस सहायक कार्यक्रमाधिकारी प्रा. विकास वाघुळदे, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि एनएसएसचे स्वयंसेवक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील एनएसएसचे स्वयंसेवक…
निवडणूक विश्लेषण गिरीषभाऊ महाजनांची जामनेर मतदार संघावर मजबूत पकड पंढरीनाथ पाटील/साईमत/जामनेर नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जामनेरच्या जनतेने पुन्हा सातव्यांदा गिरीषभाऊ महाजन यांच्यावर विश्वास टाकत त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. गेल्या ३० वर्षापासून गिरीष महाजन यांची मतदार संघावर मजबूत पकड असल्याचे पुन्हा एक सिध्द झाले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत ते स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्याच ताब्यात आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्याकडे असल्याने अगदी ‘बूथ’ लेव्हलपासून त्यांचे नियोजन असल्याने व कार्यकर्त्यांना दिलेली जबाबदारी ते चोख बजावत असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. फरक फक्त मतांचा होता. गेल्या अडीच वर्षात महाजन यांनी मतदार संघात विकास कामांचा सपाटाच सुरू ठेवल्याचे दिसून आले. एकंदरीतच गिरीष…