Author: Sharad Bhalerao

पत्नीच्या डोक्यावरही कुऱ्हाडीने वार, धुळ्यात पत्नीवर उपचार सुरू साईमत/चोपडा/प्रतिनिधी : तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पट्ट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी संजय नानसिंग पावरा (वय २३) याने स्वतःच्या पोटाच्या दोन चिमुकल्या आणि निरागस बालकांवर कुऱ्हाडीने वार करून ठार केले आहे. तसेच पत्नी भारती संजय पावरा हिच्यावर चारित्र्याचा संशयाने क्रूर प्रकार संजय पावरा याने केला आहे. सविस्तर असे की, चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथे पती संजय नानसिंग पावरा आणि पत्नी भारती संजय पावरा(वय १९) हे पाच वर्षाचा मुलगा डेव्हिड संजय पावरा आणि तीन वर्षाची मुलगी डिंपल संजय पावरा यांच्यासह वास्तव्यास होते. परंतु संजयला पत्नी भारतीच्या चारित्र्याबाबत संशय आला आणि १८ रोजी पती-पत्नी दोघांमध्ये घरात…

Read More

चोपडा विधानसभा मतदारसंघात ‘नोटाला’ तिसरी पसंती साईमत/चोपडा/प्रतिनिधी : चोपडा विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत बळीराम सोनवणे यांची ३२ हजार ३१३ मते मिळून मोठा विजय मिळविला आहे. त्यांनी प्रभाकर सोनवणे यांचा दारुण पराभव केला. चंद्रकांत बळीराम सोनवणे (शिवसेना) – एक लाख २२ हजार ८२६ (विजयी), प्रभाकर गोटु सोनवणे(उबाठा) ९० हजार ५१३ (पराभूत) असे मतदान झाले होते. उर्वरित सात उमेदवारांमध्ये एकालाही चोपडा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी पसंती दिली नाही. तिसऱ्या क्रमांकाची पसंती ‘नोटाला’ दिली. नोटाला दोन हजार ४२० मते मिळाली. बसपाचे युवराज बारेला यांना एक हजार २९५, भारत आदिवासी पार्टीचे सुनील तुकाराम भील यांना एक हजार ४०१ तर पुढील अपक्ष अमित सिराज तडवी यांना ५९८,…

Read More

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन साईमत चमुकडून भारतीय संविधान दिनानिमित्त विविध संस्था, संघटना, सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी दिवसभर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात विविध स्पर्धा, रॅली, मार्गदर्शन, व्याख्यान, शिबिर आदी उपक्रमांचा समावेश होता. संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. जामनेरात रॅलीसह कायदेविषयक शिबिर जामनेर: तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बाल दिन आणि संविधान दिनानिमित्त जामनेरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसह जामनेर न्यायालयातून राजमाता जिजाऊ चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. तसेच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये…

Read More

पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान साईमत/जामनेर/प्रतिनिधी : विधानसभेच्या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी पोलीस निरीक्षक कासार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांच्या टीमकडून जामनेर-पहूर रस्त्यावर नाकाबंदी केली होती.यावेळी उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांनी एका चारचाकी वाहनाची झाडाझडती घेतल्यावर त्यात तब्बल १७ लाख २६ हजार ४०० रुपयाची रोख रक्कम आढळून आली होती. ती रक्कम जप्त करुन संबंधितांवर कारवाई केली होती. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ न देता शांततेत आणि सुरळीत निवडणूक प्रक्रिया पार पाडल्या.याकाळात जयसिंग राठोड यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस दलाने त्यांच्या सेवेची दखल घेत जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या…

Read More

भारतीयांना जगण्याचा अधिकार संविधानामुळेच मिळाला: प्रा. मिलिंद बागुल साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा भागातील सोनी नगरात महागौतमी महिला संघ व सोनीनगरातील नागरिकांतर्फे संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.मिलिंद बागुल, सत्यजित साळवे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेकर, गौतम बुद्धाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले. विविध क्षेत्रात महिला अग्रेसर दिसून येत आहे. भारतीयांना जगण्याचा अधिकार संविधानामुळेच मिळाला असल्याचे प्रतिपादन प्रा. मिलिंद बागुल यांनी केले. प्रास्ताविकेचे वाचन बापूराव पानपाटील यांनी केले. याप्रसंगी विनोद निकम, प्रकाश जाधव, सरदार राजपूत, यशवंत पाटील, संजय भोई, नरेश बागडे, अजय बागडे, आकाश सोनवणे, सागर सुरडकर, दिनेश…

Read More

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घेतले कायदेविषयक शिबिर साईमत/जामनेर/प्रतिनिधी तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बाल दिन आणि संविधान दिनानिमित्त जामनेरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसह जामनेर न्यायालयातून राजमाता जिजाऊ चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. तसेच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. शिबिराला ॲड.एस.व्ही.फाशे, श्रीमती पालवे, केंद्रप्रमुख सुरवाडे, श्री.माळी, पी.व्ही.सूर्यवंशी, दि.न.चामले, मुख्याध्यापक महाजन यांनी मार्गदर्शन केले. शिबिरास तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बी.एम.चौधरी, सचिव ॲड.एम.बी.पाटील, सरकारी वकील ॲड.कृतिका भट, ॲड.अनिल सारस्वत, श्री व सौ.चंदले, ॲड.डी.व्ही.राजपूत, न्यायालयीन कर्मचारी, शिक्षक तसेच पोलीस कर्मचारी, इतर मान्यवर उपस्थित होते. शिबिरात भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.

Read More

सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, संविधान उद्देशिका पाठांतर, लेखन उपक्रमांचा समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील साने गुरुजी कॉलनीतील स्थित कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि संविधानाचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस.पी.निकम होते. याप्रसंगी शाळेत सर्वांनी संविधानाची शपथ घेतली. यावेळी निखिल नेमाडे, ज्येष्ठ शिक्षक संजय बाविस्कर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.पी. निकम यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया, महत्त्व तसेच उद्देशिकेचे विश्लेषण केले. यावेळी संविधान दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, संविधान उद्देशिका पाठांतर, लेखन असे विविध उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक जे. एस.चौधरी, पर्यवेक्षक के. आर. पाटील, अशोक पारधे, भारत गोरे,…

Read More

आसोद्यातील सार्वजनिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात एस.के.राणे राजपूत यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास आणि स्वातंत्र्यानंतरचा वर्तमान लक्षात घेता भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेले अधिकार हक्क या जाणिवेतूनच भारतीय लोकशाहीतील भारतीय संविधान भारतीय नागरिकांचा आत्मा आहे. त्यामुळे त्याची जपणूक करण्याची जबाबदारी सर्वस्वी नागरिकांची आहे. पुढच्या पिढीसाठी आत्मभान जपण्याची गरज असल्याचे मत एस. के. राणे राजपूत यांनी केले. आसोदातील सार्वजनिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल होते. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव विलासराव चौधरी, पर्यवेक्षक एल. जे. पाटील, डी. जी. महाजन उपस्थित होते. याप्रसंगी शाश्वती माळी, मंगल चव्हाण, प्रज्ञा कापडणे या विद्यार्थ्यांनी संविधान दिनाविषयी माहिती दिली.…

Read More

समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे वाहिली शहिदांना आदरांजली साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील काव्यरत्नावली चौकात समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी संविधानाची सामूहिक शपथ घेतली. तसेच २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या हल्ल्याच्या घटनेवर ज्येष्ठ कवयित्री पुष्पलता कोळी यांनी ‘शहीद वीर’ कविता सादर केली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक भगवान भटकर होते. त्यांनी ‘संविधानाची निर्मिती व बाबासाहेबांचे योगदान’ विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण, निवृत्तीनाथ कोळी, गोविंद पाटील, किशोर पाटील, संतोष साळवे, संजय बाविस्कर यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन कवी अशोक पारधे तर समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी यांनी आभार मानले.

Read More

गर्दी कमी होण्यास मिळणार मदत, आर्थिक विकासाला मिळेल गती साईमत/फैजपूर/प्रतिनिधी प्रस्तावित ‘मल्टी-ट्रॅकिंग’ रेल्वे प्रकल्पांमध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाअंतर्गत दोन प्रमुख प्रकल्पांचा समावेश असणार आहे. जळगाव– मनमाड चौथी लाइन (१६० कि.मी.) प्रकल्पाची खर्च दोन हजार ७७३ रुपये कोटी, भुसावळ – खंडवा तिसरी आणि चौथी लाइन (१३१ कि.मी.) प्रकल्पाची खर्च तीन हजार ५१४ रुपये कोटी या प्रकल्पांमुळे लॉजिस्टिक क्षमतेत सुधारणा होईल. कारण यामुळे सध्याच्या लाइनची क्षमता वाढवून परिवहन नेटवर्क मजबूत होईल. ज्यामुळे पुरवठा साखळ्यांमध्ये सुधारणा होईल आणि आर्थिक विकासाला गती मिळेल. या प्रस्तावित ‘मल्टि-ट्रॅकिंग’ प्रकल्पांमुळे मुंबई आणि प्रयागराज दरम्यानच्या सर्वात व्यग्र मार्गावर आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास प्रदान करण्यात येणार आहे. सर्व व्यवहार…

Read More