Author: Sharad Bhalerao

शहरवासियांमधून उमटला संताप, नागरिकांची उडाली धांदल ; रस्त्यावर झाडे उन्मळून पडली साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरात मंगळवारी, ६ मे रोजी दुपारी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. वादळ, वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. अशातच वादळी वाऱ्यासह पावसामुळे जळगाव शहरातील वीज तब्बल आठ तासांच्यावर गुल झाल्याने शहरवासियांना अंधाऱ्याचा सामना करण्याची वेळ आली होती. तसेच एमआयडीसी विभागालाही वीज गुल झाल्याचा फटका बसला होता. कंपनीत जाणाऱ्या कामगारांनाही अंधाऱ्याचा सामना करुन कामाच्यास्थळी पोहोचावे…

Read More

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे अध्यक्ष डॉ. योगेश पाटील यांची माहिती साईमत/धुळे/प्रतिनिधी : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात १ मे पासून माहिती व जनसंपर्क भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित झाल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे अध्यक्ष डॉ. योगेश पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष हा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्यस्तरीय कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या देखरेखीत जिल्ह्यात सुरु केला आहे. वैद्यकीय उपचारासाठी गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईक मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना मंत्रालयात जावे लागते. रुग्ण…

Read More

जिल्हा महिला बालविकास अधिकारी राजेंद्र भामरे यांची माहिती साईमत/धुळे/प्रतिनिधी : जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथे एका अल्पवयीन बालिकेचा विवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर प्राप्त झाली होती. त्यानुसार त्वरित कारवाई करुन अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनास यश आले असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी राजेंद्र भामरे यांनी दिली. चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर धुळे येथे ५ मे रोजी भाटपुरा येथे १६ वर्ष वय असलेल्या अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होणार असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. याबाबत बालविवाहाचे गांभीर्य जाणून तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन, धुळे येथील सुपरवायझर महेंद्र चव्हाण, केसवर्कर संदीप पवार यांच्या मदतीने भाटपुरा गावातील बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामसेवक, पोलीस…

Read More

विज्ञान : धनश्री भोंबे, वाणिज्य : कोमल मुळे तर कला : पायल धानोई प्रथम साईमत/जामनेर/प्रतिनिधी येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात धनश्री विकास भोंबे ७१.६७ टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आली आहे. तसेच कुमुद रविप्रकाश जयकारे ६०.८३ द्वितीय तर हर्षल नरेंद्र पाटील हा ६०.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात कोमल कमलाकर मुळे ७६.३३ टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय सोनाली गोपाळ गवळी ७४.६७ तर तृतीय क्रमांकाने जयश्री धनराज शेजोळ ६८ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली…

Read More

अवकाळी पावसामुळे नागरिकांची उडाली एकच धांदल  साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरात मंगळवारी, ६ मे रोजी दुपारी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने एकच खळबळ उडाली. हवामान विभागाने यापूर्वीच जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी जळगाव शहरात अचानक वातावरण बदलले आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. शहरातील काही भागांमध्ये तर गारांचा पाऊस पडला होता. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. भाजीपाल्याचे नुकसान होण्याची भीती अवकाळी पावसाचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली…

Read More

नागरिकांनी मानले आमदारांसह संबंधितांचे आभार साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी : येथील गौसिया नगर, मदीना नगर, जिलानी नगर, मोहम्मदीया नगर भागातील कमी क्षमतेच्या वीजेच्या डीपीमुळे पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे समस्याग्रस्त जनतेने समस्या सुटावी, या हेतूने माजी नगरसेवक फिरोज खान यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक वीज महावितरणाच्या कार्यालयात मोर्चा धडकला होता. यावेळी कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता आणि अभियंता यांच्याशी या भागातील लोकांच्या समस्येवर सविस्तर चर्चा केल्यानंतर यासंदर्भात आ.चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यानंतर या भागातील रहिवाशांची समस्यांची जाण ठेवून लगेचच मुख्य अभियंत्यांशी तसेच जळगाव येथील मुख्य अभियंत्यांशी आ.चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली. या भागात त्वरित २०० केव्हीची डीपी बसविण्याचे आदेश दिले होते. लवकरच डीपी…

Read More

मुख्याधिकाऱ्यांंच्या विद्यार्थी हिताच्या उपक्रमाचे कौतुक साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : पाचोरा नगरपरिषद संचलित महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय वास्तूमध्ये स्थलांतरीत केले आहे. शहरातील विद्यार्थ्यांना एक मोलाची भेट नगरपालिकेने दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून आ. किशोर पाटील यांच्या हस्ते आधुनिक ई-लायब्ररीचे उद्घाटनासह लोकार्पण करण्यात आले. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी विद्यार्थ्यांना ई-लायब्ररी अंतर्गत देशातील अग्रगण्य स्पर्धा परीक्षाकरीता तयारी करुन घेणाऱ्या नामांकित संस्थांच्या वक्त्यांची लेक्चर उपलब्ध करुन दिली आहे. त्यांच्या अशा स्तुत्य उपक्रमाचे कौतूक करतांना आमदार म्हणाले की, मुख्याधिकारी हे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. त्यांनी ई-लायब्ररीसारखा उपक्रम नगरपालिकेच्या वाचनालयात आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात न जाता गावात राहून नामांकित स्पर्धा…

Read More

पहिल्याच वर्षी विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागल्याने आनंद साईमत/भडगाव/प्रतिनिधी : आमडदे येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित सौ.साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला आहे. त्यात विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यात ५१ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी संपूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पहिल्याच वर्षी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. निकालातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांपैकी पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये ऋषिकेश निलेश पाटील (८२ टक्के), मनीष सचिन पाटील (८१.५०), सचिन समाधान पाटील (८०.३३), यशोदीप रमेश पाटील (७९.८३), प्रांजल दीपक पाटील (७९.६७) यांचा समावेश…

Read More

विद्यार्थिनींनीच मिळविला प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक  साईमत/यावल/प्रतिनिधी : येथील नगरपरिषद संचलित पीएमश्री साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. तिन्ही शाखेत विद्यार्थिनींनीच प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला आहे. नुकत्याच लागलेल्या बारावीच्या निकालात विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांकाने नियती किशोर राणे (८७.५० टक्के), द्वितीय तनवी राकेश कोलते (८७.३३), तृतीय अंजली शरद जोगी (८६ टक्के) गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. कॉमर्स शाखेतून प्रथम क्रमांकाने प्रतीक्षा कैलास कोळी (८०.८३ टक्के), द्वितीय ममता रोहिदास महाजन (८०.५०), तृतीय यामिनी नितीन वाघ (७६.५० टक्के) गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. कला शाखेतून प्रथम उज्ज्वला रमेश सोनवणे (७५.५० टक्के), द्वितीय भाग्यश्री लक्ष्मण चौधरी (७१.३३), तृतीय रिंकू…

Read More

उपस्थित मान्यवरांकडून सागर सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील पाळधीतील सावदा रस्त्यालगत सागर सोनवणे यांच्या मालकीच्या ‘सागर स्टोन क्रेशरच्या’ हॉटमिक्स प्लांटचे आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते शनिवारी, ३ मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी वसंत अण्णा सोनवणे, डॉ.शांताराम सोनवणे, सुमनबाई सोनवणे, माजी आ.लताताई सोनवणे, माजी महापौर राखीताई सोनवणे, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, माजी नगरसेवक मन्नुदादा सोनवणे, शामकांत सोनवणे, नरेश सोनवणे, राहुल सोनवणे, संभाजी सोनवणे, विशाल सोनवणे, अमित सोनवणे, विक्रम सोनवणे, धीरज सोनवणे, परेश बऱ्हाटे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. सागर स्टोन क्रेशरचे संचालक सागर सोनवणे हे स्व.बळीराम सोनवणे यांचे नातू आहेत. ते सध्या पुणे येथे एमआयटीचे उच्च…

Read More