रामानंद नगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील खोटे नगर थांब्याजवळील मानसेवा शाळेच्या पाठीमागील असणाऱ्या गुरुदत्त नगरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रुममध्ये अज्ञात चोरट्याने ९० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. त्यात एक लॅपटॉप आणि तीन मोबाईलचा समावेश आहे. चोरटा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, शहरातील खोटे नगर थांब्याजवळील मानसेवा शाळेच्या पाठीमागील असणाऱ्या गुरुदत्त नगरात सविता दौड यांच्या मालकीचे घर आहे. त्यांनी आपला रुम एसएसबीटी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना भाड्याने दिला आहे. त्यापैकी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारे चिराग पाटील, गौरव कोळपे, ऋषीकेश इंगळे यांचे तीन…
Author: Sharad Bhalerao
जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल, एकाला घेतले ताब्यात साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भुसावळ येथे तृतीयपंथींचा कार्यक्रम पाहून परत येत असलेल्या तीन मित्रांपैकी एकाच्या निष्काळजीपणामुळे जळगाव-भुसावळ मार्गावर गंभीर घटना घडली. गाडीत बसून गावठी पिस्तुलाशी खेळताना चुकून गोळी झाडली गेल्याने नाजिम पटेल नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरात घडली. याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, तोहित देशपांडे आणि नाजिम पटेल हे दोघे आपल्या एका अन्य मित्रासोबत भुसावळ येथे तृतीयपंथींचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री सुमारे अडीच वाजता ते पाळधीकडे परतत होते. प्रवासादरम्यान मागच्या…
डंपरसह चालक ताब्यात, रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव ते नशिराबाद रस्त्यावरील राणे हॉस्पिटलजवळ गुरुवारी, १५ मे रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास एका भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगात आणि चुकीच्या दिशेने येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. अपघाताची मिळताच नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, पोलिसांनी अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. अपघात घडविणारा डंपर आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. अपघातामुळे नशिराबाद गावावर शोककळा पसरली आहे. सविस्तर असे की, नशिराबाद येथील रहिवासी तेजस…
मध्यरात्री टोळक्यांकडून गुंडागर्दी, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील तुकाराम वाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास काही तरूणांसह इतरांनी हैदोस घातला. तुकाराम वाडी परिसरात सुरेश ओतारी यांच्या खून प्रकरणातून सुरू असलेल्या वादातून काही तरूणांनी परिसरात राहणाऱ्या महिलांसह इतरांच्या घरांवर दगडफेक करून दमदाटी केली तर काही वाहनांची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शारदा सुकलाल ठाकुर (वय ४०, रा. तुकाराम वाडी) यांनी फिर्याद दिली आहे. एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरेश ओतारी यांच्या खून प्रकरणातून सुरू असलेल्या वादातून स्वप्निल उर्फ गोलू धर्मराज ठाकुर, निशांत प्रताप चौधरी, अरुण उर्फ टीनू भीमराव गोसावी, मुन्ना…
जि.प.च्या आरोग्यासह ग्रामपंचायत विभागाचा समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मंगळवारी, १३ मे पासून सुरू झालेल्या प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी, १४ मे रोजी आरोग्य विभागासह ग्रामपंचायत विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संपूर्ण बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली पारदर्शकपणे पार पडली. ही प्रक्रिया समुपदेशन प्रक्रियेद्वारे आणि इन कॅमेरा रेकॉर्डिंगसह राबविण्यात आली. त्यामुळे कोणतीही तक्रार किंवा गैरप्रकार होण्याची शक्यता टाळण्यास मदत झाली आहे. बदली प्रक्रियेवेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यासह संबंधित विभागांचे…
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील आर.एल. चौफुलीवरील महादेव मंदिराजवळ बेकायदेशीरपणे गांजाचा नशा करणाऱ्या दोन जणांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी १३ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जळगाव शहरातील आर.एल.चौफुली परिसरात बेकायदेशीरपणे दोन जण गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसीच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी १३ मे रोजी दुपारी कारवाई करत संशयित आरोपी ज्योतमल तपेश्वर राठाेड (वय २५) आणि वरूण रमेश गोयल (वय २१, दोन्ही रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून गांजा पिण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा…
एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील अयोध्या नगरातील विषारी औषध घेतलेल्या ३२ वर्षीय तरूणाचा मंगळवारी, १३ मे रोजी दुपारी १ वाजता उपचारावेळी मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. योगेश लिलाधर वाघोदे (वय ३२) असे मयत तरूणाचे नाव आहे. जळगाव शहरातील अयोध्या नगरात योगेश वाघोदे हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याने राहत्या घरात विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याला तातडीने जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतांना १३ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. विषारी औषध घेण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तपास पो.हे.कॉ.स्वप्निल पाटील करीत आहे.
रामानंदनगर पोलिसात पतीविरुध्द गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनधी : शहरातील राजीव गांधी नगरात पत्नीने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, त्याच्या रागातून लोखंडी कोयत्याने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, जळगाव शहरातील राजीव गांधी नगरात संगीता रमेश झेंडे आणि तिचे पती रमेश बाबासाहेब झेंडे हे दोघेजण वास्तव्याला आहे. रमेश झेंडे यांनी ११ मे रोजी दुपारी दीड वाजता पत्नी संगीता यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तेव्हा ते न दिल्याच्या कारणावरून पती रमेश झेंडे यांनी पत्नी संगीता यांना शिवीगाळ केली. लोखंडी कोयताने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली.…
एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील लक्ष्मी नगरातील एका ४५ वर्षीय व्यक्ती अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना सोमवारी, १२ मे रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शिवाजी लोभाजी तडवी (वय ४५ रा. लक्ष्मी नगर, जळगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जळगाव शहरातील लक्ष्मी नगर परिसरात शिवाजी तडवी हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. ते ११ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना…
जळगाव महानगराध्यक्षपदी पुन्हा दीपक सूर्यवंशी यांना संधी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने पूर्व व पश्चिम जिल्हाध्यक्षांसह जळगाव महानगराध्यक्ष्यांची निवड जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती. अखेर पक्षाच्या प्रदेश पातळीवरून याबाबतची घोषणा केली आहे. त्यात पक्षाच्या पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी जामनेर येथील भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर तर पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी तर जळगाव महानगराध्यक्षपदी पुन्हा एकदा दीपक सूर्यवंशी यांना संधी मिळाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पक्षासाठी केलेल्या कामाची पावती त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळवून देण्यास कारणीभूत ठरली आहे. तसेच जामनेर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी चंद्रकांत…