साईमत प्रतिनिधी परंपरेप्रमाणे नदीपात्रात अस्थी आणि रक्षा विसर्जन करण्याऐवजी भडगाव तालुक्यातील शिंदे परिवाराने फळझाडे लावून स्वर्गीय नारायण बाजीराव शिंदे यांची स्मृती जपली, आणि समाजासमोर पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आदर्श ठेवला. भाजपाचे कार्यकर्ते भगवान शिंदे यांचे बंधू व सागर शिंदे यांचे वडील स्वर्गीय नारायण बाजीराव शिंदे यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर सागर शिंदे, त्यांची पत्नी सोनल, भगिनी सोनाली जितेंद्र पाटील, मोनाली किरण पाटील, रूपाली कुणेश बोरसे तसेच संपूर्ण शिंदे परिवाराने ठरविले की अस्थी आणि रक्षा नदीत विसर्जित न करता, त्यांच्या स्मृती म्हणून फळझाडे लावावीत. “अस्थी विसर्जनाने नदी प्रदूषित होते, त्यामुळे त्याऐवजी वृक्षारोपणाचा मार्ग निवडला,” असे शिंदे कुटुंबियांनी सांगितले. स्वर्गीय नारायण…
Author: Saimat
एका भारतीयाने वर्षभरात सरासरी ३.०९ लिटर दारूचे सेवन — देशाला तब्बल ५.६३ लाख कोटींचा महसूल साईमत प्रतिनिधी दारूचे सेवन ही फक्त सवय किंवा संस्कृतीचा भाग नसून ती अनेक देशांसाठी मोठा आर्थिक स्रोत ठरली आहे. जगभरातील बहुतांश देशांमध्ये मद्य उत्पादन, विक्री आणि व्यापार प्रचंड प्रमाणात केला जातो. मात्र, या क्षेत्रातून सर्वाधिक पैसा कमावणारा देश म्हणून चीनने जगात अव्वल स्थान पटकावले आहे. चीनचा ‘दारू अर्थव्यवस्थे’चा चमत्कारग्रँड व्ह्यू रिसर्चच्या अहवालानुसार, चीनने २०१८ मध्ये मद्यविक्रीतून तब्बल २३.७ लाख कोटी रुपयांची कमाई केली. इन्फोग्रामच्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये चीनने विशेषतः बिअर विक्रीतून सर्वाधिक महसूल मिळवला.तज्ज्ञांच्या मते, २०३० पर्यंत चीनचा अल्कोहोलिक ड्रिंक्स मार्केट १९.१ लाख कोटी रुपयांपर्यंत…
साईमत प्रतिनिधी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने आज (४ नोव्हेंबर) जाहीर केला. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून नगरपरिषद, नगरपंचायत पातळीवरील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना सांगितले की, २ डिसेंबर रोजी मतदान, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी, तर १० डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या पहिल्या टप्प्यात नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार असून पुढील टप्प्यात जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. निवडणूक कार्यक्रम असा अर्ज दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५ अर्ज दाखल करण्याची अंतिम…
साईमत प्रतिनिधी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय समीकरणे हलू लागली आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा राज्यभर सुरू असताना, महायुतीतील ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या निवडणुकांच्या संभाव्य तारखांची माहिती देत राजकीय वातावरण तापवले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय पक्षांनी तयारीचे गियर वाढवले असून उमेदवारांच्या भेटीगाठी, प्रचार नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या बैठकींना वेग आला आहे. निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम जाहीर मंचर येथे आयोजित युवक-युवती मेळाव्यात बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले — “मी निवडणुकीची तारीख अधिकृतपणे सांगत नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. मात्र आमच्याकडील माहितीनुसार ५ नोव्हेंबरला नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होईल. त्यानंतर १५ डिसेंबरला जिल्हा परिषद…
साईमत प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील मदतकार्य तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारीचा सखोल आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज (१ नोव्हेंबर २०२५) दुरचित्रवाणी परिषदेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. सकाळच्या सत्रात विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांना आवश्यक दिशा आणि सूचना दिल्या. अतिवृष्टी मदतकार्याची गती वाढवण्यावर भर अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्रांतील प्राथमिक पंचनामे, मदतवाटप प्रक्रिया आणि शेतकरी पुनर्वसन कार्य याचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी घुगे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, “प्रत्येक…
साईमत प्रतिनिधी पुनीत बालन यांच्या सौजन्याने आयोजित ५२ वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणी २०२५-२६ या भव्य स्पर्धेला जळगाव शहराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि जळगाव जिल्हा हौशी ज्यूदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने १ आणि २ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन आज (१ नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात झाले. या सोहळ्याचे उद्घाटन आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांतील सुमारे ३५० मुले-मुली सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे अध्यक्ष विष्णूभाऊ भंगाळे (माजी महापौर) आणि सचिव…
साईमत प्रतिनिधी राज्यातील सफाई कर्मचार्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. सफाई कर्मचार्यांना सर्व मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा, गट विमा, तसेच कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी दिले. ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. ही बैठक हाताने मैला वाहून नेणार्या कर्मचार्यांच्या नियुक्तीस बंदी व पुनर्वसन अधिनियम २०१३ च्या अंमलबजावणीबाबत आणि कर्मचार्यांच्या विविध समस्या सोडविण्याच्या उपाययोजनांवर केंद्रित होती. बैठकीत उपस्थित अधिकारी व घेतलेले निर्णय या बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, नगरपालिका जिल्हा…
साईमत प्रतिनिधी देशात विकासाचे नवे पर्व सुरू असताना, जळगाव शहरातही प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या जनकल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ हे तीन दिवसीय भव्य प्रदर्शन सोमवार, दि. ३ नोव्हेंबर ते बुधवार, दि. ५ नोव्हेंबर दरम्यान शिवतीर्थ – जीएस ग्राऊंड, जळगाव (Jalgaon Exhibition 2025) येथे आयोजित करण्यात आले आहे. या जनजागरण प्रदर्शनाचे उद्घाटन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शासनाच्या योजनांचे…
साईमत प्रतिनिधी शहरातील ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या ऐतिहासिक रथोत्सवाचा भाग असलेला तेजोमय ‘सूर्यनारायण रथ’ याचे आगमन दिनांक ३० ऑक्टोबर रोजी जळगाव जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात झाले. या आगमनाने बँकेच्या परिसरात भक्तीचा आणि उत्साहाचा माहोल निर्माण झाला. श्रीराम मंदिर संस्थेचा हा रथोत्सव दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा जपणारा आहे. या रथोत्सवातील सूर्यनारायण रथ तेज, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी, संचालक मंडळाने आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने रथाचे स्वागत केले. रामपेठेतून रथ मिरवणुकीस सुरुवात झाली आणि जयघोषांच्या गजरात, ढोल-ताशांच्या तालावर, ‘श्रीराम जय राम जय जय राम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. बँकेच्या प्रांगणात रथ पोहोचताच विधिवत पूजा, आरती आणि…
साईमत प्रतिनिधी “अखंड भारताची निर्मिती ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीचा आणि दृढनिश्चयाचा परिणाम आहे. त्यांनी राष्ट्राच्या एकतेसाठी दाखविलेल्या चिकाटी, धैर्य आणि समर्पणामुळे आज आपण एकसंघ भारत म्हणून उभे आहोत. देशाच्या अखंडतेत त्यांचे योगदान अमूल्य आहे. युवकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेत ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले. ते आज भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित ‘रन फॉर युनिटी’ या राष्ट्रीय एकता दौड उपक्रमात बोलत होते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून एकता दौडीला प्रारंभ झाला. तेथून पाचकंदील…