साईमत जळगाव प्रतिनिधी खडके बालगृह अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या बालकल्याण समितीला बरखास्त करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे सुरु असलेल्या अन्नत्याग उपोषणाला दि. २३ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा वकील संघाने पाठिंबा दिला. महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे राज्य उपाध्यक्ष अॅड. दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, महानगराध्यक्ष प्रथमेश मराठे यांनी दि. १९ जानेवारी पासून उपोषण सुरू केले आहे. दरम्यान विविध सामाजिक संघटना यांनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दिला आहे. बाल लैंगिक सारख्या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या बालकल्याण समितीने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणं अपेक्षित होतं मात्र तसं न झाल्याने पीडित बालिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘मासू’ विद्यार्थी संघटनेने बेमुदत…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी वंचित व गरिबांची मदत हिच ईश्वराची पुजा असे मानून सुधर्मा संस्थेद्वारे शहरातील महाबळ परिसरातील देवेंद्र नगरातील श्रीराम मंदिरात अयोध्या येथील राम मुर्ती प्रतिष्ठापणेच्या दिवशी सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे, सुनिता बेलसरे यांचे हस्ते श्रीरामाचे पुजन व हवन करण्यात आले. यावेळी कचरावेचक महिलांना किराणा वाटप करत दोन गरजू विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या. यावेळी हेमंत बेलसरे यांनी राममंदिराच्या उभारणी बद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले व सर्वांना रामराज्याची संकल्पना समजावून सांगत त्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी आपणास शबरीची व वाल्मिकी ची गोष्ट नेहमीच प्रेरणा देते असेही त्यांनी सांगितले. प्रसंगी राममंदिराचे व्यवस्थापक जेष्ठ नागरिक शंकरराव कामठे, धर्मराज पाटील, महेंद्रसिगं राजपूत यांचा…
साईमत जळगाव प्रतिनिधी जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव द्वारे प्रायोजित आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन द्वारे अधिकृत “जैन चैलेंज” जळगाव जिल्हा आंतर शालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धा – २०२४. चे आयोजन दिनांक १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान अनुभूती निवासी स्कुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात येणार आहेत या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १४, १७ वर्षाआतील वयोगटातील मुले व मुली सांघिक अशा स्वरूपात घेतल्या जातील. या स्पर्धा मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या शाळांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव कडुन बक्षिस म्हणुन आकर्षक चषक व खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शाळा या स्पर्धेमध्ये सहभाग…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा परीसरातील सावखेडा रोड जवळील सोनी नगरात जागृत स्वयंभू महादेव मंदिराच्या समोर संगितमय श्री शिव महाशिवपुराण कथेचे दि.२६जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान, दुपारी २ ते ५ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रा २६ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता पिंप्राळा परीसरातील कुंभारवाडा जवळील वटुकेश्वर महादेव मंदिर पासून बैलगाडी व कळसधारी महिलांची शोभायात्रा काढण्यात येणार गणपती नगरातून जोगेश्वरी माता मंदिर ते स्वयंभू महादेव मंदिरात शोभायात्रेची सांगता होणार तर २ फेब्रुवारीला दुपारी ११.३० वाजता काल्याचे प्रवचन नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेचे यजमान निलेश जोशी परिवाराकडून असून कथाकार ह.भ.प.देवदत्त मोरदे महाराज आहे. या कथेसाठी पिंप्राळा गाव परीसर,…
साईमत जळगाव प्रतीनिधी राज्यातील आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी डिसेंबर महिन्यात राज्यभरात बेमुदत संप केला होता. त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे महाराष्ट्र शासनाचे दुर्लक्ष झाल्याने मंगळवारी २३ जानेवारी रोजी महाराष्ट्र आशा वर्कर्स, गट प्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १८ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०२३ दरम्यान राज्यभरात ७२ हजार अशा व ३ हजार ९०० गट प्रवर्तक महिलांनी बेमुदत संप केला होता. याबाबत महाराष्ट्र शासनाने गटप्रवर्तक व आशा सेवकांच्या मागण्यांबाबत लवकरच निर्णय देण्याचा आश्वासन दिले होते. याबाबत चर्चा होऊन २ महिने झाले, परंतु…
साईमत जळगाव प्रतीनिधी श्रीरामांनी रघुकुलनीतीने पिताश्री दशरथांचे वचन खरे करण्यासाठी हे सर्व वनवास गमन सहज स्वीकारले. नुसते स्वीकारले नाही, तर संकटाचे सुसंगतपणे प्रतिबिंबित केले. सज्जन शक्तीला जागविले. वनवास ही पर्वाची देणगी आहे. श्रीराम वनवासात जेथे जेथे गेले, तेथे तेथे अयोध्येचा विस्तार झाला. श्रीरामाच्या चौदा वर्षांच्या वनवासामुळे भारतवर्ष आसेतुहिमाचल अभंग झाला. आजच्या भारताची सांस्कृतिक आणि भौगोलिक एकता ही श्रीरामाच्या वनवासाची परिणती आहे. असे हभप परमपूज्य दादा महाराज जोशी यांनी श्री राम कथेच्या चौथ्या दिवशी कथेत निरुपण केले. विवाहनंतर अयोध्येत आनंद आणि शांततेचे वातावरण होते. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे चार भाऊ आपापल्या पत्नींसोबत सुखाने राहत होते. काही काळानंतर भरतचे मामा…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील जी. एस. मैदानावर आयोजित भव्य श्री राम कथेचा आज (दि.21) दुसरा दिवस होता. परमपूज्य दादा महाराज जोशी यांनी राम जन्म ते राम गुरुकुल शिक्षणापर्यंतचा राम कसे होते, त्यांचा जीवन प्रवास कसा होता, हे सांगितले. यावेळी राम भजनाच्या तालावर भाविकांनी ठेका धरला होता. राम नामाच्या आराधनेत तल्लीन झालेले भाविक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. राम जन्म कथेला परमपूज्य जोशी महाराजांनी रामांच्या बाललीलांचे अतिशय सुंदर शब्दात विवेचन केले. ‘प्रभु श्री राम’ यांच्या नामाच्या जल्लोषाने कथेला सुरुवात करून राजेश्वरी आणि ज्ञानेश्वरी रत्नपारखी यांनी बासुरी वादन केले. यानंतर आ. राजूमामा भोळे, माजी महापौर सीमा भोळे, डॉ. जुही भोळे व डॉ.…
साईमत जळगाव प्रतिनिधी महानगरपालिकेत मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करावयाचे असल्याने सर्वेक्षणाचे काम सुरु करावयाचे अनुषंगाने दि.२१ जानेवारी रोजी सकाळी १०.०० ते ०१.०० तसेच दुपारी ०२.०० ते ०५.०० या प्रमाणे प्रत्येकी दोन सत्रात महानगरपालिका सभागृह, धांडे सभागृह, जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय व सेमिनार हॉल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अशा तीन ठिकाणी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. प्रशिक्षण कामी ४२ पर्यवेक्षक ५८५ प्रगणक असे एकुण ६२७ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यापैकी ४७४ इतक्या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले व १५३ कर्मचारी प्रशिक्षणास अनुपस्थित होते. सदरील प्रशिक्षण वर्ग मास्टर ट्रेनर, सहा. आयुक्त अभिजित बाविस्कर, सहा.…
साईमत जळगाव प्रतिनिधी शासन निर्देशानुसार मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली १४ ते २१ जानेवारी दरम्यान “स्वच्छ तीर्थ अभियान” राबविण्यात आले.या अभ्यानात दिनांक२१ जानेवारी रोजी चिमुकले राम मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी स्वतः झाडू हातात घेऊन व धार्मिक स्थळाचा परिसर पाण्याने स्वच्छ धुऊन स्वच्छता अभियानात अग्रेसर भूमिका घेतली तसेच यावेळी सह. आयुक्त उदय पाटील, सर्व मुख्य स्वच्छता निरीक्षक व आरोग्य निरीक्षक, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. “स्वच्छ तीर्थ” अभियानांतर्गत शहरातील ९७ धार्मिक स्थळांची स्वच्छता महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील नामांकित, राजकीय, समाजसेवक, धार्मिक संस्था, शासकीय अधिकारी व कर्मचारी, सामाजिक…
साईमत जळगाव प्रतिनिधी समाज बांधनांनी शिक्षण, रोजगार, या गोष्टी कडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन आदिवासी पारधी क्रांती संघनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांनी केले. ते येथील जिल्हाधिकारी कार्यायातील अल्पबचत भवनात आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश तर्फे आयोजित समाजाच्या वधु-वर परिचय मेळावा व पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके, महासचिव दिपक खांदे, उपाध्यक्ष भगवान सोळंके, राज्यउपाध्यक्ष सुनिल दाभाडे, महिला प्रदेश अध्यक्षा संगीता पवार, महासचिव संगीता चव्हाण, प्रदेश मुख्य संघटक बन्सीलाल पवार, सचिव अमोल सुर्यवंशी, उत्तम दाभाडे आदिंची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते वधु-वर परिचय मेळावा पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात…