राम नामाच्या आराधनेत भक्त झाले तल्लीन ; भाविकांनी धरला ठेका

0
12

साईमत जळगाव प्रतिनिधी

शहरातील जी. एस. मैदानावर आयोजित भव्य श्री राम कथेचा आज (दि.21) दुसरा दिवस होता. परमपूज्य दादा महाराज जोशी यांनी राम जन्म ते राम गुरुकुल शिक्षणापर्यंतचा राम कसे होते, त्यांचा जीवन प्रवास कसा होता, हे सांगितले. यावेळी राम भजनाच्या तालावर भाविकांनी ठेका धरला होता. राम नामाच्या आराधनेत तल्लीन झालेले भाविक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. राम जन्म कथेला परमपूज्य जोशी महाराजांनी रामांच्या बाललीलांचे अतिशय सुंदर शब्दात विवेचन केले.

‘प्रभु श्री राम’ यांच्या नामाच्या जल्लोषाने कथेला सुरुवात करून राजेश्वरी आणि ज्ञानेश्वरी रत्नपारखी यांनी बासुरी वादन केले. यानंतर आ. राजूमामा भोळे, माजी महापौर सीमा भोळे, डॉ. जुही भोळे व डॉ. विरन खडके यांनी राम ग्रंथपूजन केलं. दुसऱ्या दिवशीची कथाप्रारंभी करते वेळी कथामंचावर गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष सचिन नारळे आणि धर्म जागरण संस्था जळगाव अध्यक्ष भाईजी मुंदडा या मान्यवरांनी विधिवत आरती केली.
डॉ. जुही विशाल भोळे आणि महाराज हृषीकेश जोशी यांनी राम कथा प्रांगणात मधुर बासरी वादनासह भजन सादर करणाऱ्या राजेश्वरी आणि ज्ञानेश्वरी रत्नपारखी या भगिनींना श्री राम मंदिराची प्रतिकृती देऊन सन्मानित केले.

स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी हे उत्कृष्ट कार्य सुरू केले असून या अंतर्गत हिंदी साहित्य गंगा संस्थेच्या सहकार्याने श्री राम या विषयावरील काव्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विजेत्यांना रोख रक्कम व सन्मान चिन्हासह प्रमाणपत्र देण्यात आले.
काव्य स्पर्धेच्या प्रथम गटात डॉ.श्रीकांत तारे प्रथम, पूर्णिमा हुंडीवाला द्वितीय तर प्रियंका विशाल त्रिपाठी हिने तृतीय क्रमांक पटकावला. मनोहर तेजवानी यांच्यासह सहभागी झालेल्या सर्व 90 स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. प्रमाणपत्र व श्री राम चरित्रमानस दिले होते. शालेय स्तरावरील याच श्री राम काव्य स्पर्धेत प्रथम भूमिका किरण मोरे, द्वितीय प्रतीक्षा देवरे, तृतीय मैताली सांगडे व चौथी धनवी बडगुजर यांना रोख पारितोषिक व सर्व स्पर्धकांना सांत्वनपर बक्षिसे प्रमुख पाहुणे आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
दुसऱ्या दिवसाच्या कथा समारोपाच्या वेळी कथा मंचावर आ. राजूमामा भोळे, माजी महापौर सीमा भोळे, डॉ. जुही भोळे, विशाल भोळे, अशोक राठी, नितीन पाटील, रामदयाल सोनी, रामलाल सोनी, मनीष बाहेती, श्रीनिवास व्यास, संजय व्यास या सर्व मान्यवरांनी विधिवत आरती केली. त्यानंतर भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आला.
तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी श्रीराम कथेत आदर्श युवराज राम विश्व मित्रांच्या आगमन विश्वमित्र यांच्याबरोबर प्रस्थान राम विवाह होणार आहे. कथा श्रवण करण्यासाठी भाविकांनी पावणे दोन वाजेपर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन आयोग समितीकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here